Author: Saimat

वसई : वृत्तसंस्था रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा अंदाज सर्वांना माहित आहे. आठवले यांचे सभागृहातले भाषण असो किंवा मग निवडणुकीतल्या सभा यात त्यांच्या कवितांमुळे उपस्थितांमध्ये हाशा पिकतो. मात्र रामदास आठवले यांचा वसईतील एक व्हिडीओ सध्या समोर आलाय. या व्हिडीओमध्ये आठवले यांनी चक्क कार्यकर्त्याच्या तोंडात चाकू घातल्याचे दिसत. जेव्हा चाकू तोंडात घातला तेव्हा उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. काय घडला प्रकार? बुधवारी वसईत रिपाईंतर्फे संयुक्त जयंती कार्यक्रम आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पक्षाचा कार्यक्रम असल्याने रामदास आठवले यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम सुरु होता. सर्वांची भाषणं संपत आली होती. तेव्हा उपस्थिती कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की, आज (बुधवारी) RPI चे जिल्हाध्यक्ष…

Read More

जामनेर : प्रतिनिधी दोन दुचाकीची समोरा-समोर धडक झाल्याने त्यावरील तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील देऊळगाव गुजरी ते धामणगाव बडे या गावांच्या दरम्यान रात्री सुमारे नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात समोरा-समोरून येणार्‍या दोन मोटारसायकलींची धडक झाली. या अपघातामध्ये देऊळगाव गुजरी येथील प्रवीण नामदेव माळी ( वय४५) आणि त्यांचा मुलगा अतुल प्रवीण माळी ( वय १७) हे एका दुचाकीवरील बाप-लेक जागीच ठार झालेत. तर दुसर्‍या दुचाकीवर असणारा विलास भगवान गव्हाळ (वय २८, रा. खेडी पन्हेरी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा ) हा युवक देखील ठार झाला. तर देऊळगाव गुजरी येथील खालीद…

Read More

गडचिरोली :- राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन जवानांनी एकमेकांवर वैयक्तिक वादातुन गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. या गोळीबारात दोन्ही जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. श्रीकांत बेरड व बंडू नवथरे अशी या मृत जवानांची नावे असून दोघेही गडचिरोलीत मरपल्ली येथील पोलिस मदत केंद्रात तैनातीस होते. दोघे ही दौंड पुणे येथील सीआरपीफ कॅम्पचे जवान होते. दोघांनी वैयक्तिक वादातुन एकमेकांवर रायफलने फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

