Author: Saimat

यावल : प्रतिनीधी तालुक्यातील गुरुमाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चिखली बुद्रुक येथील श्री दत्त हायस्कूल मधील उपशिक्षक एन.एस.बडगुजर सर हे 29 वर्षांची प्रदीर्घ यशस्वी सेवा करून आज मंगळवार दि.31 मे 2022 रोजी त्यांच्या पदावरून निवृत्त झाले त्यांना गुरुमाई शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी तसेच हायस्कूल मधील मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्नेहपूर्ण निरोप दिला. एन.एस.बडगुजर सर यांना संस्थेचे माजी प्राचार्य तथा कला वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक पी.एस.पाटील सर व यावल येथील मुलींचे विकास विद्यालयातील राजेंद्रभाऊ अमृत चौधरी,शाळेचे मुख्याध्यापक के.यु.पाटील सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. शाळेत सत्काराला उत्तर देताना त्यांनी संस्थेकडून मिळालेल्या मार्गदर्शन व सहकार्य…

Read More

 जळगाव ः प्रतिनिधी शहरातील क्व्ोश्‍चन मार्क ब्रॅण्ड प्रस्तुत मिस्टर ॲण्ड मिसेस तसेच किड्स फॅशन शो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यात लहान गटात वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी येथील आदिती सुधीर गुरचल हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. आदिती ही ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथील इंटक युनियनचे जेसीएम मेंबर सुधीर गुरचल यांची सुकन्या आहे.आदितीला प्रमुख पाहुणे गोपाल दर्जी,पवन टाक, सुशांत भावसार तसेच परीक्षक मुबंईचे शुभम जैन, उत्तराखंडचे दीपक उपरेती, प्रीती उपरेती, नाशिकच्या मुरण्मयी अकोलेकर, सिद्धार्थ अहिरे, जयश्री अहिरे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकचे सन्मानचिन्ह व ‘मिस किड्सच्या किताब’ ने सन्मानित करण्यात आले. आदिती गुरचलचे सर्वत्र कौतक होत आहे.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी यावल शहरातील मेनरोडवरील श्री साईबाबा मंदिराचा 16वा वर्धापन दिन आज मंगळवारी साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजता श्रींचा अभिषेक, 7 वाजता नित्य आरती, सकाळी 9 वाजता होम-हवन, दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती झाली तर सायंकाळी 5 वाजता पालखी मिरवणूक शहरातून काढली जाणार आहे. पालखी मिरवणुकीची सांगता मंदिरात झाल्यावर सायंकाळी 7 वाजता श्रींची धूप आरती व नंतर भाविकांना महाप्रसाद वितरण केले जाणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ साईभक्तांनी घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष संजय नेवे, उपाध्यक्ष गोपालसिंग पाटील, सभासद तोतारामदादा नन्नवरे, गणेश बुरुजवाले, ॲड.अशोक सुरळकर, विश्‍वनाथ…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी हजरत बिलाल सोसायटीतर्फे पंचमुखी हनुमान मंदिराजवळ हिंदू-मुस्लिम एकतेसाठी कुस्त्यांची दंगल घेण्यात आली. त्यात खान्देश केसरी, श्री केसरी, चॅम्पियन यांच्या कुस्त्यांच्या दंगल झाल्या. यात 500 मल्लांनी डाव अजमावला. कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक मल्लांनी सहभाग नोंदवला. त्यात राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते नितीन गवळी, भूषण पाटील, अली पहिलवान (दोघे नाशिक) यांनी विजय प्राप्त केला. तर मुलींच्या कुस्तीत राष्ट्रीय विजेत्या सय्यद आमरीन, श्‍वेता सोलंकी (दोघे औरंगाबाद) यांनी विजय प्राप्त केला. मुला-मुलींच्या स्पर्धेत राष्ट्रीय विजेता अश्‍विन सपकाळ (करमाळ, जि. जालना), रेहान पहिलवान (जामनेर), सुनीता महाजन, मौला अली तालिम आदींनी कुस्ती खेळून विजय प्राप्त केला. दंगलचे उद््‌घाटन हनुमान व्यायामशाळेचे संचालक दिलीपबापू पाटील यांनी केले.…

