Author: Saimat

धरणगाव ः प्रतिनिधी समाजकारणाचे ध्येय घेऊन शिवसेनेची वाटचाल सुरू असून यात सर्वसामान्य शिवसैनिकांंना न्याय मिळाला आहे.आपल्याला पक्षाने खूप दिले असून आता पक्षाला देण्याची आवश्‍यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना भगवा फडकावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.धरणगाव येथील श्रीजी जिनींगच्या परिसरात शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत आयेोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. तर ज्यांच्या विजयासाठी आपण जीवाचे रान केले त्या भाजपच्या खासदारांनी आपल्या विरोधात उमेदवार दिल्याचे सांगत याचे योग्य वेळी उत्तर दिले जाईल असा इशारा देखील दिला. आपल्या भाषणात गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेची…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी आशिया खंडातील सर्वात मोठी सोसायटी असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ‘ग. स. सोसायटी` च्या नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक सोसायटीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात काल रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सोसायटीच्या स्वीकृत संचालकांची अधिकृत निवड जाहिर करण्यात आली. ‘ग. स. सोसायटी` च्या नवनिर्वाचित संचालकांची ही बैठक म्हणजेच सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची पहिलीच सभा होय. सोसायटीच्या अधिनियमानुसार सभेमध्ये दोन स्वीकृत संचालक स्वीकारण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने या सभेत सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे, सहकारचे गटनेते अजबसिंग पाटील आणि अन्य संचालकांच्या उपस्थितीत ‘ग. स. सोसायटी`चे ‘स्वीकृत संचालक` म्हणून जळगाव शहराच्या…

Read More

प्रतिनिधी : बोदवड  आज आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात भारतीय जनता पार्टी बोदवड़ तालुका व शहराची “विस्तृत आढावा बैठक” शहरातील अग्रसेन भवन येथे संपन्न झाली. सदर बैठकीत जिल्हा परीषदच्या २ गटांचा आढावा व ४ पंचायत समिती गणांचा आढावा घेण्यात आला. पक्ष संघटन, तालुक्यातील बुथ रचना व आगामी सेवा व शासन पंधरवाडयात करायचे कार्यक्रम व आगामी येणाऱ्या निवडणूका तसेच अनेक विवीध विषयांवर लोकप्रीय खासदार रक्षाताईं खड़से, बेटी बचाव-बेटी पढ़ाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फड़के व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री.अशोकभाऊ कांडेलकर व जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन यांच्यामार्फत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मनुर ब्रू येथील गजानन शेळके, संभाजी ब्रिगेडला…

Read More

मेष राशी: मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमची बुद्धिमत्ता आणि कामावरील निष्ठेचे अधिकारी कौतुक करतील. अनेक छोटी गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. भागीदारी व्यवसायात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. महिला आज घरातील कामात जास्त व्यस्त राहतील. आज तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कठोर परिश्रमाच्या बळावर प्रतिकूलतेवर मात कराल. प्रॉपर्टी डीलबाबत निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतात. आपली कमाई सावधगिरीने खर्च करा. कुटुंबातील सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न कराल. वाहन चालवताना काळजी घ्या. कामासाठी दिवस चांगला आहे,…

Read More

विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील एका शेतकऱ्याच्या मालकीच्या विहिरीत सुमारे 4 वर्षीय मादी जातीचे बिबट्या पडला होता.वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी मोठ्या अथक परिश्रमाने विहिरीतून बिबटयाला सुखरूपपणे पिंजऱ्यात बाहेर काढले आहे.ते सुखरूप असून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश सोनवणे यांनी दिली आहे. रविवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान फरदापुर नियतपरिक्षेत्रातील सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील शेतकरी पंढरी संपत मस्के यांच्या मालकी गट क्र.98 मधील खाजगी विहिरीत वन्यप्राणी बिबट्या पडला असल्याची बातमी मिळालयावर वनपरिक्षेत्र अजिंठा व वनपरिक्षेत्र सोयगाव येथील वन कर्मचारी यांची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचून वन्यप्राणी बिबट्या यास यशस्वीरीत्या पिंजऱ्यात घेऊन विहिरीबाहेर काढले.त्यांनतर…

