Author: Saimat

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंविरुद्ध ईडीने सुरू केलेल्या कारवाईबाबत प्रथमच खासदार रक्षाताई खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. ईडीच्या दृष्टीने ते योग्य असले तरी आम्हाला ही कारवाई योग्य वाटत नाही.हा विषय न्यायालयात असल्याने जो निर्णय येईल तो मान्य असेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या कामांची माहिती देण्यासाठी शुक्रवारी खासदार खडसे यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या कारवाई संदर्भात प्रथमच आपले मत व्यक्त केले.केंद्राला एजन्सी या नात्याने ईडीची कारवाई योग्य वाटत असेल परंतु आम्हाला ती मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राला त्यात तथ्य वाटते त्या पध्दतीने ती कारवाई केली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पहिलीत शिकणारा सात वर्षाचा चिमुरडा असलेला जळगावचा अनय डोहोळे याने भारतरत्न, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यांना स्व-हस्ताक्षरात पत्र लिहून त्यांचे छायाचित्र व स्वाक्षरी पाठवावी अशी इच्छा व्यक्त केली होती आणि खरंच अनयच्या या बालहट्टाला प्रतिसाद देत सचिन तेंडुलकर यांनी स्वतःची स्वाक्षरी असलेले विश्वचषक हातात घेतलेले व शतक झळकविलेल्या नंतर अभिवादन करतांनाचे छायाचित्र पाठविले. सोबत स्वतःच्या लेटर पॅडवर अनुभव शेअर करीत मोठे स्वप्न पहा त्यासाठी कठोर परिश्रम करा, यश हमखास मिळेल असा संदेशही दिला आहे.अनय हा सौ.अनघा व अजय डोहोळे यांचा मुलगा असून वाघनगर येथील विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडियम शाळेचा विद्यार्थी आहे.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शेतकरी व कृषिउद्योजकांच्या पुढच्या पिढीला चालना देण्यासाठी फाली औद्योगिक जगतातील नायकांना एकत्रित आणत आहे. त्यासाठी जैन हिल्स येथे फाली आठव्या संम्मेलनाचा पहिले सत्र 1 व 2 जून ला यशस्वी पार पडले. या संम्मेलनाचे दुसरे सत्र 4 व 5 जूनला घेतले जात आहे. या दुसऱ्या सत्रामध्ये उर्वरित 400 विद्यार्थी सहभागी होत आहेत. या संम्मेलनासाठी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील 135 शाळांमधील 11 हजार विद्यार्थ्यांमधून 800 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. फालीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 25 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले आहे. जैन हिल्स येथे आयोजित ‘फाली`च्या आठव्या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात गुरुवारी पहिल्या सत्रात 67 शेती व्यवसाय योजना आणि…

Read More

 जळगाव ः प्रतिनिधी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड तसेच अतिरिक्त आयुक्त       श्‍्याम गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग प्रमुख  संजय ठाकूर यांनी त्यांचे सहकाऱ्यांसमवेत काल सकाळी महाबळ कॉलनी रोडवरील काव्यरत्नावली चौक ते स्वातंत्र्य चौकातील रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करीत असलेल्या फळ विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागामार्फत धडक कारवाई करून त्यात 11 वजन माप काटे तसेच त्यांच्याजवळ असलेल्या साधारणतः दोन ते तीन किलो प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्तीची कारवाई केली. तसेच शहरातील एम. जे.कॉलेज गेट समोरील रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणारे पाणीपुरी व चायनीज गाडी व्यावसायिकांवर तसेच इतर हॉकर्स व्यावसायिकांवर काल संध्याकाळी  अचानक अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. त्यात   या  हॉकर्स व्यावसायिक…

Read More

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. नोकरी असो किंवा कौटुंबिक आनंद, आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज कामाच्या ठिकाणी प्रभाव राहील. आज मूड चांगला राहणार आहे, कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि क्षमतेचा आज तुम्हाला पुरेपूर फायदा मिळेल. आज कमाई देखील वाढणार आहे. कुटुंबाच्या गरजांची पूर्ण काळजी घ्या. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक सुख अपेक्षेप्रमाणे राहणार आहे. तुम्ही दिवसभर आनंदी राहाल, आज तुम्ही कुटुंब…