Read More

पाळधी ता.धरणगाव ः वार्ताहर विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त गायक राजू बागुल विरुद्ध वैशाली किरण यांचा भीम गीतांचा कार्यक्रम झाला. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमात जळगाव जिल्हा आंबेडकरी समाजातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. भीमगीतांच्या कार्यक्रमात राजू बागुल व वैशाली किरण यांनी आपल्या गायनातून प्रबोधन केले. त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी झाली.कार्यक्रमाचे आयोजन धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले होते. कार्यक्रमास महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, ॲड.राजेश झाल्टे, जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, नगरसेवक सुरेश सोनवणे, शालीक गायकवाड, दिलीप सपकाळे, संजय सपकाळे, शिवसेनेच्या जळगाव उपशहर प्रमुख सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी आधुनिक विचारसरणीमुळे एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत असून विभक्तीकरण वाढले आहे. त्यामुळे व्यक्ती समाजापासून दूर जात आहे. यासाठी आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या समाजात राहून सामाजिक बांधिलकीही जपणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चिमुकले राम मंदिराचे विश्‍वस्त दादा महाराज जोशी यांनी केले. चितोडे वाणी समाज कार्यकारिणीतर्फे मायादेवीनगरातील रोटरी हॉलमध्ये विद्यार्थी गुणगौरव व ज्येष्ठांच्या सन्मान सोहळा झाला. अध्यक्षस्थानी समाज अध्यक्ष प्रा. डॉ. उमेश वाणी हे होते. यावेळी शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात कार्य केलेल्या 50 विद्यार्थ्यांचा गुणगौरवसह वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या 40 ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. विश्‍वस्त दादा महाराज जोशी पुढे म्हणाले की, समाजाने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे.आपले कुटुंब एकत्रित ठेवण्याबरोबरच आई-वडिलांचा…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जगातील ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या व भारतातील प्रथम क्रमांकाची कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडने संचालक मंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाही तसेच चालू आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणापूर्वीच्या आर्थिक निकालास मंजुरी दिली. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक काल झाली. चौथ्या तिमाहीमध्ये एकत्रित उत्पन्नात 16.2 टक्के वाढ दर्शवली आहे. या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न 7119.5 कोटी रुपये आहे. जे गतवर्षी याच काळात केवळ 5666.9 कोटी रुपये होते.  व्यवसायात 25.6 टक्के वाढ कंपनीच्या एकल व एकत्रित व्यवसायात 25.6 टक्के वाढ झाली. आणि कर व्याज व घसारा पूर्व नफा जवळजवळ शंभर टक्क्याने वाढला.तिसऱ्या तिमाहीच्या शेवटी आम्ही…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी एका इंग्रजी चॅनेलवर ज्ञानवापी फाईल्स हा चर्चेचा कार्यक्रम चालू असताना त्या कार्यक्रमात उपस्थित दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या श्रीमती नपुर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या व त्यांची पत्नी हजरत आयशा यांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने करून सर्व मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या व दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी नको शर्मा यांच्या विरोधात भादवि 295, 153, 500, 52 अन्वये कायदेशीर कारवाई करण्याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलीस अधीक्षकांची प्रतिनिधी गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना लेखी तक्रार दिली…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यावर्षी घेण्यात आलेल्या 685 जागांसाठीच्या परीक्षांचे अंतिम निकाल काल जाहीर झाले असून यात दीपस्तंभ परिवारातील सदस्य असलेल्या हर्षल राजेश महाजन याने यूपीएससी परीक्षेत यशाची पताका फडकावली आहे. हर्षल महाजनने देशात 408 रँक प्राप्त केली आहे.हर्षलचे मुळ गाव जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव असून त्याचा जन्म जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील असून त्याचे पुढील शिक्षण मुंबई येथे झाले आहे.हर्षलचे दहावीपर्यंतचे शिक्षण पार्ले टिळक विद्यालय येथे तर बारावीचे शिक्षण पेस ज्युनियर कॉलेज मुंबई येथे झाले आहे.त्यानंतर हर्षलने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथून बी – टेक चे शिक्षण पूर्ण केले आहे. हर्षलचे वडील राजेश महाजन पर्जन्य जलवाहिनी…

Read More