पाळधी ता.धरणगाव ः वार्ताहर विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त गायक राजू बागुल विरुद्ध वैशाली किरण यांचा भीम गीतांचा कार्यक्रम झाला. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमात जळगाव जिल्हा आंबेडकरी समाजातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. भीमगीतांच्या कार्यक्रमात राजू बागुल व वैशाली किरण यांनी आपल्या गायनातून प्रबोधन केले. त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी झाली.कार्यक्रमाचे आयोजन धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले होते. कार्यक्रमास महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, ॲड.राजेश झाल्टे, जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, नगरसेवक सुरेश सोनवणे, शालीक गायकवाड, दिलीप सपकाळे, संजय सपकाळे, शिवसेनेच्या जळगाव उपशहर प्रमुख सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी आधुनिक विचारसरणीमुळे एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत असून विभक्तीकरण वाढले आहे. त्यामुळे व्यक्ती समाजापासून दूर जात आहे. यासाठी आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या समाजात राहून सामाजिक बांधिलकीही जपणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चिमुकले राम मंदिराचे विश्वस्त दादा महाराज जोशी यांनी केले. चितोडे वाणी समाज कार्यकारिणीतर्फे मायादेवीनगरातील रोटरी हॉलमध्ये विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठांच्या सन्मान सोहळा झाला. अध्यक्षस्थानी समाज अध्यक्ष प्रा. डॉ. उमेश वाणी हे होते. यावेळी शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात कार्य केलेल्या 50 विद्यार्थ्यांचा गुणगौरवसह वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या 40 ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. विश्वस्त दादा महाराज जोशी पुढे म्हणाले की, समाजाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे.आपले कुटुंब एकत्रित ठेवण्याबरोबरच आई-वडिलांचा…
जळगाव ः प्रतिनिधी जगातील ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या व भारतातील प्रथम क्रमांकाची कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडने संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाही तसेच चालू आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणापूर्वीच्या आर्थिक निकालास मंजुरी दिली. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक काल झाली. चौथ्या तिमाहीमध्ये एकत्रित उत्पन्नात 16.2 टक्के वाढ दर्शवली आहे. या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न 7119.5 कोटी रुपये आहे. जे गतवर्षी याच काळात केवळ 5666.9 कोटी रुपये होते. व्यवसायात 25.6 टक्के वाढ कंपनीच्या एकल व एकत्रित व्यवसायात 25.6 टक्के वाढ झाली. आणि कर व्याज व घसारा पूर्व नफा जवळजवळ शंभर टक्क्याने वाढला.तिसऱ्या तिमाहीच्या शेवटी आम्ही…
जळगाव ः प्रतिनिधी एका इंग्रजी चॅनेलवर ज्ञानवापी फाईल्स हा चर्चेचा कार्यक्रम चालू असताना त्या कार्यक्रमात उपस्थित दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या श्रीमती नपुर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या व त्यांची पत्नी हजरत आयशा यांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने करून सर्व मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या व दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी नको शर्मा यांच्या विरोधात भादवि 295, 153, 500, 52 अन्वये कायदेशीर कारवाई करण्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलीस अधीक्षकांची प्रतिनिधी गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना लेखी तक्रार दिली…
