जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा सहकारी दूध संघाने आपल्या सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात आजपासून (एक जून) दोन रुपयांची वाढ केली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी दरवाढ आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील ग्राहकांना मिळणारी किमतीतील सवलत संपुष्टात आली असून कायद्यातील कमाल किरकोळ किमतीबाबतच्या तरतुदीमुळे हा निर्णय घेतल्याचे दूध संघाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील ग्राहकांपेक्षा दोन रुपये कमी किमतीत दूध उपलब्ध केले होते मात्र एकाच वस्तूची कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकत नाही, अशी तरतूद कायद्यात आहे.त्यामुळे बुधवारपासून ही किंमत वाढत आहे. पण ती अन्य प्रतिस्पर्धी उत्पादक कंपन्यांपेक्षा जास्त झालेली नाही, असेही संघाच्या वतीने सांगण्यात आले. संघाने उत्पादकांना चार…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त शाखा अभियंता हिरामण हरीभाऊ चव्हाण यांनी काल शिरसोली रस्त्यावरील गरीब वस्तीत 30 गरजू मुलांना चप्पल व बुटांचे वाटप केले. जळगाव शहराचे तापमान अधिक असून, काही दिवसांपूर्वी हिरामण चव्हाण यांनी गरीब मुलांना भर उन्हात अनवाणी पायाने फिरताना पाहिले.त्याचवेळी त्यांनी या गरिबांना मदतीचा हात देण्याचा निश्चय केला. त्यानुसार मंगळवारी चप्पल व बुटाचे गरीब मुलांना वाटप केले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पहाण्यासारखा होता.
जळगाव : प्रतिनिधी बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कमलाकर फडणीस यांनी सांगितले की,प्रबोधचंद्रिकेचे तत्कालीन संपादक वा. ना. फडणीस यांनी सावरकरांची चाळीसगाव ते जळगाव रेल्वे प्रवासात मुलाखत घेतली होती. सावरकरांची काळ्या पाण्याच्या शिक्षेवरून सुटका झाल्यावर विशेषांक त्यांनी काढला होता. तो भगूर येथील तात्यारावांच्या जन्मस्थळी शोकेसमध्ये ठेवलेला आहे. अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर यांनी हिंदुत्ववादींसाठी तीर्थक्षेत्र असलेल्या सावरकरांचे नाशिक जिल्ह्यातील जन्मस्थळ भगूर येथे आगामी काळात भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला. सहलीचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी नियोजन समितीला केली. महिला मंडळ अध्यक्षा मनीषा दायमा आदी उपस्थित होते.
जळगाव ः प्रतिनिधी महिला पर्यावरण सखी मंच व जायंटस ग्रूप ऑफ तेजस्विनी जळगाव यांच्या संयुक्तं विद्यमाने 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालचित्रकला स्पर्धा 2022 चे आयोजन 4 जून रोजी संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत महात्मा गांधी उद्यान,नवीन बस स्टँड जवळ करण्यात आले आहे. ही स्पर्धा फक्त जळगाव शहरातील विद्यार्थी (मुलामुलींसाठी) आहे. तरी सर्व विद्यार्थ्यानी अवश््य सहभागी व्हावे.महिला पर्यावरण सखी मंच जळगाव आयोजीत कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे नोंदणी 2 जूनपर्यंत करावी. नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. मनिषा पाटील राज्य उपाध्यक्षा महिला पर्यावरण सखी मंच- 94206 62093,छाया पाटील जिल्हा उपाध्यक्ष- 94215 16861,नेहा जगताप शहर प्रमुख-…
मेष राशी : आज मेष राशीच्या लोकांचे नशीब त्यांच्या कौशल्याने जागृत होईल आणि तुम्हाला सर्व कामात यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक बोला. तुमचे तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांना आज नोकरीत चांगल्या प्रतिष्ठेसह यश मिळेल. पदोन्नती किंवा संबंधित बोलणी आज होतील. आज मुला-मुलींकडून कौतुकास्पद काम होईल. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल. आज तुम्ही बहुतांश उपक्रम यशस्वीपणे हाताळण्यास सक्षम असाल.…
