नाशिक : प्रतिनिधी काही दिवसांसाठी जनशताब्दी आणि गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. इगतपुरी येथील टिटोली यार्डातील तांत्रिक कामांमुळे मध्य रेल्वेने आज शनिवारपासून सहा दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे . मेगा ब्लॉकमुळे गोदावरी एक्सप्रेस व मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या विलंबाने धावणार असल्यामुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. येथील मध्य रेल्वेच्या टिटोली यार्डात रेल्वे प्रशासनातर्फे २८ मे ते १ जून या दरम्यान तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहेत . या कामांमुळे मनमाड – मुंबई – मनमाड गोदावरी स्पेशल रेल्वे. २८ मे ते २जूनदरम्यान दोन्ही बाजूंनी धावणार…
Author: Saimat
मुंबई : प्रतिनिधी राज्यात मोठ्याप्रमात पोलीस भरती करण्यात येणार आहे. या भरतीत ७ हजार पदांसाठी १५ जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. याबाबत राज्याच्या गृहविभागातून ही माहिती मिळत आहे. राज्यभरात लवकरच पोलीस भरती सुरू होणार आहे. पोलीस दलातील रिक्त जागांसाठी १५ जूनपासून भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती गृहविभागाच्या सूत्रांनी दिली आहे. विविध पदांसाठी ७ हजार जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. अधिकृत तारखेची माहिती जाहीर केली जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात पोलीस बदल्यांचा विषय चर्चेत आहे. हजारो तरुण पोलीस भरतीच्या दृष्टीने तयारी करीत आहेत. त्यातच आता गृहविभागाने आतापर्यंत साडे पाच हजार जागांसाठी…
मेष : राशीचे लोक या दिवशी प्रत्येक काम चपळाईने पूर्ण करतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. नोकरीत कोणाच्या तरी सहकार्याने काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल, मनाला आनंद होईल. भागीदारी व्यवसायात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. महिला आज घरातील कामात जास्त व्यस्त राहतील. आज ७५% नशिबाची साथ आहे. हनुमानाची पूजा करावी. वृषभ : राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामात चांगले यश मिळवून देणारा आहे, तुमचे परिश्रम आणि नशीब हर प्रकारे साथ देईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्हाला कार्यक्षेत्रात स्वतःहून लाभ मिळेल. प्रॉपर्टी डीलबाबत निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतात. आपली कमाई सावधगिरीने खर्च करा. वाहन चालवताना काळजी घ्या. आज ९०% नशिबाची साथ…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीच्या तयारीचा प्राथमिक टप्पा सुरू झालेला आहे. दूध संघाच्या मतदार संस्था असलेल्या 470 प्राथमिक दूध उत्पादक संस्थांमध्ये ठराव करण्यासाठी विशेष सभांचे आयोजन केले जात आहे. यासाठी सभासदांना सभेचा अजेंडा पाठवण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. जिल्हा दूध संघाची निवडणूक 2015 मध्ये झाली होती. कोरोनामुळे मुदतवाढ मिळाल्यानंंतर या वर्षी ही निवडणूक होत आहे. संघासाठी एकूण 470 मतदार संस्थांकडून मतदान केले जाणार आहे. एकूण 21 संचालक निवडून देण्यासाठी ऑगस्ट महिन्यात संभाव्य मतदार होणार आहे.यासाठी सभासद संस्थांकडून मतदार निश्चित करण्यासाठी ठराव मागवण्यात आले आहेत. सहकार विभागाने सर्व सभासद संस्थांना पत्र देवून ठराव मागवले आहेत. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात…
जळगाव ः प्रतिनिधी काँग्रेसतर्फे राजस्थानातील उदयपूर येथे आयोजित नवसंकल्प शिबिरात ‘भारत जोडो’चा नवसंकल्प करण्यात आला आहे. या अंतर्गत जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्ह्यात 75 किलोमिटर पदयात्राचे आयोजन करण्यात आले आहे.काँग्रेस कार्यकर्ते दररोज 20 किमी पायी चालणार आहेत.या पदयात्रेला 15 ऑगस्टनंतर सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी काल काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. देशातील विषम परिस्थिती आणि आव्हाने लक्षात घेऊन काँग्रेसने शिबिराचे आयोजन केल्याचे सांगितले. धार्मिक आणि जातीय विभाजनाच्या जाळ्यात अडकवून निवडणुकीत हित साध्य करणे हे भाजपचे राजकारण असून तोच मुद्दा या बैठकीत चिंतनाचा विषय होता. विचार मंथनातून सहा विषयांवर सहा गट तयार करण्यात आले. काँग्रेस कार्यकारिणीचे 50 टक्के…
