Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी काँग्रेसतर्फे राजस्थानातील उदयपूर येथे आयोजित नवसंकल्प शिबिरात ‘भारत जोडो’चा नवसंकल्प करण्यात आला आहे. या अंतर्गत जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्ह्यात 75 किलोमिटर पदयात्राचे आयोजन करण्यात आले आहे.काँग्रेस कार्यकर्ते दररोज 20 किमी पायी चालणार आहेत.या पदयात्रेला 15 ऑगस्टनंतर सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी काल काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. देशातील विषम परिस्थिती आणि आव्हाने लक्षात घेऊन काँग्रेसने शिबिराचे आयोजन केल्याचे सांगितले. धार्मिक आणि जातीय विभाजनाच्या जाळ्यात अडकवून निवडणुकीत हित साध्य करणे हे भाजपचे राजकारण असून तोच मुद्दा या बैठकीत चिंतनाचा विषय होता. विचार मंथनातून सहा विषयांवर सहा गट तयार करण्यात आले. काँग्रेस कार्यकारिणीचे 50 टक्के…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात टिकेल असा अहवाल सादर करा, अन्यथा माळी महासंघ रस्त्यावर उतरेल, असा इशारा माळी महासंघाच्या संपर्क अभियानानिमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिला. राजकीय आरक्षणासाठी गठीत समर्पित आयोगाच्या कार्यप्रणालीवर माळी महासंघाचा आक्षेप असल्याने संघर्ष करण्याचा नाराही त्यांनी या निमित्ताने दिला. माळी महासंघाने 15 मेला नागपूरपासून महाराष्ट्रभर संपर्क अभियानाला सुरुवात केली. ही जनसंपर्क यात्रा गुरुवारी जळगावात पोहोचली असता राष्ट्रीय अध्यक्ष ठाकरे यांनी राज्य शासनाने राजकीय आरक्षणासाठी स्थापित केलेल्या समर्पित बांठिया आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह उभे केले. या प्रकरणात सरकारने लक्ष घालून समर्पित आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात टिकेल असा अहवाल सादर करावा अन्यथा माळी महासंघ रस्त्यावर उतरून लढाई लढेल असा…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी इकरा एज्युकेशन सोसायटीतर्फे एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्‌स ॲण्ड सायन्सच्या दोन विद्यार्थिनींनी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले.त्यात हुमैरा अय्युब खान ( बॉटनी) तर सना कौसर नियाजोद्दीन शेख ( बीए उर्दू) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य इब्राहिम पिंजारी, डॉ. चाँद खान, डॉ. फिरदौस, डॉ. तनवीर खान, डॉ. राजेश भामरे, मौलाना मुझम्मील नदवी यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा अध्यक्ष डॉ. करीमभाई सालार, डॉ. इकबाल शाह, एजाज मलिक, अमीन बादलीवाला, डॉ. ताहीर शेख, मजीद सेठ झकेरिया, शेख अब्दुल रशीद, अब्दुल रउफ शेख, प्रा. जफर शेख, नबी बागवान, डॉ. जबिउल्ला,अझीझ सालार, मुहम्मद तारिक शेख यांनी गौरव केला.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी पर्यावरणाच्या रक्षणासाठी इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे ‘प्लास्टिक द्या, प्रदूषण वाचवा’चा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे टाकाऊ प्लास्टिक पुनर्वापराच्या कामाला चालना मिळाली आहे. घरांमधील प्लास्टिक कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या पर्यावरणाच्या प्रदूषणालाही कारणीभूत ठरत आहे. प्लास्टिक नष्ट होत नाही, मग या प्लास्टिकचे करायचे काय? हा प्रश्‍न सर्वांसमोर आहे. कॅरी बॅग, मॅगी, बिस्कीट, कुरकुरे, कॅडबरी, चिप्स रॅपर, पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, फूड पॅकिंगच्या प्लास्टिक पिशव्या यांची विल्हेवाट लावणे देखील कठीण होते. असा कचरा जनावरांच्या पोटातही जातो. हा कचरा सुपीक जमीनही खराब करतो तसेच प्लास्टिक जाळल्याने विषारी वायूही बाहेर पडतो. त्यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांचे 24 मे 21 रोजी अकस्मात मृत्यू झाले होते त्यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त 25 में 22 रोजी इदगाह कब्रस्तान ट्रस्टतर्फे इदगाह मैदानाच्या बाहेर मुख्य रस्त्याला लागून एक सुंदरशी अत्याधुनिक अशी सार्वजनिक पाणपोई तयार करण्यात येत असून त्या पाणपोईच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. गफ्फार मलिक यांना आपल्या नातवंडावर फार प्रेम होते व त्याचे प्रतीक म्हणून ईदगाह ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी सदर पाणपोईच्या कामाची सुरुवात लहान-लहान नातवंडे कुमार मोइज,उमर सईद व हम्माज मालिक यांच्या हस्ते कुदळी मारून करण्यात आली. ही पाणपोई अत्याधुनिक व सर्व सोयीयुक्त तयार करण्यात येत असून…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी खासदार सुप्रियाताई सुळे यांचे देशाच्या व राज्याच्या राजकारण व समाजकारणात मोठे योगदान आहे.त्यामुळेच भारतीय संसदेने त्यांना एक दोन नव्हे तर तब्बल सात वेळेस संसदरत्न पुरस्कार दिलेला आहे. असे असतांना देखील भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटिल यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी “ घरी भाकरी थापा , स्मशानात जा… असे बेताल व निंदनीय वक्तव्य केलेले आहे , असे वक्तव्य करून पाटील यांनी सुप्रिया सुळे व समस्त नारीशक्तीचा अपमान केलेला आहे. या उलट चंद्रकांत पाटील यांचे महाराष्ट्रात काहीच योगदान नाही, म्हणूनच स्वतःच्या कोल्हापूर मतदारसंघात निवडणूक येण्याची देखील त्यांची लायकी नाही. एका महिलेला डावलून राजकीय अन्याय करत कोथरूड मतदार संंघात महिलेला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था अचानक वरपक्षाकडून लग्नासाठी नकार देण्यात आला…ही कोणच्या सिनेमाची कहाणी नाही तर खऱ्या आयुष्यात घडलेली घटना आहे. लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने मुलीला लग्नासाठी नकार दिला. यामागील कारणंही तसं धक्कादायकच होतं. लग्न ठरलेल्या मुलीच्या एक्स बॉयफ्रेंडने नवऱ्या मुलाला मुलीचे काही पर्सनल फोटो पाठवले. यानंतर नवऱ्या मुलाकडून लग्नासाठी नकार देण्यात आला. ही घटना युपीच्या देवरिया जिल्ह्यातील आहे. 23 मे रोजी टिळक कार्यक्रम झाल्यानंतर 25 मे रोजी वरात येणार होती. लग्नाची सर्व तयारीही झाली होती. मात्र मुलाकडून लग्नाचा नकार येताच सर्वांच्या आनंदावर पाणी फिरलं. मिळालेल्या माहितीनुसार, लग्न ठरलेल्या मुलीचं गावातील एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. हा मुलगा सतत नवऱ्या मुलाला फोन करून…

