बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांना रोजगार सेवक या पदावरून कमी करण्याचे आदेश दि.२० रोजी प्रभारी गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे बोदवड यांनी नांदगाव येथील ग्रामसेवक व सरपंच यांना दिले आहे. निमखेड शिवारातील गट क्रमांक १६३ मध्ये बाबुराव लक्ष्मण निकम व नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांनी एकाच शेतात दोन विहिरीचे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान घेतले होते,परंतु एकाच विहिरीचे खोदकाम व बांधकाम केले होते, दुसऱ्या विहिरीचे अंदाजित अनुदान १ लाख ३४ लाटून भ्रष्टाचार केला होता,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन रामा आसने यांनी तक्रार दाखल केली होती,वारंवार…
Author: Saimat
बोदवड प्रतिनिधी दररोज प्रमाणे चालणारी अवैध गुरे ढोरे वाहतुक चिंतेचा विषय बनलेली आहे. मुक्ताईनगर ते हिंगणे फाटा दरम्यान मृत गुरे-ढोरे सापडण्याचे प्रकार वाढत आहे. हिंगण्या जवळ मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने दि.२१ रोजी नागरिकांनी या मागील प्रकाराचा तपास घेतला.हिंगणे फाटा नजीक असलेल्या महादेव मंदिर परिसराच्या काही अंतरावर १० बैल मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर चेक पोस्ट वरुन अवैध गुरे-ढोरे वाहतुकीचे वाहने दलालांमार्फत पाकिटचोर अधिकाऱ्यांच्या संमतीने सोडली जातात. पुढे मुक्ताईनगर ते हिंगणा फाटा दरम्यान जंगल येत असल्याने राष्ट्रीय महामार्ग रात्रीच्या सुमारास सामसूम असतो. अंधार्या रात्रीचा व कोणी नसल्याचा फायदा घेऊन राजस्थान, मध्य प्रदेश येथुन लांब पल्ला गाठत आणुन…
बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील तिस मार खां म्हणून ओळख असलेले ग्रामसेवक संदिप निकम यांच्यावर दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. शेलवड येथील ग्रामपंचायतीच्या अपहारात ग्रामसेवक संदिप निकम यांचेसहित माजी सरपंच निलेश माळी यांनाही जबाबदार धरण्यात आले आहे. यापाठोपाठ सुरवाडे बुद्रुक , विचवा व मुक्तळ या चार ग्रामपंचायतीच्या अनियमितते बाबत ५२ लाख ९४ हजार १८० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रमेश सपकाळे यांच्या फिर्यादीवरून १४ व १५ वा वित्त आयोगाच्या निधीचा स्वतःच्या फायद्याकरिता तोतयेगिरी व ठगवणुक करुन दस्तऐवज बनावटीकरण केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम ४२०,४१९,४०९,४६७,४६८,४६९,४७१ प्रमाणे गुन्हा दि.२२ सकाळच्या सुमारास ९.३० वाजता दाखल झालेला आहे. शेलवड , सुरवाडे बुद्रुक…
यावल (सुरेश पाटील) लग्न समारंभ म्हटले की,मानपान नातेवाईकांचे रुसवे-फुगवे आणि प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होतोच. अनेकदा अशा काही कारणावरुन वादही उद्भवतात. मात्र,यावल तालुक्यातील साकळी येथे लग्नात मावस भावाला मान मिळाला नाही.या रागातून संबंधित व्यक्तीने बालविवाह होत असल्याची माहिती बालविकास प्रकल्पाच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे तात्काळ अर्ज पाठविल्याने बालविवाह रोखण्यात आला आल्याची घटना यावल तालुक्यात घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज23 मे रोजी यावल तालुक्यातील साकळी येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गोपाळ ज्ञानेश्वर आढाळे (वय 27) याचा विवाह होत असताना. मात्र नवरीचा मावसभाऊ रविंद्र शालिक सोनवणे यांनी यावल येथे महिला व बालविकास प्रकल्पाच्या प्रभारी अधिकारी अर्चना आटोले यांच्याकडे या बालविवाह संदर्भात अर्ज…
यावल(सुरेश पाटील) यावल शहरात विकसित भागात पाणीपुरवठा योजनेचा “फियास्को” झाल्यामुळे पाईप लाईन दुरुस्ती साठी खड्डे खोदून ठेवल्याने तसेच खोदलेले खड्डे तात्काळ बुजविले जात नसल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे,तसेच प्रत्येक प्रभागात अनेक ठिकाणी रस्ते साफसफाई आणि गटारी साफ-सफाई करण्यासह,ओला व सुका कचरा वाहतूक व त्यानंतर होणाऱ्या प्रक्रियेमध्ये मोठा घोळ सुरू आहे याकडे यावल शहरातील काही आजी-माजी नगरसेवकांसह अध्यक्ष तसेच विविध संघटना गप्प असल्याने आणि यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल नगरपरिषदेतर्फे पूर्वेकडील विकसित भागात पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकामासह नवीन पाईप लाईन टाकण्यात…
