जळगाव ः प्रतिनिधी जमिनीची सुपीकता आणि मर्यादा पाहता उच्च कृषितंत्रज्ञानाचा उपयोग करून स्मार्ट पद्धतीने शेती करणे भविष्यात खूप महत्त्वाचे ठरेल.शेती व्यवसायातून आपली स्वत:ची उन्नती तर साध्य होते परंतु भूकेल्यांच्या पोटाला अन्न देण्याचे काम शेतकरी करतो, त्यामुळे तो जगाचा पोशिंदा ठरतो.भविष्यात शेतीशिवाय सर्वांगिण प्रगती करणे केवळ अशक्य` असा सूर फालीमधील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना शेतकऱ्यांमध्ये उमटला. जैन हिल्स येथे फालीचे आठव्या संमेलनाच्या पहिल्या टप्प्याची सुरवात झाली. याप्रसंगी आघाडीच्या प्रगतीशील शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांनी जैन हिल्सच्या आकाश मैदानावर सुसंवाद साधला. त्यात उमाळे येथील उमेश खडसे, पिंपळगावचे भागवत भाऊराव पाटील, पहुरचे शैलेश कृष्णा पाटील, नायगावचे विशाल किशोर महाजन, अटवाड्याचे विशाल अग्रवाल या शेतकऱ्यांचा समावेश होता.…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी शहरातील गेंदालाल मिल परिसरात दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी करीत एकमेकांना चाकूने वार करत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १ जून रोजी रात्री घडली. याप्रकरणी बुधवार १ जून रोजी दुपारी परस्परविरोधात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की, पहिल्या फिर्यादीत शेख तनविर शेख रहिम यांनी म्हटले आहे की, गेंदालाल मिल परिसरातून भावाच्या दुचाकीवरून शेख तनविर हा बुधवार १ जून रोजीच्या रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घरी येत असतांना सरला सुरेश बर्वे या महिलेला दुचाकीचा धक्का लागला. या कारणावरून आकाश सुरेश बर्वे आणि गोलू सुरेश बर्वे दोन्ही रा. रेणुका माता मंदीर…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील महावितरण कंपनीत कंत्राटी महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, शहरातील महावितरण कार्यालयातील एच.आर. व्यवस्थापक उध्दव कडवे याने विभागातील एका महिला कंत्राटी कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी करत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार महिला कर्मचाऱ्यासोबत सन २०१७ ते २०२१ दरम्यान सुरूच होता. असे असतांना १२ मे २०२२ रोजी देखील महावितरण कार्यालयातील एच.आर. व्यवस्थापक उध्दव कडवे याने पुन्हा महिला कर्मचाऱ्याकडे शरिरसुखाची मागणी करत गैरवर्तन केले. मानसिक छळ व त्रास देत तिला कामावरून काढून दिले.…
बोदवड ः प्रतिनिधी संत सावता माळी नवयुवक मंडळाच्या सदस्यांनी येथील विश्रामगृहात आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देताना सभामंडपासाठी निधी देण्याची मागणी केली. लवकरच हा निधी मंजूर करुन आणू असे आश्वासन मिळाले. सांस्कृतिक तसेच लग्न समारंभासाठी बिन शेती गट नंबर 418 मध्ये ग्रामपंचायतीमार्फत जागा मिळालेली आहे. मात्र, ही जागा मोकळी असल्याने तेथे विविध कार्यक्रम होण्यासाठी बंदिस्त सभामंडप आवश्यक आहे. त्यासाठी निधी उपलब्ध मिळावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक दिनेश माळी, नगरसेवक नीलेश माळी, आबा माळी, रामधन माळी, विलास माळी, अनिल माळी, अजय माळी, सागर माळी, किशोर माळी, सुरेश माळी, युवराज माळी, अशोक माळी, अशोक माळी,…