Read More

ज्येष्ठ उद्योजक आणि ‘सुहाना-प्रवीण मसालेवाले’चे संस्थापक हुकमीचंद सुखलाल चोरडिया (९२) यांचे वृद्धापकाळाने आज (शुक्रवारी) निधन झाले. त्यांच्यामागे राजकुमार, डॉ. प्रवीण, प्रदीप, धन्यकुमार हे चार मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे माजी सभापती विशाल चोरडिया हे त्यांचे नातू होत. हुकमीचंद यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३० रोजी नगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला. कमलबाई यांच्यासोबत लग्नानंतर काही काळ ते सोलापूर जिल्ह्यात वास्तव्याला होते. तेथे त्यांनी ‘आनंद मसाला’ हा घरगुती मसाले तयार करून विकला. नंतर, पुण्यात हडपसर परिसरात नोकरी करत असतानाच संध्याकाळी घरोघरी फिरुन मसाले विकलेत. मिरची बियाणे विक्री करता करताच हुकमीचंद यांना मसाला तयार करण्याची कल्पना सुचली…

Read More

बोदवड़ प्रतिनिधी शिवसेनेच्या नेत्या दिपाली सैय्यद नावाच्या एका महिलेने भारत देशाच्या महत्त्वाच्या संवैधानिक पदावरील व्यक्ती पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींजी विषयी काही वादग्रस्त विधाने केलीत हे खरंच खूप भयानक आहे जर मोदींना मारायची त्यांची गाडी फोडायची “धमकी” वजा “इशारा” जर या श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात दिली जात असेल तर हा राष्ट्रद्रोह का समजू नये तसेच अश्या लोकांवर गुन्हा दाखल करून कारवाई का होवू नये माननीय नरेंद्रभाई मोदीजी ते कुण्या एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत किंवा एका राज्याचे मुख्यमंत्री ही नाहीत ते संपूर्ण भारत देशाचे नेतृत्व उत्तमरित्या सांभाळणारी एक जबाबदार व्यक्तीमत्व आहेत आणि हे भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगातील देशांनाही माहिती आहे. जर…

Read More

अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्ग-६ वर लोणी ते मुर्तीजापूर पर्यंत एकूण 5 दिवस, रस्त्यावर अखंड बिटुमिनस काँक्रिट पेव्हिंगचा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज पहिल्या दिवशी, 3 जून रोजी,सकाळी सात वाजून 27 मिनिटांनी प्रारंभ झाल्यानंतर, सायंकाळी 6 वाजेपर्यंत, ९ मीटर रुंदीच्या रोडवर, 4000 रनिंग मीटर बिटुमिनस काँक्रिटचा टप्पा गाठला. म्हणजेच दोन्ही लेन मिळून 8 किलोमीटरचा टप्पा पार झालेला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, रखरखत्या उन्हात, राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. चे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे समन्वयक व चमू न थकता, न दमता, हा विक्रम गाठण्यासाठी लक्ष केंद्रित करून काम करीत आहेत. अमरावती-अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेचा तडाखा असतानादेखील, महामार्ग बांधकामाचे…

Read More

मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवार यांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळे  पुजाअर्चा व अभिषेक करत आहेत. नातू आ. रोहित पवार  हे देखील मोठ-मोठ्या लोकांवर वक्तव्य करुन पुढे येत आहेत. तर पवारांचे पुतणे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मुख्यमंत्री होण्याच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे, सुप्रिया, अजित की रोहित… यापैकी पवारांमधला मुख्यमंत्री पदाचा नेमका उमेदवार कोण? हे पवारांनी घरच्या घरी ठरवून घ्यावे, असा टोला भाजप नेते प्रविण दरेकरांनी पवार कुटुंबीयांना लगावला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. रोहित पवारांना दरेकरांचा खोचक सल्ला आ. रोहित पवारांनी नुकतीच आमदार बनून राजकारणाची इनिंग सुरु केली आहे. आपली उंची काय आपण बोलतोय काय याच भान रोहित पवारांनी ठेवाव.…

Read More

विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी दि. 02/06/2022 रोजी मौजे घोसला येथील राखीव वनात काही इसम अवैध शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गुप्त माहिती वन विभागास मिळाली. सदरील माहितीच्या अनुषंगाने श्री राहुल सपकाळ वन परिक्षेत्र अधिकारी सोयगाव (प्रा.) हे त्यांच्या टीमसह तात्काळ घोसला राखीव जंगलाच्या दिशेने निघाले. सदर ठिकाणी पोहचले असता वनाधिकाऱ्यांना एक अज्ञात इसम पाठीवर रानडुक्कर घेऊन जात असताना दिसला. वनाधिकारी आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून आरोपीने रानडुक्कर खाली जमिनीवर टाकून डोंगराच्या दिशेने पळ काढला. दरम्यान आरोपी पळ काढत असल्याचे पाहून वनाधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने त्याला पकडले. सदरील आरोपीस विचारणा केली असता अजून 7 इसम त्याच्या सोबत असल्याची माहिती…

Read More