औरंगाबाद : वृत्तसंस्था गुरुवारी एकाने आपल्या मैत्रिणीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली. शुक्रवारी दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यातील एकाने धारदार शस्त्राने दुसऱ्यावर वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. तर, शनिवारी दुपारी देवगिरी कॉलेजमधील एका विद्यार्थिनीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनांमधून शहर सावरत नाही तोच एका जोडप्याच्या खुनाने शहरात खळबळ माजली आहे. औरंगाबाद शहरातील पुंडलीकनगर गल्ली क्रमांक 4 मध्ये एका मंदिरासमोरील इमारतीत ही घटना घडली. येथे राहणाऱ्या कलंत्री दाम्पत्याची हत्या करण्यात आलीय. शामसुंदर हिरालाल कलंत्री आणि किरण शामसुंदर कलंत्री असे हत्या करण्यात आलेल्या जोडप्याचे नाव आहे. कलंत्री यांच्या घरातून दुर्गंध येत होता. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जनता सहकारी बँकेची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह,महाबळ,जळगाव येथे काल झाली. आचार्यदादांनी घालून दिलेल्या कार्यपद्धती, नितीमूल्य, कार्यतत्परता या आदर्शावर बँकेची प्रगती सुरू असून समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. सभेच्या सुरवातीस बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व.डॉ.अविनाशदादा आचार्य यांचे स्मरण करून सर्व संचालक व उपस्थित सभासदांनी स्व. दादांना आदरांजली अर्पण केली.या सभेत सन 2021-2022 या वर्षासाठी 10 टक्के लाभांश देण्यास मंजूरी घेण्यात आली ज्या सभासदांना सभेस प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नसेल अशा सभासदांसाठी सभेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहण्याची व्यवस्था देखील बँकेच्या…
जळगाव ः प्रतिनिधी प्रत्येकाच्या जीवनात लग्न वाढदिवस हा एक अविस्मरणीय क्षण असतो.तो आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रत्येक जण साजरा करत असतो. पण ज्यांना समाजकार्याची आवड असते ते आपला आनंदी क्षण देखील समाजासाठी घालवतात. महापौर जयश्रीताई महाजन , वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर नेवे, महिल पर्यावरण सखी मंच राज्य उपाध्यक्ष मनिषा पाटील ,पर्यावरण प्रतिनिधी वसंतराव पाटील, मनोहर शिंदे यांनी काल आपल्या लग्नाचा वाढदिवस संत सावता नगर येथे वृक्षरोपण करून साजरा केला. एवढेच नव्हेतर पर्यावरण व निसर्ग वाचविण्यासाठी फक्त वृक्षरोपणच नाही तर त्या वृक्षांची संवर्धनाची जबाबदारी देखील स्वीकारली. यात प्रामुख्याने कडुलिंब ,कदंब अर्जुन ,पाखड, बेहडा, करंज, जांभूळ,काशीद या वृक्षांची लागवड करण्यात आली. आपल्या लग्नाचा वाढदिवस…
जळगाव ः प्रतिनिधी पुणे येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे नुकत्याच झालेल्या सातव्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलनात जळगाव येथील कवयित्री पुष्पलता कोळी यांचा मानपत्र व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. संमेलन चित्रकाव्य, लेखन स्पर्धा, परिसंवाद काव्यमैफल व प्रकट मुलाखतीने रंगले. महाकाव्य संमेलनाध्यक्ष हास्यकवी अशोक नायगावकरांनी महाकाव्य संमेलनाने कवींच्या प्रतिभेला फुलण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन केले. खान्देशच्या या कलावंतांची व कवी-कवयित्रींची कीर्ती सर्वदूर राहो असे नायगावकर म्हणाले. कवयित्री पुष्पलता कोळी यांनी महाकाव्य संमेलनामध्ये वृद्धाश्रम’ ही कविता सादर केली. चित्रकाव्य स्पर्धेत कुल्फी’ही कविता सादर केली. त्याबद्दल कोळी यांना नायगावकरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. कवी निवृत्तीनाथ कोळी यांनीही आईआणि बाबा’ ही कविता…
भुसावळ ः प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनीतील बाबा तुलसीदास उदासी यांच्या 39 व्या वर्षी महोत्सवात रविवारी सिंधी समाजातील 56 बालकांवर जनेऊ संस्कार करण्यात आले. धार्मिक विधी प्रमाणे झालेल्या या संस्कारावेळी समाजबांधव उपस्थित होते. सिंधी कॉलनीतील पूज्य बाबा कालिदास उदासी दरबारात वर्षी उत्सवाला शनिवारपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. या महोत्सवात रविवारी सिंधी समाजातील 56 बालकांचे मंत्रोच्चारात जनेऊ (उपनयन) संस्कार करण्यात आले. सुमारे दोन तास हा धार्मिक विधी सुरू होता. यावेळी जनेऊ संस्कार होणाऱ्या बालकांच्या आई-वडिलांसह नातेवाईकांची उपस्थिती होती. या धार्मिक विधीसाठीची संपूर्ण व्यवस्था बाबा तुलसीदास बाबा कालिदास उदासी आश्रमातर्फे करण्यात आली. शहरासह जिल्ह्यातील तसेच मुंबई,कल्याण, नाशिक, इंदूर, सागर, बऱ्हाणपूर, विलासपूर, कटनी,…