विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी जरंडी येथील तरुण व्यावसायिक तसेच शेतकरी गोविंद चत्रू राठोड(40) यांचे रविवार दी,२९ रोजी सायंकाळच्या वेळेस जळगाव येथे उपचारादरम्यान निधन झाले त्यांच्यावर चाळीस दिवसापासून उपचार सुरू होते सोयगाव- बनोटी रस्त्यावरील सुकी नदी(रामपूर तांडा फाट्या जवळ अपघात झाला होता चाळीस दिवसांच्या उपचारादरम्यान त्यांचा आज जळगाव येथे मृत्यू झाला त्यांच्यावर उद्या जरंडी येथे अंत्ययसंस्कार होणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे जरंडी येथील माजी सरपंच अमृत चत्रू राठोड यांचे ते लहान बंधू होते, त्यांच्या निधनाची वार्ता कळताच जरंडीगावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
Author: Saimat
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील घोसला गावाची प्रतिष्ठेची समजली जाणारी विविध विकास सोसायटीचे लक्ष वेधी निवडणूक प्रक्रिया पार पडली.घोसला विविध विकास सोसायटी मध्ये अदभूत युती पाहण्यात मिळाली.सेवाभावी शेतकरी पँनलच्या १२ पैकी १२ जागा जिंकून दणदणीत विजय साजरा करतात आला.घोसला विकास सोसायटी मध्ये दोन पँनेल होते.शेतकरी सहकारी पँनल व सेवाभावी शेतकरी पँनेलचे प्रमुख घोसला गावाचे मा.चेअरमन शरद महाजन,प्रकाश नारायण पाटील,गुणवंत विक्रम पाटील,कैलास नामदेव, सुभाष पंडित बोरसे, सुभाष गंगाराम उपसरपंच, विनोद अर्जुन,दीपक सुभाष गवळी,भिका विष्णू बावस्कर,शांताराम पाटील. सेवाभावी शेतकरी पँनल होते.१२ पैकी १२ जागा जिंकून यानी पुर्ण आपले वर्चस्व सिध्द केले आहे. या पँनेल चे विजयी उमेदवार १) सचिन अरुण पाटील…
जळगाव ः प्रतिनिधी ‘राजाने एक तर उडी टाकू नये, टाकली तर माघार घेवू नये’, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर काल निशाणा साधला. राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. जळगावात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते निलेश बोरा यांच्या घरी मंत्री बच्चू कडू यांनी काल सकाळी भेट दिली असता ते बोलत होते. नवनीत राणांना ईडीची नोटीस आली होती. भाजपाचे पंतप्रधान मोदी आणि शहा यांनी त्यांना तो कार्यक्रम दिला. तुम्ही जर हनुमान चालीसा म्हटली तर ईडीचे संकट टळेल, अशा शब्दात भाजप व राणा यांनाही बच्चू कडू यांनी टोला लगावला. कार्यक्रमादरम्यान सत्कार समारंभानंतर मंत्री कडू…
जळगाव ः प्रतिनिधी केंद्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे हरियाणा येथे 3 ते 13 जून दरम्यान होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया यूथ गेम्ससाठी बॉक्सिंग क्रीडा प्रकारात महाराष्ट्र संघात संध्या मोरेची 48-50 किलो वजन गटात निवड करण्यात आली. तिला प्रशिक्षक नीलेश बाविस्कर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ. अमोल पाटील, सहसचिव नयन राणे, खजिनदार रोहिदास पाटील, रवि नरवाडे, संतोष सुरवाडे,डॉ.सचिन वाणी, डॉ.सारिका वाणी, सूरज नेमाडे, राकेश पाटील,पीयूष भोसले, राकेश पाटील, विशाल बाविस्कर, विजय पाटील, शुभांगी भोसले, शारदा पाटील यांनी संध्या मोरे हिचा गौरव केला. या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.