Read More

गतविजेत्या भारताला आशिया चषक हॉकी स्पर्धेत कास्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. कोरियाने बरोबरीत रोखल्याने अंतिम फेरीची संधी हुकलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात जपानवर १-० असा विजय मिळवला . सामन्यातील एकमेव गोल राजकुमार पाल ह्याने पहिल्याच क्वार्टरमध्ये केला. उत्तम सिंग ह्याने उजव्या बाजूने दिलेल्या कट बॅक पासवर त्याने ही संधी साधली. त्यानंतर भारताने चेंडूचा ताबा आपल्याकडे ठेवत स्वत:ला सुरक्षीत राखले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये तीन मिनिटांचा खेळ शिल्लक असताना एस.व्ही.सुनील ह्याने गोलची शक्यता निर्माण केली होती परंतु तो यशस्वी ठरला नाही तर जपानने लागोपाठ तीन पेनल्टी कॉर्नर वाया दवडल्याने त्यांची बरोबरीची संधी हुकली. ह्या स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी मंगळवारी कोरियावर…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी  कून्झर तालुका चाळीसगाव येथील श्री भगवान कुमावत हे सात वर्षांपासून जी प शाळा मध्ये मुख्यद्यापक म्हणून कार्य रत होते तरी त्यांनी कुनझर शाळेचा कायापालट केला व इंग्लीश स्कूल कडे जाऊ पाहणारे विद्यार्थी त्यांनी मराठी शाळेकडे आपोआप आकर्षित करण्याचे मोलाचे काम करुन गावातील सुशिक्षित मुलांना हेरून भायेर गावी राहणारे गावाचे प्रतिष्ठित नोकरदारांना विनंती करून डिजिटल शाळे ची संकलपणा पटून देऊन सुमारे तीन ते चार लाख रुपयाचा निधी उभा करून शाळा डिजिटल केली व शिक्षकांना वेळेवर शाळेतउपस्थित रहाण्याची तंबी देऊन स्वतः शाळेत वेळे अगोदर हजर राहून मुलांना लायक बनवण्याचे काम त्यांनी केले व बदली झाली असताना गावकरी नी बदली रद्द…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी या बाबत अधिकची माहिती अशी की, श्री राजेंद्र नामदेव सोळंके यांना शेतात काम करत असताना रानडुकराने धडक देऊन जखमी केले होते. सदर घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला व पीडित व्यक्तीस मदत मिळवून दिली. बुधवार दिनांक १ जून रोजी राहुल सपकाळ वन परिक्षेत्र अधिकारी सोयगाव प्रा. यांनी पीडितास धनादेशाचे वाटप केला यावेळी श्री ए.आर.शेंडगे लिपिक, श्री वनरक्षक श्री एन. ए. मुलताने, श्री व्ही. आर. नागरे, वनमजूर वाहुळे, चंद्रकांत इंगळे. कृष्णा पाटील आदींची उपस्थिती होती. पशुधन हानी, पीक नुकसानी तसेच वन्य…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस व सा. घंटानादचे संपादक दिलीप बागळदे वय 76 यांचे दि.1 जुन रोजी सकाळी 4:00 वा. दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी नेरी नाका वयकुंठ धामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते पराग बागडदे व आदित्य बागडदे यांचे वडिल व अशोक बागडदे यांचे जेष्ठ बंधु होत.

Read More

भडगाव प्रतिनिधी : आमीन पिंजारी कजगाव ता भडगाव येथील सेंट्रल बँकेच्या कजगाव शाखेत कर्मचारी संख्या वाढण्याच्या मागणीसाठी कजगाव ग्रामस्थांनी शाखा अधिकारी सुरेश कुमार यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून सेंट्रल बँकेच्या कजगाव शाखेत पुरेशे कर्मचारी नसल्याने ग्राहकांना पुरेशी सेवा देण्यासाठी बँकेला ही मोठी कसरत करावी लागत आहे पैसे काढणे पुस्तकाची एन्ट्री करण्यास विविध अडचणी येत आहे त्यामुळे जेष्ठ नागरिकांसह अनेकांना अडचणी येतात त्यामुळे आपल्या शाखेत कर्मचारी संख्या वाढवण्यात यावी यासाठी आपण प्रयत्न करावेत व ही बाब बँकेच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावी तसेच आमच्या निवेदनाची वरिष्ठ नक्कीच दखल घेतील अशी अपेक्षा ही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.…

Read More

प्रतिनिधी : कजगाव कजगाव येथून जवळच असलेले पाचोरा तालुक्यातील पिंप्री येथे मंगळवारी संध्याकाळी सहा ते आठ च्या दरम्यान तेजसबाई पुना जाधव वय 80 वर्ष हे त्यांच्या घरात एकटे असताना अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे अज्ञात व्यक्तीविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे पुढील तपास डी .वाय .एस. पी. भारत काकडे साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साहेब व पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील हे करीत आहे. https://youtu.be/0KgKxK9qAug

Read More

जळगाव ः प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आझादी का अमृतमहोत्सवांतर्गत देशात विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यानिमित्ताने मंंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात काल हा कार्यक्रम झाला. यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या सामर्थ्यापुढे कोणतेही लक्ष्य अवघड नाही.भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून देशात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक वाढत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री…

Read More