नवी दिल्ली : वृत्तसंस्था रविवारी नेपाळमध्ये कोसळलेल्या तारा एअरलाइनच्या विमानाच्या अवशेषाचे काही फोटो समोर आले आहेत. मुस्तांग भागातील कोबान परिसरात विमानाचे अवशेष सापडले आहेत. या विमानाचा रविवारी अपघात झाला होता. तारा एअरलाइनची फ्लाइट 9 एनएईटी नेपाळमधील पोखरा येथून जोमसोमला जात होती. सकाळी 10 च्या सुमारास हे विमान अचानक बेपत्ता झाले. दिवसभर शोधमोहीम राबवल्यानंतर दुपारी 4 वाजता विमान कोसळल्याची पुष्टी करण्यात आली. या विमानात तीन क्रू मेंबर्ससह एकूण 22 जण होते. यामध्ये 4 प्रवासी भारतीय होते. तर जर्मनीचे 2 आणि 13 प्रवाशी नेपाळ देशाचे होते. याबाबत अधिक माहिती देताना त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रमुखांनी सांगितले की, घटनास्थळी तपास सुरू आहे. नेपाळ लष्कराचे…
Author: Saimat
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र आणि राज्य सरकारने आपापल्या हिश्श्याचा टॅक्स कमी केला परंतु, पेट्रोल – डिझेल दर कपातीविरोधात पेट्रोल पंप चालक – मालक आक्रमक संघटनांनी नो पेर्चेसचा निर्णय घेतला. केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या दर कपातीमुळे चालक आणि मालकी यांचे हजारो कोटीचे नुकसान झाले. पूर्वकल्पना किंवा कोणतेही नियोजन न करता दर कपात केल्याने त्यांच्यात नाराजी पसरली. याच नाराजीतून 31 मे रोजी तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलची खरेदी केली जाणार नाही असा निर्णय पेट्रोल पंप चालक – मालक यांनी घेतला. संपूर्ण देशभरातील पेट्रोल – डिझेल चालक मालक नो पर्चेसमध्ये सहभागी होणार आहेत तर महाराष्ट्रातील 6500 पेट्रोल – डिझेल चालक मालक नो…
अमृतसर : वृत्तसंस्था सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी, काल पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात मूसेवाला यांचा मृत्यू झाला. मूसेवाला (27) हे जवाहरके या त्यांच्या खेड्यात जीपमधून जात असताना झालेल्या गोळीबारात त्यांच्या शरीरात अनेक गोळ्या शिरल्याचे मानसाचे पोलीस उपअधीक्षक गोबिंदर सिंग यांनी सांगितले. आणि आम्ही बदला घेतला “सर्व भावांना राम राम, सत् श्री अकाल, मूसेवालाच्या हत्येची आज, मी गोल्डी ब्रार, सचिन विश्नोई, लॉरेन्स बिश्नोई ग्रुप याची जबाबदारी घेतो. आमचा भाऊ विकी मिड्दुखेडा याच्या हत्येसाठी त्याने मदत केली होती. त्याचा बदला आम्ही आज घेतला आहे,”असे गोल्डी ब्रारने फेसबुकवर एका पोस्टमध्ये म्हटले…
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले स्वागत जळगाव ः प्रतिनिधी सध्या जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा सुरू असून त्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हातावर शिवबंधन बांधत असून यात जळगावसह धरणगाव तालुक्यातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. तालुक्यातील भोकर आणि धरणगाव येथे शनिवारी शिवसेनेच्या झालेल्या मेळाव्यात अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यात प्रामुख्याने भोकर येथे जळगाव महापालिकेचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपीक राजेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ना. गुलाबराव पाटील हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंंतर सायंंकाळी धरणगाव येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात धरणगाव तालुक्यातील आव्हाणी…
फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी येथील नरेंद्र विष्णू नारखेडे (अध्यक्ष, वै. ह. भ. प. डिगंबर महाराज मठ, पंढरपूर) यांचा राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार 2022 देऊन शिर्डी येथे झालेल्या भव्य कार्यक्रम मध्ये गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राष्ट्रीय 18 वे अधिवेशन व गौरव समारंभ उत्साहात झाला. यावेळी राजकीय सहकार व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय उत्कृष्ठ सामाजीक कार्य केल्या बद्दल हा राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार राज्याचे माजी विरोधीपक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व साईबाबा संस्था शिर्डीचे मा अध्यक्ष व खासदार भाऊसाहेब खासदार वाकचौरे यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रम शांती कमल सभागृहात आयोजित करण्यात आला होता. नरेंद्र नारखेडे यांनी…