यावल : प्रतिनीधी तालुक्यातील गुरुमाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चिखली बुद्रुक येथील श्री दत्त हायस्कूल मधील उपशिक्षक एन.एस.बडगुजर सर हे 29 वर्षांची प्रदीर्घ यशस्वी सेवा करून आज मंगळवार दि.31 मे 2022 रोजी त्यांच्या पदावरून निवृत्त झाले त्यांना गुरुमाई शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी तसेच हायस्कूल मधील मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्नेहपूर्ण निरोप दिला. एन.एस.बडगुजर सर यांना संस्थेचे माजी प्राचार्य तथा कला वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक पी.एस.पाटील सर व यावल येथील मुलींचे विकास विद्यालयातील राजेंद्रभाऊ अमृत चौधरी,शाळेचे मुख्याध्यापक के.यु.पाटील सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. शाळेत सत्काराला उत्तर देताना त्यांनी संस्थेकडून मिळालेल्या मार्गदर्शन व सहकार्य…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील क्व्ोश्चन मार्क ब्रॅण्ड प्रस्तुत मिस्टर ॲण्ड मिसेस तसेच किड्स फॅशन शो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यात लहान गटात वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील आदिती सुधीर गुरचल हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. आदिती ही ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथील इंटक युनियनचे जेसीएम मेंबर सुधीर गुरचल यांची सुकन्या आहे.आदितीला प्रमुख पाहुणे गोपाल दर्जी,पवन टाक, सुशांत भावसार तसेच परीक्षक मुबंईचे शुभम जैन, उत्तराखंडचे दीपक उपरेती, प्रीती उपरेती, नाशिकच्या मुरण्मयी अकोलेकर, सिद्धार्थ अहिरे, जयश्री अहिरे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकचे सन्मानचिन्ह व ‘मिस किड्सच्या किताब’ ने सन्मानित करण्यात आले. आदिती गुरचलचे सर्वत्र कौतक होत आहे.
जळगाव ः प्रतिनिधी यावल शहरातील मेनरोडवरील श्री साईबाबा मंदिराचा 16वा वर्धापन दिन आज मंगळवारी साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजता श्रींचा अभिषेक, 7 वाजता नित्य आरती, सकाळी 9 वाजता होम-हवन, दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती झाली तर सायंकाळी 5 वाजता पालखी मिरवणूक शहरातून काढली जाणार आहे. पालखी मिरवणुकीची सांगता मंदिरात झाल्यावर सायंकाळी 7 वाजता श्रींची धूप आरती व नंतर भाविकांना महाप्रसाद वितरण केले जाणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ साईभक्तांनी घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष संजय नेवे, उपाध्यक्ष गोपालसिंग पाटील, सभासद तोतारामदादा नन्नवरे, गणेश बुरुजवाले, ॲड.अशोक सुरळकर, विश्वनाथ…
जळगाव ः प्रतिनिधी हजरत बिलाल सोसायटीतर्फे पंचमुखी हनुमान मंदिराजवळ हिंदू-मुस्लिम एकतेसाठी कुस्त्यांची दंगल घेण्यात आली. त्यात खान्देश केसरी, श्री केसरी, चॅम्पियन यांच्या कुस्त्यांच्या दंगल झाल्या. यात 500 मल्लांनी डाव अजमावला. कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक मल्लांनी सहभाग नोंदवला. त्यात राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते नितीन गवळी, भूषण पाटील, अली पहिलवान (दोघे नाशिक) यांनी विजय प्राप्त केला. तर मुलींच्या कुस्तीत राष्ट्रीय विजेत्या सय्यद आमरीन, श्वेता सोलंकी (दोघे औरंगाबाद) यांनी विजय प्राप्त केला. मुला-मुलींच्या स्पर्धेत राष्ट्रीय विजेता अश्विन सपकाळ (करमाळ, जि. जालना), रेहान पहिलवान (जामनेर), सुनीता महाजन, मौला अली तालिम आदींनी कुस्ती खेळून विजय प्राप्त केला. दंगलचे उद््घाटन हनुमान व्यायामशाळेचे संचालक दिलीपबापू पाटील यांनी केले.…