जळगाव ः प्रतिनिधी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यावर्षी घेण्यात आलेल्या 685 जागांसाठीच्या परीक्षांचे अंतिम निकाल काल जाहीर झाले असून यात दीपस्तंभ परिवारातील सदस्य असलेल्या हर्षल राजेश महाजन याने यूपीएससी परीक्षेत यशाची पताका फडकावली आहे. हर्षल महाजनने देशात 408 रँक प्राप्त केली आहे.हर्षलचे मुळ गाव जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव असून त्याचा जन्म जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील असून त्याचे पुढील शिक्षण मुंबई येथे झाले आहे.हर्षलचे दहावीपर्यंतचे शिक्षण पार्ले टिळक विद्यालय येथे तर बारावीचे शिक्षण पेस ज्युनियर कॉलेज मुंबई येथे झाले आहे.त्यानंतर हर्षलने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथून बी – टेक चे शिक्षण पूर्ण केले आहे. हर्षलचे वडील राजेश महाजन पर्जन्य जलवाहिनी…
मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी संस्मरणीय असेल. गोड बोलण्याच्या जोरावर आणि हुशारीने कामात यश मिळेल. कामासाठी आजचा दिवस उत्तम राहील आणि कामात लाभदायक फळांचे प्राबल्य राहील. बोलण्यात गोडवा राहील, त्यामुळे मित्र-मैत्रिणींसोबतच्या नात्यात गोडवा राहील. आज तुमच्या घरातील काही शुभ कार्य पूर्ण होतील. आज ८५% नशिबाची साथ देईल. मंगळवारी उपवास ठेवा आणि हनुमानाची पूजा करा. वृषभ : राशीच्या लोकांना आज कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात किंवा ते प्रत्यक्षात येऊ शकतात. आज भाग्य तुम्हाला साथ देईल. आज तुम्ही हुशारीने काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. नोकरीत कोणाच्या…
जळगाव : प्रतिनिधी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना शेती आणि शेती उद्योगाची चालना मिळावी या मुख्य उद्देशाने गत 7 वर्षांपासून जैन हिल्स येथे संम्मेलन भरविण्यात येत आहे. गुजरात व महाराष्ट्रातील राज्यातील 135 शाळांतील 11 हजार विद्यार्थ्यांमधून 800 विद्यार्थ्यांची निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या 8 व्या संम्मेलनाचे आयोजन 1 ते 5 जून दरम्यान जैन हिल्स येथे करण्यात आलेले आहे. 1 व 2 तसेच 4 व 5 जून अशा दोन टप्प्यात हे संम्मेलन होईल. शाळाशाळांमधून फालीच्या माध्यमातून सुमारे 25 हजार हून अधिक विद्यार्थ्यांना शिकविण्यात आलेले आहे. फाली व गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष नादीर गोदरेज , यूपीएलचे अध्यक्ष रजनिकांत श्रॉफ, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक तथा…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील अहिरवाडी येथील मोहगण रस्त्यावरील बाहेरपूरा परिसरातील एका घरातून घरमालक घरात झोपलेले असतांनाच अज्ञात चोरट्यांनी दिड लाखाच्या रोकडसह सुमारे 15 लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील अहिरवाडी येथे मोहगण रस्त्यावर बाहेरपूऱ्यातील रमेश शामराव महाजन यांचे घर आहे. रात्रीच्या सुमारास महाजन कुटुंबिय झोपलेले असतांनाच चोरट्यांनी घराच्या मागे शेतातील तारकंपाऊंड तोडून घराच्या मागील भिंतीचे सिमेंट खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाटातून सोन्या-चांदीच्या दागिने व दिड लाखाच्या रोकडसह सुमारे 15 लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. चोरी झाली तेव्हा घरमालक रमेश महाजन त्यांची पत्नी, आई हे समोरील खोलीत झोपलेले…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रखडलेली नालेसफाई दूषीत पाणीपुरवठा व अमृत योजनेअंतर्गत नळ कनेक्शनमुळे थांबलेली रस्त्यांची कामे या तीन मुद्यांवरून आजची महासभा गाजली. महापौर जयश्रीताई महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या महासभेत 33 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले असून त्यावर सभागृहात चर्चा सुरू झाली आहे. त्यात महिला मालमत्ताधारकांना करात 5 टक्के सूट देण्यात येणारा प्रस्ताव मंजूर झाल्याचे वृत्त असून ही शहरातील महिलांना मनपाकडून मिळालेली भेट समजली जात आहे. चर्चेत कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, उज्ज्वला बेंडाळे, रिजवान खाटीक, सदाशिव ढेकळे आदींनी सहभाग घेतला.महापालिकेची महासभा आज सकाळी 11 वाजता मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात सुरू झाली. व्यासपीठावर महापौर जयश्रीताई महाजन यांच्यासह आयुक्त…