जळगाव ः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात टिकेल असा अहवाल सादर करा, अन्यथा माळी महासंघ रस्त्यावर उतरेल, असा इशारा माळी महासंघाच्या संपर्क अभियानानिमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिला. राजकीय आरक्षणासाठी गठीत समर्पित आयोगाच्या कार्यप्रणालीवर माळी महासंघाचा आक्षेप असल्याने संघर्ष करण्याचा नाराही त्यांनी या निमित्ताने दिला. माळी महासंघाने 15 मेला नागपूरपासून महाराष्ट्रभर संपर्क अभियानाला सुरुवात केली. ही जनसंपर्क यात्रा गुरुवारी जळगावात पोहोचली असता राष्ट्रीय अध्यक्ष ठाकरे यांनी राज्य शासनाने राजकीय आरक्षणासाठी स्थापित केलेल्या समर्पित बांठिया आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे केले. या प्रकरणात सरकारने लक्ष घालून समर्पित आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात टिकेल असा अहवाल सादर करावा अन्यथा माळी महासंघ रस्त्यावर उतरून लढाई लढेल असा…
जळगाव ः प्रतिनिधी इकरा एज्युकेशन सोसायटीतर्फे एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सच्या दोन विद्यार्थिनींनी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले.त्यात हुमैरा अय्युब खान ( बॉटनी) तर सना कौसर नियाजोद्दीन शेख ( बीए उर्दू) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य इब्राहिम पिंजारी, डॉ. चाँद खान, डॉ. फिरदौस, डॉ. तनवीर खान, डॉ. राजेश भामरे, मौलाना मुझम्मील नदवी यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा अध्यक्ष डॉ. करीमभाई सालार, डॉ. इकबाल शाह, एजाज मलिक, अमीन बादलीवाला, डॉ. ताहीर शेख, मजीद सेठ झकेरिया, शेख अब्दुल रशीद, अब्दुल रउफ शेख, प्रा. जफर शेख, नबी बागवान, डॉ. जबिउल्ला,अझीझ सालार, मुहम्मद तारिक शेख यांनी गौरव केला.
जळगाव ः प्रतिनिधी पर्यावरणाच्या रक्षणासाठी इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे ‘प्लास्टिक द्या, प्रदूषण वाचवा’चा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे टाकाऊ प्लास्टिक पुनर्वापराच्या कामाला चालना मिळाली आहे. घरांमधील प्लास्टिक कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या पर्यावरणाच्या प्रदूषणालाही कारणीभूत ठरत आहे. प्लास्टिक नष्ट होत नाही, मग या प्लास्टिकचे करायचे काय? हा प्रश्न सर्वांसमोर आहे. कॅरी बॅग, मॅगी, बिस्कीट, कुरकुरे, कॅडबरी, चिप्स रॅपर, पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, फूड पॅकिंगच्या प्लास्टिक पिशव्या यांची विल्हेवाट लावणे देखील कठीण होते. असा कचरा जनावरांच्या पोटातही जातो. हा कचरा सुपीक जमीनही खराब करतो तसेच प्लास्टिक जाळल्याने विषारी वायूही बाहेर पडतो. त्यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान…
जळगाव ः प्रतिनिधी मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांचे 24 मे 21 रोजी अकस्मात मृत्यू झाले होते त्यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त 25 में 22 रोजी इदगाह कब्रस्तान ट्रस्टतर्फे इदगाह मैदानाच्या बाहेर मुख्य रस्त्याला लागून एक सुंदरशी अत्याधुनिक अशी सार्वजनिक पाणपोई तयार करण्यात येत असून त्या पाणपोईच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. गफ्फार मलिक यांना आपल्या नातवंडावर फार प्रेम होते व त्याचे प्रतीक म्हणून ईदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी सदर पाणपोईच्या कामाची सुरुवात लहान-लहान नातवंडे कुमार मोइज,उमर सईद व हम्माज मालिक यांच्या हस्ते कुदळी मारून करण्यात आली. ही पाणपोई अत्याधुनिक व सर्व सोयीयुक्त तयार करण्यात येत असून…