धरणगाव ः प्रतिनिधी समाजकारणाचे ध्येय घेऊन शिवसेनेची वाटचाल सुरू असून यात सर्वसामान्य शिवसैनिकांंना न्याय मिळाला आहे.आपल्याला पक्षाने खूप दिले असून आता पक्षाला देण्याची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना भगवा फडकावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.धरणगाव येथील श्रीजी जिनींगच्या परिसरात शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत आयेोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. तर ज्यांच्या विजयासाठी आपण जीवाचे रान केले त्या भाजपच्या खासदारांनी आपल्या विरोधात उमेदवार दिल्याचे सांगत याचे योग्य वेळी उत्तर दिले जाईल असा इशारा देखील दिला. आपल्या भाषणात गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेची…
जळगाव ः प्रतिनिधी आशिया खंडातील सर्वात मोठी सोसायटी असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ‘ग. स. सोसायटी` च्या नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक सोसायटीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात काल रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सोसायटीच्या स्वीकृत संचालकांची अधिकृत निवड जाहिर करण्यात आली. ‘ग. स. सोसायटी` च्या नवनिर्वाचित संचालकांची ही बैठक म्हणजेच सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची पहिलीच सभा होय. सोसायटीच्या अधिनियमानुसार सभेमध्ये दोन स्वीकृत संचालक स्वीकारण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने या सभेत सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे, सहकारचे गटनेते अजबसिंग पाटील आणि अन्य संचालकांच्या उपस्थितीत ‘ग. स. सोसायटी`चे ‘स्वीकृत संचालक` म्हणून जळगाव शहराच्या…
प्रतिनिधी : बोदवड आज आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात भारतीय जनता पार्टी बोदवड़ तालुका व शहराची “विस्तृत आढावा बैठक” शहरातील अग्रसेन भवन येथे संपन्न झाली. सदर बैठकीत जिल्हा परीषदच्या २ गटांचा आढावा व ४ पंचायत समिती गणांचा आढावा घेण्यात आला. पक्ष संघटन, तालुक्यातील बुथ रचना व आगामी सेवा व शासन पंधरवाडयात करायचे कार्यक्रम व आगामी येणाऱ्या निवडणूका तसेच अनेक विवीध विषयांवर लोकप्रीय खासदार रक्षाताईं खड़से, बेटी बचाव-बेटी पढ़ाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फड़के व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.अशोकभाऊ कांडेलकर व जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन यांच्यामार्फत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मनुर ब्रू येथील गजानन शेळके, संभाजी ब्रिगेडला…
मेष राशी: मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमची बुद्धिमत्ता आणि कामावरील निष्ठेचे अधिकारी कौतुक करतील. अनेक छोटी गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. भागीदारी व्यवसायात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. महिला आज घरातील कामात जास्त व्यस्त राहतील. आज तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कठोर परिश्रमाच्या बळावर प्रतिकूलतेवर मात कराल. प्रॉपर्टी डीलबाबत निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतात. आपली कमाई सावधगिरीने खर्च करा. कुटुंबातील सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न कराल. वाहन चालवताना काळजी घ्या. कामासाठी दिवस चांगला आहे,…
विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील एका शेतकऱ्याच्या मालकीच्या विहिरीत सुमारे 4 वर्षीय मादी जातीचे बिबट्या पडला होता.वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी मोठ्या अथक परिश्रमाने विहिरीतून बिबटयाला सुखरूपपणे पिंजऱ्यात बाहेर काढले आहे.ते सुखरूप असून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे यांनी दिली आहे. रविवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान फरदापुर नियतपरिक्षेत्रातील सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील शेतकरी पंढरी संपत मस्के यांच्या मालकी गट क्र.98 मधील खाजगी विहिरीत वन्यप्राणी बिबट्या पडला असल्याची बातमी मिळालयावर वनपरिक्षेत्र अजिंठा व वनपरिक्षेत्र सोयगाव येथील वन कर्मचारी यांची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचून वन्यप्राणी बिबट्या यास यशस्वीरीत्या पिंजऱ्यात घेऊन विहिरीबाहेर काढले.त्यांनतर…