Read More

यावल (सुरेश पाटील) यावल शहरात होणारा पाणीपुरवठा तीन दिवसाआड तसेच विकसित भागात नवीन पाईप लाईन मधून होत असलेल्या पाणीपुरवठ्याचा “फियास्को” झाल्याने अनियमित आणि अल्पदाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या लेखी तक्रारी यावल नगरपालिकेत करण्यात आल्या. यावल नगरपालिकेतर्फे करण्यात आलेली पाईप लाईनची कामे आणि वीज पुरवठ्यासाठी एक्सप्रेस फिडरचे अंदाजे 42 लाख रुपयाचे काम (कामे प्रत्यक्षात कोणी किती टक्केवारी खाऊन चमकोगिरी करून घेतली हे यावलकरांना चांगल्याप्रकारे माहीत आहे)मंजूर एस्टिमेट प्रमाणे ठेकेदाराने पाईप लाईनचे काम न केल्याने आणि टक्केवारी,लाच खाणारे भोंगळ कारभार करून काही लोकप्रतिनिधी आता सत्ते अभावी भुमिगत झाले असून निवडणुकीत पुन्हा विजयी होण्यासाठी ठराविक आपल्या पन्टरांच्या माध्यमातून समाजसेवेचा देखावा करीत हितचिंतक जनतेच्या संपर्कात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यासाठी नेत असतांना पोलिसांच्या तावडीतून पलायन करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला येथून ताब्यात घेत अटक केली आहे. महेश शिवदास दिक्षे रा.लोणी ता. रिसोड जि. वाशीम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की, भुसावळ रेल्वे पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याच्या कारागृहात रवानगीचे आदेश दिले होते. पोलिस पथकाच्या निगराणीत त्याला उप कारागृहात नेत असतांना त्याने चतुराईने पोलिसांना चकवा देत पलायन केले होते. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील हे.कॉ. लक्ष्मण पाटील, पोना किशोर…

Read More

यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील न्हावी ग्रामपंचायत तर्फे मोर नदीवर ठेकेदारामार्फत संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे ते अत्यंत निकृष्ट प्रतीचे होत आहे ते निकृष्ट प्रतीचे झालेले बांधकाम काढून उत्कृष्ट चांगल्या प्रतीचे बांधकाम करून घेण्याची मागणी यावल तालुका भीम आर्मी तर्फे करण्यात आली आणि असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भीम आर्मी पदाधिकाऱ्यांनी दिला आला आहे. भीम आर्मी यावल तालुकाध्यक्ष प्रवीण बाळू डांबरे व त्यांचे सहकारी पदाधिकारी सचिन पारधे,बबलू गजरे,जितेंद्र गायकवाड यांनी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे दि.25मे2022रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,न्हावी ग्रामपंचायत तर्फे15 व्या वित्त आयोगातून मोर नदीवर संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे सदर बांधकाम अतिशय निकृष्ट…

Read More