Author: Saimat

मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी संस्मरणीय असेल. गोड बोलण्याच्या जोरावर आणि हुशारीने कामात यश मिळेल. कामासाठी आजचा दिवस उत्तम राहील आणि कामात लाभदायक फळांचे प्राबल्य राहील. बोलण्यात गोडवा राहील, त्यामुळे मित्र-मैत्रिणींसोबतच्या नात्यात गोडवा राहील. आज तुमच्या घरातील काही शुभ कार्य पूर्ण होतील. आज ८५% नशिबाची साथ देईल. मंगळवारी उपवास ठेवा आणि हनुमानाची पूजा करा. वृषभ : राशीच्या लोकांना आज कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात किंवा ते प्रत्यक्षात येऊ शकतात. आज भाग्य तुम्हाला साथ देईल. आज तुम्ही हुशारीने काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. नोकरीत कोणाच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना शेती आणि शेती उद्योगाची चालना मिळावी या मुख्य उद्देशाने गत 7 वर्षांपासून जैन हिल्स येथे संम्मेलन भरविण्यात येत आहे. गुजरात व महाराष्ट्रातील राज्यातील 135 शाळांतील 11 हजार विद्यार्थ्यांमधून 800 विद्यार्थ्यांची निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या 8 व्या संम्मेलनाचे आयोजन 1 ते 5 जून दरम्यान जैन हिल्स येथे करण्यात आलेले आहे. 1 व 2 तसेच 4 व 5 जून अशा दोन टप्प्यात हे संम्मेलन होईल. शाळाशाळांमधून फालीच्या माध्यमातून सुमारे 25 हजार हून अधिक विद्यार्थ्यांना शिकविण्यात आलेले आहे. फाली व गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष नादीर गोदरेज , यूपीएलचे अध्यक्ष रजनिकांत श्रॉफ, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक तथा…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील अहिरवाडी येथील मोहगण रस्त्यावरील बाहेरपूरा परिसरातील एका घरातून घरमालक घरात झोपलेले असतांनाच अज्ञात चोरट्यांनी दिड लाखाच्या रोकडसह सुमारे 15 लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील अहिरवाडी येथे मोहगण रस्त्यावर बाहेरपूऱ्यातील रमेश शामराव महाजन यांचे घर आहे. रात्रीच्या सुमारास महाजन कुटुंबिय झोपलेले असतांनाच चोरट्यांनी घराच्या मागे शेतातील तारकंपाऊंड तोडून घराच्या मागील भिंतीचे सिमेंट खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाटातून सोन्या-चांदीच्या दागिने व दिड लाखाच्या रोकडसह सुमारे 15 लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. चोरी झाली तेव्हा घरमालक रमेश महाजन त्यांची पत्नी, आई हे समोरील खोलीत झोपलेले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील रखडलेली नालेसफाई दूषीत पाणीपुरवठा व अमृत योजनेअंतर्गत नळ कनेक्शनमुळे थांबलेली रस्त्यांची कामे या तीन मुद्यांवरून आजची महासभा गाजली. महापौर जयश्रीताई महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या महासभेत 33 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले असून त्यावर सभागृहात चर्चा सुरू झाली आहे. त्यात महिला मालमत्ताधारकांना करात 5 टक्के सूट देण्यात येणारा प्रस्ताव मंजूर झाल्याचे वृत्त असून ही शहरातील महिलांना मनपाकडून मिळालेली भेट समजली जात आहे. चर्चेत कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, उज्ज्वला बेंडाळे, रिजवान खाटीक, सदाशिव ढेकळे आदींनी सहभाग घेतला.महापालिकेची महासभा आज सकाळी 11 वाजता मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात सुरू झाली. व्यासपीठावर महापौर जयश्रीताई महाजन यांच्यासह आयुक्त…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रविवारी नेपाळमध्ये कोसळलेल्या तारा एअरलाइनच्या विमानाच्या अवशेषाचे काही फोटो समोर आले आहेत. मुस्तांग भागातील कोबान परिसरात विमानाचे अवशेष सापडले आहेत. या विमानाचा रविवारी अपघात झाला होता. तारा एअरलाइनची फ्लाइट 9 एनएईटी नेपाळमधील पोखरा येथून जोमसोमला जात होती. सकाळी 10 च्या सुमारास हे विमान अचानक बेपत्ता झाले. दिवसभर शोधमोहीम राबवल्यानंतर दुपारी 4 वाजता विमान कोसळल्याची पुष्टी करण्यात आली. या विमानात तीन क्रू मेंबर्ससह एकूण 22 जण होते. यामध्ये 4 प्रवासी भारतीय होते. तर जर्मनीचे 2 आणि 13 प्रवाशी नेपाळ देशाचे होते. याबाबत अधिक माहिती देताना त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रमुखांनी सांगितले की, घटनास्थळी तपास सुरू आहे. नेपाळ लष्कराचे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र आणि राज्य सरकारने आपापल्या हिश्‌‍श्याचा टॅक्स कमी केला परंतु, पेट्रोल – डिझेल दर कपातीविरोधात पेट्रोल पंप चालक – मालक आक्रमक संघटनांनी नो पेर्चेसचा निर्णय घेतला. केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या दर कपातीमुळे चालक आणि मालकी यांचे हजारो कोटीचे नुकसान झाले. पूर्वकल्पना किंवा कोणतेही नियोजन न करता दर कपात केल्याने त्यांच्यात नाराजी पसरली. याच नाराजीतून 31 मे रोजी तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलची खरेदी केली जाणार नाही असा निर्णय पेट्रोल पंप चालक – मालक यांनी घेतला. संपूर्ण देशभरातील पेट्रोल – डिझेल चालक मालक नो पर्चेसमध्ये सहभागी होणार आहेत तर महाराष्ट्रातील 6500 पेट्रोल – डिझेल चालक मालक नो…

