Author: Saimat

मेष राशी : मेष राशीच्या लोकांची उदार वृत्ती लोकांना खूप प्रभावित करेल. तुम्हाला नवीन दागिने ऑनलाइन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. झटपट पैसे मिळवण्यासाठी चुकीच्या योजनेत भांडवल गुंतवणार नाही याची काळजी घ्या. अभ्यासात तुमची कामगिरी चांगली राहील. विवाहितांना मुलांचे सुख मिळेल. अधिकारी काम पाहून कौतुक करतील. सासरच्यांकडून चांगली बातमी मिळेल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांसोबत काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बऱ्याच दिवसांपासून…

Read More

यावल ः प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीच्या तिकिटाच्या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचा दर अधिकतम दिडपटीपर्यंत आकारता येईल, असा शासनाचा निर्णय आहे मात्र हा शासन निर्णय धाब्यावर बसवून अनेक खासगी ट्रॅव्हल्सकडून दुपटीपेक्षा अधिक तिकीट दर आकारून प्रवाशांची भरमसाठ लूटमार केली जात आहे. याची तक्रार करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत शिष्टमंडळाने राज्याचे परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांची नुकतीच भेट घेतली. त्या वेळी त्यांनी तक्रारदारांना आश्वासित करण्याऐवजी जबाबदारी झटकणारे उत्तर दिले. या प्रकरणी परिवहनमंत्र्यांनी परिवहन आयुक्तांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी राज्यातील सर्वसामान्य जनता/प्रवाशांची लूटमार रोखण्यासाठी परिवहन विभागाने ठोस कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन उभारू, अशी…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था सुरदेवी परिसरात वडिलांनीच दहा वर्षीय मुलाची गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरदेवी परिसरात घडलेल्या या घटनेनंतर समाजमन सुन्न झाले आहे. संतलाल मडावी असे नराधम दारुड्या बापाचे नाव आहे. गुलशन उर्फ गबरू असे मयत दहा वर्ष मुलाचे नाव आहे. मूळचे मध्यप्रदेशातील संतलाल मडावीला दारूचे व्यसन जडले होते. नव-याच्या या व्यसनाला त्रासून त्याची पत्नी घरून निघून गेली होती. आईने घर सोडल्यानंतर गुलशन आणि त्याची बहीण दोघेही संतलालसोबत रहात होते. दारूच्या आहारी गेलेला संतलाल मुलांना नेहमीच मारहाण करायचा. रविवारी, गुलशनने घरी पाणी भरले नाही म्हणून संतलाल यांनी गुलशनला हातबुक्तीने मारहाण केली.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे गेल्या वर्षी पहिली ते आठवीतील शालेय विद्यार्थ्यांना एकच गणवेश मिळाला, तोही उशिराने. यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी दोन गणवेश देण्याचे नियोजन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे. जिल्ह्यातील 1 लाख 54 हजार 744 विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी 9 कोटी 28 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्य शिक्षण विभागाकडून निधी प्राप्त होताच, त्याचे शालेय समितीकडे त्याचे वितरण केले जाणार आहे.राज्य सरकारकडून गणवेशाचा निधी जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात येणार आहे. निधी प्राप्त होताच तो निधी तालुकास्तरावरून संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीला पाठवला जाणार आहे.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महिलांच्या मागणीनुसार वाघनगर परिसरातील कानाकोपऱ्यात पाणी पोहोचण्यासाठी 18.5 किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्यात येत असून, दोन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.