Read More

विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी जरंडी येथील तरुण व्यावसायिक तसेच शेतकरी गोविंद चत्रू राठोड(40) यांचे रविवार दी,२९ रोजी सायंकाळच्या वेळेस जळगाव येथे उपचारादरम्यान निधन झाले त्यांच्यावर चाळीस दिवसापासून उपचार सुरू होते सोयगाव- बनोटी रस्त्यावरील सुकी नदी(रामपूर तांडा फाट्या जवळ अपघात झाला होता चाळीस दिवसांच्या उपचारादरम्यान त्यांचा आज जळगाव येथे मृत्यू झाला त्यांच्यावर उद्या जरंडी येथे अंत्ययसंस्कार होणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे जरंडी येथील माजी सरपंच अमृत चत्रू राठोड यांचे ते लहान बंधू होते, त्यांच्या निधनाची वार्ता कळताच जरंडीगावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील घोसला गावाची प्रतिष्ठेची समजली जाणारी विविध विकास सोसायटीचे लक्ष वेधी निवडणूक प्रक्रिया पार पडली.घोसला विविध विकास सोसायटी मध्ये अदभूत युती पाहण्यात मिळाली.सेवाभावी शेतकरी पँनलच्या १२ पैकी १२ जागा जिंकून दणदणीत विजय साजरा करतात आला.घोसला विकास सोसायटी मध्ये दोन पँनेल होते.शेतकरी सहकारी पँनल व सेवाभावी शेतकरी पँनेलचे प्रमुख घोसला गावाचे मा.चेअरमन शरद महाजन,प्रकाश नारायण पाटील,गुणवंत विक्रम पाटील,कैलास नामदेव, सुभाष पंडित बोरसे, सुभाष गंगाराम उपसरपंच, विनोद अर्जुन,दीपक सुभाष गवळी,भिका विष्णू बावस्कर,शांताराम पाटील. सेवाभावी शेतकरी पँनल होते.१२ पैकी १२ जागा जिंकून यानी पुर्ण आपले वर्चस्व सिध्द केले आहे. या पँनेल चे विजयी उमेदवार १) सचिन अरुण पाटील…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी ‘राजाने एक तर उडी टाकू नये, टाकली तर माघार घेवू नये’, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर काल निशाणा साधला. राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. जळगावात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते निलेश बोरा यांच्या घरी मंत्री बच्चू कडू यांनी काल सकाळी भेट दिली असता ते बोलत होते. नवनीत राणांना ईडीची नोटीस आली होती. भाजपाचे पंतप्रधान मोदी आणि शहा यांनी त्यांना तो कार्यक्रम दिला. तुम्ही जर हनुमान चालीसा म्हटली तर ईडीचे संकट टळेल, अशा शब्दात भाजप व राणा यांनाही बच्चू कडू यांनी टोला लगावला. कार्यक्रमादरम्यान सत्कार समारंभानंतर मंत्री कडू…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी केंद्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे हरियाणा येथे 3 ते 13 जून दरम्यान होणाऱ्या चौथ्या खेलो इंडिया यूथ गेम्ससाठी बॉक्सिंग क्रीडा प्रकारात महाराष्ट्र संघात संध्या मोरेची 48-50 किलो वजन गटात निवड करण्यात आली. तिला प्रशिक्षक नीलेश बाविस्कर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ. अमोल पाटील, सहसचिव नयन राणे, खजिनदार रोहिदास पाटील, रवि नरवाडे, संतोष सुरवाडे,डॉ.सचिन वाणी, डॉ.सारिका वाणी, सूरज नेमाडे, राकेश पाटील,पीयूष भोसले, राकेश पाटील, विशाल बाविस्कर, विजय पाटील, शुभांगी भोसले, शारदा पाटील यांनी संध्या मोरे हिचा गौरव केला. या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

Read More