Read More

अमृतसर : वृत्तसंस्था सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी, काल पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात मूसेवाला यांचा मृत्यू झाला. मूसेवाला (27) हे जवाहरके या त्यांच्या खेड्यात जीपमधून जात असताना झालेल्या गोळीबारात त्यांच्या शरीरात अनेक गोळ्या शिरल्याचे मानसाचे पोलीस उपअधीक्षक गोबिंदर सिंग यांनी सांगितले. आणि आम्ही बदला घेतला “सर्व भावांना राम राम, सत्‌‍ श्री अकाल, मूसेवालाच्या हत्येची आज, मी गोल्डी ब्रार, सचिन विश्नोई, लॉरेन्स बिश्नोई ग्रुप याची जबाबदारी घेतो. आमचा भाऊ विकी मिड्दुखेडा याच्या हत्येसाठी त्याने मदत केली होती. त्याचा बदला आम्ही आज घेतला आहे,”असे गोल्डी ब्रारने फेसबुकवर एका पोस्टमध्ये म्हटले…

Read More

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले स्वागत जळगाव ः प्रतिनिधी सध्या जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा सुरू असून त्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हातावर शिवबंधन बांधत असून यात जळगावसह धरणगाव तालुक्यातील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. तालुक्यातील भोकर आणि धरणगाव येथे शनिवारी शिवसेनेच्या झालेल्या मेळाव्यात अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यात प्रामुख्याने भोकर येथे जळगाव महापालिकेचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपीक राजेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ना. गुलाबराव पाटील हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंंतर सायंंकाळी धरणगाव येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात धरणगाव तालुक्यातील आव्हाणी…

Read More

फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी येथील नरेंद्र विष्णू नारखेडे (अध्यक्ष, वै. ह. भ. प. डिगंबर महाराज मठ, पंढरपूर) यांचा राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार 2022 देऊन शिर्डी येथे झालेल्या भव्य कार्यक्रम मध्ये गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राष्ट्रीय 18 वे अधिवेशन व गौरव समारंभ उत्साहात झाला. यावेळी राजकीय सहकार व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय उत्कृष्ठ सामाजीक कार्य केल्या बद्दल हा राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार राज्याचे माजी विरोधीपक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व साईबाबा संस्था शिर्डीचे मा अध्यक्ष व खासदार भाऊसाहेब खासदार वाकचौरे यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रम शांती कमल सभागृहात आयोजित करण्यात आला होता. नरेंद्र नारखेडे यांनी…

Read More