जळगाव ः प्रतिनिधी केशव स्मृती प्रतिष्ठानतर्फे एनजीओ क्लिनिक उपक्रमांतर्गत ग्रामविकासाच्या रोजगार संधी व प्रकल्प-प्रस्ताव लेखन कार्यशाळा 1 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. संभाजी राजे नाट्यगृहात सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत ही कार्यशाळा होईल. स्वयंसेवी काम करणाऱ्या संस्थांमधील कार्यकर्त्यांना संस्थेत चालणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी किंवा प्रस्तावित उपक्रमासाठी निधीची आवश्यकता असते. त्यासाठी योग्य प्रकारे आपल्या कामाची मांडणी करणे गरजेचे असते. उपयोगी असणारे प्रकल्प, प्रस्ताव लेखनाचे मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार आहे. सीएसआर व प्रकल्प-प्रस्ताव विषयावरील तज्ज्ञ डॉ. प्रसन्न पाटील यांचे प्रकल्प प्रस्ताव लेखन या विषयावर तर ग्रामविकास व रोजगार या विषयातील सुमारे 20 वर्षांचा अनुभव असलेले डॉ. प्रसाद देवधर यांचे मार्गदर्शन…
जळगाव ः प्रतिनिधी आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका व पक्षसंघटन वाढीसाठी जिल्ह्यात चार दिवस शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत शहरात वातावरण निर्मितीसाठी शिवसेना व युवासेनेच्यावतीने काल दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले.त्यानंतर महाबळ परिसरात युवासेनेच्या वतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर किट्सचे वाटप करण्यात आले. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेनेचे राज्यभरातील नेते जळगावात दाखल झाले आहेत.जिल्हाभरात 26 ते 29 मे दरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत काल शहरात वातावरण निर्मिती व्हावी यासाठी नेहरू चौकापासून दुचाकी रॅली काढण्यात आली. टॉवर चौक, चित्रा चौकमार्गे रॅली निघून शिवतीर्थ मैदानाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक मार्गे जावून मेहरूण भागात रॅलीचा…
जळगाव ः प्रतिनिधी आरटीई अर्थात खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना 19 ते 27 मे दरम्यान प्रवेश निश्चितीची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र प्रतीक्षा यादीतील एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित न झाल्याने शिक्षण विभागाच्या माध्यमातून 3 जूनपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दरवर्षाप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. यंदा जिल्ह्यातील 285 शाळांतील 3147 जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जाते आहे.त्यानुसार 2940 विद्यार्थ्यांची निवड यादी तर 2399 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील 2940 पैकी…
जळगाव ः प्रतिनिधी गेल्या 13 मे रोजी पहाटे 2.15 वाजेच्या सुमारास डी मार्टच्या पाठीमागे आदर्शनगर भागात चार वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग मधील मिळून एकूण सहा मोटारसायकल व दोन फोर व्हीलर गाड्या अज्ञात व्यक्तीने जाळून 18 लाख रु.चे नुकसान केले होते. गाडी मालकांच्या भावना व संवेदना अतिशय तीव्र होत्या.कोणाशी काही वैर नाही तरी त्यांचे असे नुकसान झाले होते. नुकसानीला जबाबदार तरी कोणाला धरायचे व त्याने असे नुकसान केले तरी का? असा सर्वांच्या पुढे प्रश्न होता. या प्रकरणी पंधरा दिवसात सतत तपासाची चक्रे फिरवून या गुन्ह्याची उकल रामानंद पोलीस स्टेशनचे सिनिअर पोलीस इन्स्पेक्टर विजय शिंदे व त्यांच्या टिमने केली असून यातील आरोपीचा शोध…
उस्मानाबाद : वृत्तसंस्था उस्मानाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेपर सोडवताना कॉपी करत असलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकाने पकडलं. त्यामुळे तणावात आलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कृषी पदवीका अभ्यासक्रमाची परीक्षा सुरु असून समुद्रवाणी इथं राहणारा 21 वर्षांचा स्वप्निल ढोबळे हा विद्यार्थी ही परीक्षा देत होता. परीक्षेदरम्यान स्वप्निल कॉपी करत असल्याचं परीक्षा विभागाच्या पथकाला आढळलं. पथकाने त्याला रंगेहाथ पकडलं. या कारणासाठी त्याला 1 वर्ष निलंबित करण्यात आलं. कारवाई झाल्याने स्वप्निल प्रचंड तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्या करण्याच निर्णय घेतला. स्वत:च्या शेतात जाऊन त्याने कडूलिंबाच्या झाडाल गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.