विजय चौधरी,सोयगाव प्रतिनिधी महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या महाराष्ट्रभर सुरु असलेल्या निवडणुकीतील • मतपत्रिका नाशिक जिल्ह्यातील आहे. ती विविध भागातून गायब होत असल्याचा प्रकार सिन्नर पोलिसांच्या मदतीने मध्य महाराष्ट्राचे उमेदवार धनंजय खाडगीर यांनी उघडकीस आणला आहे. महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलची निवडणूक प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरु झाली असून राज्यभरातून ३५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. यासाठी राज्यातून २ लाख ८५ हजार मतदार बॅलेटपेपर द्वारे करणार मतदान करत आहे. फार्मसी कौन्सिलद्वारे मतदारांना पोस्टाद्वारे बॅलेट पेपर पोहोच केले जात असून दिनांक २३ मे ते १७ जून दरम्यान मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत दरम्यान, पोस्ट ऑफिसमधून प्रतिस्पर्धी उमेदवार मतदारांचे बॅलेट पेपर परस्पर गायब होत…
Author: Saimat
विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी पोलीस प्रशासनाचे काम चांगले असून पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यात काम करताना महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे. जिल्हा आणि शहरी भागात असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ‘सुरक्षित आवार (कॅम्पस)’ संकल्पना राबविण्यात आली पाहिजे. या अंतर्गत रगिंग, छेडछाड, विनाकारण त्रास देणे, अत्याचार अशा गोष्टींना प्रतिबंध बसू शकेल. प्रत्येक आस्थापनेत विशाखा समितीची स्थापना व्हावी. महिला दक्षता समित्यांच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थाना सोबत घेऊन कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात याव्यात, दामिनी पथकांच्या पोलिसांना वारंवार रिफ्रेशर प्रशिक्षणे द्यावीत, दक्षता समित्यांच्या संवेदनशील सदस्यांना पीडित महिलांच्या संपर्कात राहायला सांगून समुपदेशन व धीर द्यावा असे निर्देश आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस प्रशासनास…
मेष : मेष राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. नोकरी असो किंवा कौटुंबिक आनंद, आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज कामाच्या ठिकाणी प्रभाव राहील. आज मूड चांगला राहणार आहे, कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि क्षमतेचा आज तुम्हाला पुरेपूर फायदा मिळेल. आज कमाई देखील वाढणार आहे. कुटुंबाच्या गरजांची पूर्ण काळजी घ्या. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. वृषभ : आज वृषभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक सुख अपेक्षेप्रमाणे राहणार आहे. तुम्ही दिवसभर आनंदी राहाल, आज तुम्ही कुटुंब…
पाळधी ता धरणगाव : वार्ताहर महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बिलखेडा येथे भव्य आरोग्यशिबिर झाले. तसेच जांभोरा येथे गरजूंना रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासूनच जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हे भव्य रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर्व आजारांवर मोफत उपचार व औषधे उपलब्ध करून देण्यात आले विशेषतः लहान मुलांसाठी विशेष बाल रोग तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांनी या आरोग्य शिबिराचे कौतुक करताना सांगितले की, आरोग्य शिबिर अनेक होतात परंतु आरोग्य तपासणी सोबत औषधांचे वाटप होणारे…
जळगाव : विशेष प्रतिनिधी गुरुवारच्या मध्यरात्रीनंतर किंवा शुक्रवारच्या अगदीच पहाटे शहरातील कासमवाडी परिसरातील मासळी बाजार नजीकच्या मैदानावर सागर वासुदेव पाटील या 27 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला.शुक्रवारी सकाळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला तसा पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि काही तासातच पोलिसांनी दोघा संशयित खुन्यांना ताब्यात घेतले. तद्नंंतर त्या खुनाचा तपास लावण्यात त्यांना म्हणजे पोलिसांना यश आले.गुन्ह्याचा उलगडा व आरोपी निष्पन्न केल्यामुळे तापसाधिकारी व सहकारी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीच पाहिजे. त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. मात्र ,जर असेच गुन्हे जसे चोऱ्या,घरफोड्या,सोनपोत ओढून पळणे, हातातून महागडा मोबाईल हिसकून पळणे, हाणामाऱ्या,खुनी हल्ले व खून…
जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीर प्रशासनाने सुरक्षेचे आश्वासन देऊनही खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे स्थलांतर सुरू झाले आहे. उत्तर काश्मीरमधील संक्रमण शिबिरापासून ते शेखपोरा बडगामच्या हाय-प्रोफाइल निवासस्थानापर्यंत सर्वत्र शांतता आहे. प्रशासन स्थलांतराचे वृत्त नाकारत असेल, पण घरांना लावलेली कुलूपे त्याची साक्ष देत आहेत.खोऱ्यात 5,900 कर्मचारी आहेत. त्यापैकी 1,100 निर्वासितांच्या शिबिरात व तर 4700 खासगी निवासस्थानात राहतात. निर्बंध असूनही यातील 80 टक्के कर्मचारी काश्मीर सोडून जम्मूमध्ये पोहोचले आहेत. या स्थितीतही अनंतनाग, बारामुल्ला, श्रीनगरमधील शिबिरांमध्ये राहणारी अनेक कुटुंबे बाहेर पडू शकत नाहीत. कारण प्रशासनाने त्यांना बाहेर पडण्यास बंदी घातली आहे. कर्मचारी तणावात, कारण सांगून बाहेर राज्यपाल मनोज सिन्हा यांना भेटलेल्या प्रतिनिधींतील एका काश्मीरी पंडिताने सांगितले…
जळगाव ः प्रतिनिधी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा शेवटपर्यंत जपणारे, आंबेडकरी साहित्यिक चळवळीला गतिमान करणारे, वामनदादा कर्डक यांचे ज्येष्ठ शिष्य प्रतापसिंग बोदडेे (वय 74) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काल जळगाव येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, गायक मुलगा, 4 मुली आणि चळवळीचा मोठा परिवार आहे. ते भारतीय रेल्वेतून सेवानिवृत्त झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा झाल्याने मुक्ताईनगरमध्ये आणले होते. शुक्रवारी सकाळी प्रकृती बिघडल्याने जळगाव येथे नेण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी मुक्ताईनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.भीमराज की बेटी मैं तो जयभीम वाली हूँ… या गीताने महाराष्ट्रात कान्याकोपऱ्यात पोहोचलेले…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या (ग.स.) 15 महिन्यांच्या प्रशासकीय कार्यकाळात संस्थेत बेशिस्त वातावरण तयार झाले आहे. प्रशासकीय काळात केलेल्या विविध आर्थीक तरतूदी देखील विसंगत आहे. या काळात कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त वातावरणामुळे संस्थेत आता शिस्त लावणे गरजेचे आहे. त्यामुळे परिणामकारक बदल केला जाणार आहे. तसेच सभासदांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचननाम्याची पूर्तता म्हणून सभासदांसाठी विविध सवलती देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत माहिती देताना अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, प्रशासक काळात 22 कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांचे उपदानाचे 4 कोटी देणे आहे मात्र 1 कोटी 95 लाखाचीच तरतूद केली…