Author: Saimat

विजय चौधरी,सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील मौजे.कंकराळा येथे दि.03 रोजी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ता कामाचे शुभारंभ महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले , यावेळेस गावचे प्रथम नागरिक सरपंच चंदाताई शिवदास राजपुत , शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड , तालुका प्रमुख आबा (प्रभाकर)काळे , तालुका संघटक दिलीप मचै राजपुत , शहराध्यक्ष बोडके , माजी जि.प.सदस्य गोपीचंद जाधव , युवासेनेचे कुणाल राजपुत , नगरसेवक लतीफ शहा , यांच्या प्रमुख उपस्थितीत भुमिपुजन सोहळा संपन्न झाला , यावेळी उपस्थित पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाठ , विस्तार अधिकारी साळवे , अभियंता राजगुरू , सहाय्यक तांत्रिक अधिकारी प्रदीप घुंगरे , सचिन…

Read More

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी भाजपच्या ढोंगी नेतृत्वाचा समाचार घेण्यासाठी येत्या 8 जून रोजी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री ना. उद्धवसाहेब ठाकरे यांची सभा होणार असून या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथील सभेत केले. ही सभा ऐतिहासिक होणार असून सभेत मुख्यमंत्र्यांकडून भाजपचा पर्दाफाश होणार असल्याने भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सभेच्या पूर्व तयारी साठी तसेच भाजपच्या ढोंगी नेतृत्वाची पोलखोल करण्यासंदर्भात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची शुक्रवार ( दि.3 ) रोजी सोयगाव शहरात जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख…

Read More

भुसावळ : प्रतिनीधी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वे मक्तेदार मनवानी हे गेल्या अनेक वर्षापासून रेल्वेचे ठेके घेण्याचे काम करीत असून, आपले काम चालावे म्हणून ई. एन. ऑफिस च्या शेजारी तसेच अकाउंट ऑफिस च्या पाठीमागे ” के “टाइप कॉटर मध्ये आपले ऑफिस तयार करून मोठ्या थाटात आपले कामकाज  चालवत होते, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राजेश तायडे यांनी सदर कॉटर संबंधीची माहिती  माहिती अधिकारात मागताच सदर ठेकेदाराने रेल्वे कॉटर मध्ये नटवलेले आपले आलिशान ऑफिस जमीनध्वस्त  केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या तीन वर्षांपूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे हद्दीतील अतिक्रमण  रेल्वे कर्मचारी राहत असलेल्या “के” टाइप कॉटर वरती हातोडा चालविला सदर रेल्वे अधिकाऱ्यांनी…

Read More

रावेर प्रतिनिधी  रावेर परिसरात मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे बऱ्याच गावांना नुकसानीचा फटका बसला असून, जोरदार पावसासह वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मुख्यता केळी बागांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. यावेळी आज मौजे अहिरवाडी (रावेर) येथे मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे नुकसाग्रस्त केळी बागांना परिसरातील प्रमुख लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी, तहसिलदार यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेले शेतातील पिके दाखवून विदारक परिस्थितीचे कथन केले व शेतकऱ्यांची कैफियत मांडली. यावेळी त्यांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता, पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी शेतकऱ्यांना धीर दिला व लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन खा.रक्षाताई खडसे यांनी दिले. यावेळी  महाराष्ट्र किसान मोर्चा संपर्क प्रमुख श्री.सुरेश…

Read More

रेल्वेनं प्रवास (Travel) करून इच्छित स्थळी (Destination) पोहोचल्यानंतर मोठा प्रश्न असतो तो राहण्याच्या (Accommodation) सोयीचा. एखाद्या शहरात आपलं घर किंवा नातेवाईक नसतील, तर सुरू होते हॉटेलची (Hotel) शोधाशोध. पण महानगरांमध्ये हॉटेलचे दरही परवडणारे नसतात. अशा प्रवाशांसाठी आता रेल्वेनं एक ‘गुड न्यूज’ दिली आहे. जर तुम्ही रेल्वेचा प्रवास करून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उतरणार असाल, तर तुम्हाला हॉटेलची चिंता करण्याची गरज नाही. दक्षिण मुंबईत असणाऱ्या CSMT रेल्वे स्टेशनवर एक ‘पॉड हॉटेल’ उभारलं जातंय. याचं काम जवळपास पूर्ण झालं असून जून महिन्याच्या अखेरीस ते प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. वेटिंग रूमच्या जवळ होतंय पॉड हॉटेल सीएसएमटी…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  पेट्रोलियम कंपन्यांची वेट अॅंड वॉचची भूमिका कायम असून आज ३ जून २०२२ रोजी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा दर स्थिर ठेवला. सलग १२ व्या दिवशी इंधन दर जैसे थेच आहेत. आज शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १११.३५ रुपये इतका आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये इतका आहे. कोलकात्यात १०६.०३ रुपये आणि चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.६३ रुपये झाला आहे. बंगळुरुमध्ये पेट्रोलचा भाव १०१.९४ रुपये इतका असून चंदीगडमध्ये ९६.२० रुपये इतका आहे. मुंबईत आज एक लीटर डिझेलचा ९७.२८ रुपये इतका आहे. दिल्लीत डिझेल ८९.६२ रुपये आहे. चेन्नईत एक लीटर डिझेलचा भाव ९२.२४ रुपये इतका असून कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.७६ रुपये…

Read More

हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या बिलात सेवा कर लावणे बेकायदा असल्याचे भारत सरकारने सांगितले. लवकरच केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या बिलात सेवा कर अर्थात सर्व्हिस टॅक्स लागू करू नये यासाठी दिशानिर्देश दिले जातील. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) ही संस्था केंद्राच्या सूचनेनुसार निर्देश देणार आहे.  हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या बिलात सेवा कर लावणे बेकायदा असल्याचे भारत सरकारने सांगितले. लवकरच केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या बिलात सेवा कर अर्थात सर्व्हिस टॅक्स लागू करू नये यासाठी दिशानिर्देश दिले जातील. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय / National Restaurant Association of India – NRAI) ही संस्था केंद्राच्या सूचनेनुसार निर्देश देणार आहे. अनेक हॉटेल…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गीता मधुसूदन पाटील हिने 2019-2021 मध्ये एमएससीमध्ये 84 गुण मिळवून पर्यावरण शास्त्र या विषयात सुवर्ण पदक मिळवले आहे. ती सेवानिवृत्त विभागीय सहनिबंधक एम.डी.पाटील व वैशाली पाटील यांची मुलगी तर महापारेषणचे सहायक अभियंता व दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 विजेते हर्षवर्धन पाटील यांची बहीण आहे.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी ग्रीन ह्युमन फाउंडेशनतर्फे दररोज स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. 29 मे रोजी फाउंडेशन व जेसीआय जळगावतर्फे सुभाष चौकात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात भवानी मंदिरापासून ते संपूर्ण दाणाबाजार परिसर स्वच्छ करण्यात आला. महापौर जयश्रीताई महाजन यांनी ग्रीन ह्युमन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसोबत श्रमदान करत घंटा गाडीत कचरा टाकण्याचे आवाहन केले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रियंका कौराणी, उपाध्यक्ष रूपाली किरंगे, सचिव काजल सैनी, सहसचिव हितेश शिंपी, जेसीआय जळगावचे अध्यक्ष भाग्येश त्रिपाठी, प्रथमेश दायमा, अशुतोष दायमा, वरूण जैन, प्रतीक सेठ, भूषण कासार, सूरज बिर्ला उपस्थित होते.

Read More