वसई : वृत्तसंस्था रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा अंदाज सर्वांना माहित आहे. आठवले यांचे सभागृहातले भाषण असो किंवा मग निवडणुकीतल्या सभा यात त्यांच्या कवितांमुळे उपस्थितांमध्ये हाशा पिकतो. मात्र रामदास आठवले यांचा वसईतील एक व्हिडीओ सध्या समोर आलाय. या व्हिडीओमध्ये आठवले यांनी चक्क कार्यकर्त्याच्या तोंडात चाकू घातल्याचे दिसत. जेव्हा चाकू तोंडात घातला तेव्हा उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. काय घडला प्रकार? बुधवारी वसईत रिपाईंतर्फे संयुक्त जयंती कार्यक्रम आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पक्षाचा कार्यक्रम असल्याने रामदास आठवले यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम सुरु होता. सर्वांची भाषणं संपत आली होती. तेव्हा उपस्थिती कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की, आज (बुधवारी) RPI चे जिल्हाध्यक्ष…
जामनेर : प्रतिनिधी दोन दुचाकीची समोरा-समोर धडक झाल्याने त्यावरील तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील देऊळगाव गुजरी ते धामणगाव बडे या गावांच्या दरम्यान रात्री सुमारे नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात समोरा-समोरून येणार्या दोन मोटारसायकलींची धडक झाली. या अपघातामध्ये देऊळगाव गुजरी येथील प्रवीण नामदेव माळी ( वय४५) आणि त्यांचा मुलगा अतुल प्रवीण माळी ( वय १७) हे एका दुचाकीवरील बाप-लेक जागीच ठार झालेत. तर दुसर्या दुचाकीवर असणारा विलास भगवान गव्हाळ (वय २८, रा. खेडी पन्हेरी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा ) हा युवक देखील ठार झाला. तर देऊळगाव गुजरी येथील खालीद…
गडचिरोली :- राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन जवानांनी एकमेकांवर वैयक्तिक वादातुन गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. या गोळीबारात दोन्ही जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. श्रीकांत बेरड व बंडू नवथरे अशी या मृत जवानांची नावे असून दोघेही गडचिरोलीत मरपल्ली येथील पोलिस मदत केंद्रात तैनातीस होते. दोघे ही दौंड पुणे येथील सीआरपीफ कॅम्पचे जवान होते. दोघांनी वैयक्तिक वादातुन एकमेकांवर रायफलने फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
गतविजेत्या भारताला आशिया चषक हॉकी स्पर्धेत कास्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. कोरियाने बरोबरीत रोखल्याने अंतिम फेरीची संधी हुकलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात जपानवर १-० असा विजय मिळवला . सामन्यातील एकमेव गोल राजकुमार पाल ह्याने पहिल्याच क्वार्टरमध्ये केला. उत्तम सिंग ह्याने उजव्या बाजूने दिलेल्या कट बॅक पासवर त्याने ही संधी साधली. त्यानंतर भारताने चेंडूचा ताबा आपल्याकडे ठेवत स्वत:ला सुरक्षीत राखले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये तीन मिनिटांचा खेळ शिल्लक असताना एस.व्ही.सुनील ह्याने गोलची शक्यता निर्माण केली होती परंतु तो यशस्वी ठरला नाही तर जपानने लागोपाठ तीन पेनल्टी कॉर्नर वाया दवडल्याने त्यांची बरोबरीची संधी हुकली. ह्या स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी मंगळवारी कोरियावर…
चाळीसगाव प्रतिनिधी कून्झर तालुका चाळीसगाव येथील श्री भगवान कुमावत हे सात वर्षांपासून जी प शाळा मध्ये मुख्यद्यापक म्हणून कार्य रत होते तरी त्यांनी कुनझर शाळेचा कायापालट केला व इंग्लीश स्कूल कडे जाऊ पाहणारे विद्यार्थी त्यांनी मराठी शाळेकडे आपोआप आकर्षित करण्याचे मोलाचे काम करुन गावातील सुशिक्षित मुलांना हेरून भायेर गावी राहणारे गावाचे प्रतिष्ठित नोकरदारांना विनंती करून डिजिटल शाळे ची संकलपणा पटून देऊन सुमारे तीन ते चार लाख रुपयाचा निधी उभा करून शाळा डिजिटल केली व शिक्षकांना वेळेवर शाळेतउपस्थित रहाण्याची तंबी देऊन स्वतः शाळेत वेळे अगोदर हजर राहून मुलांना लायक बनवण्याचे काम त्यांनी केले व बदली झाली असताना गावकरी नी बदली रद्द…