वाघनगरातील पाणीपुरवठा योजनेत रेट्रोफिटिंगच्या अंतर्गत टाकण्यात येत असलेल्या जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. या जलवाहिन्यांमुळे वाघनगरात वाघूरचे शुद्ध पाणी पोहोचणार असल्याने ग्रामपंचायत आणि परिसरातील नागरिकांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला. या परिसराचा झपाट्याने विस्तार होत असून, विकासकामांसाठी आपण येथील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले. गेल्या सुमारे 1 वर्षापासून वाघनगरातील रहिवाशांना वाघूर धरणातील शुद्ध पाणी मिळत असले तरी पुरेशा पाइपलाइनच्या अभावी दूरवरच्या भागांमध्ये पाणी पोहोचले नव्हते. या…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी ओबीसी राजकीय आरक्षण हे सरकारच्या नाकर्तेपणामुळे घालवले गेल्याचा आरोप करत भाजपतर्फे सोमवारी आघाडी सरकारच्या विरोधात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत दुपारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, ओबीसी आरक्षण जरी लागू होणार नसले तरी आगामी निवडणुकीत ज्या जागा ओबीसीसाठी आहेत तेथे ओबीसी उमेदवार देणार असल्याची भूमिकेचा पक्षातर्फे पुनरुच्चार करण्यात आला. ओबीसीप्रश्‍नी भाजपतर्फे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. संजय महाजन, भरत महाजन, रमेश सोनवणे, भारती सोनवणे,जयेश भावसार,देवेंद्र पाटील, हेमराज कोरडे, गोपाळ भंगाळे,संजय भोळे आदी उपस्थित होते. ओबीसीच उमेदवार देणार ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्‍न जरी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे शनिवार दि.28 मे रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित जाहिर व्याख्यानासाठी बंगलोर येथील इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ. आलोक श्रीवास्तव आणि सतिशचंद्र वाणी हे जळगावात येत असल्याची माहिती अध्यक्ष कृष्णकुमार वाणी व प्रा. नंदलाल गादिया यांनी दिली. इस्त्रोद्वारे संचालित चांद्रयान-1, चांद्रयान-2, इनसॅट या सारख्या अनेक मोहीमांमध्ये यशस्वीरित्या सहभाग घेतलेल्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन व समोरासमोर प्रत्यक्ष भेटण्याची संधी जळगावकरांना यानिमित्ताने मिळत आहे. खानदेशात प्रथमच अशा प्रकारचे सर्वांसाठी प्रवेश खुला असलेले व्याख्यान होत असल्याचेही त्यांनी सांगितले. व्याख्यानानंतर अर्धा तास खगोलशास्त्रीय प्रश्‍नांसाठी राखीव असणार असून मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन रोटरी वेस्टतर्फे मानद…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढला आहे. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पालकांनी पाल्यांना मैदानावर खेळण्यासाठी पाठवावे जेणे करून मानसिक आणि शारिरीक विकास होईल. यश-अपयश पचविण्याची क्षमतासुद्धा विकास होईल. सकस आहार, मैदानी खेळ खूप महत्त्वाचे असून त्यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहित करावे असे आवाहन मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी केले. जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा उन्हाळी शिबिराचा (समर कॅम्प) समारोपाप्रसंगी त्याबोलत होत्या. जैन स्पोर्टस अकॅडमीच्या विद्या इंग्लीश स्कूलजवळील मैदानावर झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशन स्टिस्टिमच्या वतीने अविनाश जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व्हाईस प्रेसिडेंट एस. टी. खैरनार, सदस्य यूसूफ मकरा, जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे उपस्थित…

Read More

मेष : आज तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ कुटुंबातील सदस्यांसाठी काढाल आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरी किंवा कौटुंबिक आनंदासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमचे मित्र तुम्हाला पैशांचा पुरवठा पूर्ण करण्यात मदत करतील. विद्यार्थ्यांना आज परीक्षेमध्ये यश मिळणार आहे. आज ८५% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वृषभ : आजचा दिवस कार्यक्षेत्रात लाभदायक ठरेल. तुमचे सर्वांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील. लोकांमध्ये सन्मान मिळेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसाही मिळेल. पदोन्नतीचीही शक्यता आहे. आज ९२% नशिबाची साथ आहे. गाईला हिरवा चारा द्यावा. मिथुन : आजचा दिवस आर्थिक…

Read More