विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी या बाबत अधिकची माहिती अशी की, श्री राजेंद्र नामदेव सोळंके यांना शेतात काम करत असताना रानडुकराने धडक देऊन जखमी केले होते. सदर घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला व पीडित व्यक्तीस मदत मिळवून दिली. बुधवार दिनांक १ जून रोजी राहुल सपकाळ वन परिक्षेत्र अधिकारी सोयगाव प्रा. यांनी पीडितास धनादेशाचे वाटप केला यावेळी श्री ए.आर.शेंडगे लिपिक, श्री वनरक्षक श्री एन. ए. मुलताने, श्री व्ही. आर. नागरे, वनमजूर वाहुळे, चंद्रकांत इंगळे. कृष्णा पाटील आदींची उपस्थिती होती. पशुधन हानी, पीक नुकसानी तसेच वन्य…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस व सा. घंटानादचे संपादक दिलीप बागळदे वय 76 यांचे दि.1 जुन रोजी सकाळी 4:00 वा. दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी नेरी नाका वयकुंठ धामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते पराग बागडदे व आदित्य बागडदे यांचे वडिल व अशोक बागडदे यांचे जेष्ठ बंधु होत.
भडगाव प्रतिनिधी : आमीन पिंजारी कजगाव ता भडगाव येथील सेंट्रल बँकेच्या कजगाव शाखेत कर्मचारी संख्या वाढण्याच्या मागणीसाठी कजगाव ग्रामस्थांनी शाखा अधिकारी सुरेश कुमार यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून सेंट्रल बँकेच्या कजगाव शाखेत पुरेशे कर्मचारी नसल्याने ग्राहकांना पुरेशी सेवा देण्यासाठी बँकेला ही मोठी कसरत करावी लागत आहे पैसे काढणे पुस्तकाची एन्ट्री करण्यास विविध अडचणी येत आहे त्यामुळे जेष्ठ नागरिकांसह अनेकांना अडचणी येतात त्यामुळे आपल्या शाखेत कर्मचारी संख्या वाढवण्यात यावी यासाठी आपण प्रयत्न करावेत व ही बाब बँकेच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावी तसेच आमच्या निवेदनाची वरिष्ठ नक्कीच दखल घेतील अशी अपेक्षा ही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.…
प्रतिनिधी : कजगाव कजगाव येथून जवळच असलेले पाचोरा तालुक्यातील पिंप्री येथे मंगळवारी संध्याकाळी सहा ते आठ च्या दरम्यान तेजसबाई पुना जाधव वय 80 वर्ष हे त्यांच्या घरात एकटे असताना अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे अज्ञात व्यक्तीविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे पुढील तपास डी .वाय .एस. पी. भारत काकडे साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साहेब व पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील हे करीत आहे. https://youtu.be/0KgKxK9qAug
जळगाव ः प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आझादी का अमृतमहोत्सवांतर्गत देशात विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यानिमित्ताने मंंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात काल हा कार्यक्रम झाला. यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या सामर्थ्यापुढे कोणतेही लक्ष्य अवघड नाही.भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून देशात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक वाढत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा सहकारी दूध संघाने आपल्या सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात आजपासून (एक जून) दोन रुपयांची वाढ केली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी दरवाढ आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील ग्राहकांना मिळणारी किमतीतील सवलत संपुष्टात आली असून कायद्यातील कमाल किरकोळ किमतीबाबतच्या तरतुदीमुळे हा निर्णय घेतल्याचे दूध संघाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील ग्राहकांपेक्षा दोन रुपये कमी किमतीत दूध उपलब्ध केले होते मात्र एकाच वस्तूची कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकत नाही, अशी तरतूद कायद्यात आहे.त्यामुळे बुधवारपासून ही किंमत वाढत आहे. पण ती अन्य प्रतिस्पर्धी उत्पादक कंपन्यांपेक्षा जास्त झालेली नाही, असेही संघाच्या वतीने सांगण्यात आले. संघाने उत्पादकांना चार…
जळगाव ः प्रतिनिधी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त शाखा अभियंता हिरामण हरीभाऊ चव्हाण यांनी काल शिरसोली रस्त्यावरील गरीब वस्तीत 30 गरजू मुलांना चप्पल व बुटांचे वाटप केले. जळगाव शहराचे तापमान अधिक असून, काही दिवसांपूर्वी हिरामण चव्हाण यांनी गरीब मुलांना भर उन्हात अनवाणी पायाने फिरताना पाहिले.त्याचवेळी त्यांनी या गरिबांना मदतीचा हात देण्याचा निश्चय केला. त्यानुसार मंगळवारी चप्पल व बुटाचे गरीब मुलांना वाटप केले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पहाण्यासारखा होता.
जळगाव : प्रतिनिधी बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कमलाकर फडणीस यांनी सांगितले की,प्रबोधचंद्रिकेचे तत्कालीन संपादक वा. ना. फडणीस यांनी सावरकरांची चाळीसगाव ते जळगाव रेल्वे प्रवासात मुलाखत घेतली होती. सावरकरांची काळ्या पाण्याच्या शिक्षेवरून सुटका झाल्यावर विशेषांक त्यांनी काढला होता. तो भगूर येथील तात्यारावांच्या जन्मस्थळी शोकेसमध्ये ठेवलेला आहे. अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर यांनी हिंदुत्ववादींसाठी तीर्थक्षेत्र असलेल्या सावरकरांचे नाशिक जिल्ह्यातील जन्मस्थळ भगूर येथे आगामी काळात भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला. सहलीचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी नियोजन समितीला केली. महिला मंडळ अध्यक्षा मनीषा दायमा आदी उपस्थित होते.
जळगाव ः प्रतिनिधी महिला पर्यावरण सखी मंच व जायंटस ग्रूप ऑफ तेजस्विनी जळगाव यांच्या संयुक्तं विद्यमाने 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालचित्रकला स्पर्धा 2022 चे आयोजन 4 जून रोजी संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत महात्मा गांधी उद्यान,नवीन बस स्टँड जवळ करण्यात आले आहे. ही स्पर्धा फक्त जळगाव शहरातील विद्यार्थी (मुलामुलींसाठी) आहे. तरी सर्व विद्यार्थ्यानी अवश््य सहभागी व्हावे.महिला पर्यावरण सखी मंच जळगाव आयोजीत कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे नोंदणी 2 जूनपर्यंत करावी. नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. मनिषा पाटील राज्य उपाध्यक्षा महिला पर्यावरण सखी मंच- 94206 62093,छाया पाटील जिल्हा उपाध्यक्ष- 94215 16861,नेहा जगताप शहर प्रमुख-…
मेष राशी : आज मेष राशीच्या लोकांचे नशीब त्यांच्या कौशल्याने जागृत होईल आणि तुम्हाला सर्व कामात यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक बोला. तुमचे तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद असू शकतात. प्रेमसंबंधांसाठी काळ शुभ आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या ज्येष्ठांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांना आज नोकरीत चांगल्या प्रतिष्ठेसह यश मिळेल. पदोन्नती किंवा संबंधित बोलणी आज होतील. आज मुला-मुलींकडून कौतुकास्पद काम होईल. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल. आज तुम्ही बहुतांश उपक्रम यशस्वीपणे हाताळण्यास सक्षम असाल.…