Author: Saimat

यावल (सुरेश पाटील) अविज पब्लिकेशन कोल्हापूर व इन्मा गॅलॅक्सि पूणे व बँको यांच्या तर्फे लोणावळा येथील हॉटेल रेडीसन येथे चंद्रकांत बाळकृष्ण वाणी (सी. ई. ओ. श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक लि. यावल )यांना बॅको ब्लू रिबन 2021 ऑल इंडिया अर्बन बँक कॅटेगिरी मध्ये प्रथम क्रमांकाच्या पूरस्काराने रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सी.जी एम काळे साहेब(मूंबई)बँकोचेअविनाश शिंत्रे गुंडाळे (कोल्हापूर)नाईक (पूणे) यांच्या हस्ते बँकेला सन्मानित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत बँकेच्या संचालक मंडळाने दिली. मंगळवार दि.7 जून 2022 रोजी यावल येथील बँकिंग क्षेत्रात सुरक्षित आणि मजबूत असलेली श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक लिमिटेड यावल संचालक मंडळ व बँक मॅनेजर यांच्यातर्फे पत्रकार परिषद…

Read More

मुंबई :प्रतिनिधी  एकीकडे राज्यसभा निवडणुकीच्या  घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे विधान परिषद निवडणुकींसाठीही हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून कोणते उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवावे याकरिता चाचपणी सुरु झाली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विधान परिषद उमेदवारीवर चर्चा करण्याकरिता काल रात्री राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यासंदर्भांत चर्चा झाल्याची माहिती आहे. विधान परिषद निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीचा कोणता नेता उतरवावा…

Read More

मेष राशी : मेष राशीच्या लोकांचे भाग्य तुमच्या सोबत आहे, तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल. तुमचे बोलणे मधुर असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. तुम्ही तुमच्या हुशारीने तुमचे काम यशस्वी कराल. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. नोकरीत चांगले आर्थिक लाभ होतील आणि प्रभाव व वैभवात वाढ होईल. व्यापार्‍यांसाठी नफ्याची स्थिती आहे. आज ७६% नशिबाची साथ आहे. हनुमानाला चोळ अर्पण करा. वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांनी मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. आर्थिकदृष्ट्या मजबूत वाटेल. व्यवसायात समजूतदारपणाने काम केले तर अडचणी सुकर होतील. तरुणांना करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. राजकीय बाबी पक्षात सोडवता येतील. कौटुंबिक सुख चांगले राहील. मुलाकडे लक्ष…

Read More

भडगाव प्रतिनिधी : आमीन पिंजारी कजगाव ता भडगाव येथून जवळच असलेल्या लोनपिराचे येथील विकास सोसायटी ची निवडणूक बिनविरोध करण्यात आली लोन बोदर्डे घुसर्डी बोरणार आदी गावातील शेतकरी ह्या सोसायटीत सदस्य आहेत बिनविरोध झालेल्या सदस्यांमध्ये सोमनाथ पाटील पंढरीनाथ पाटील दीपक पाटील संतोष पाटील भीमराव पाटील रायचंद परदेशी प्रदीप पाटील भाऊसाहेब पाटील सुरेश खैरनार अरुणाबाई पाटील सरस्वताबाई पाटील प्रभाकर पाटील विठ्ठल पाटील आदींची संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे सदरील निवड बिनविरोध करण्यात आल्याने सर्व संचालकांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले यावेळी रवींद्र पाटील भिला पाटील सतीलला पाटील गोकुळ पाटील नाना पाटील वाल्मिक पाटील नंदकिशोर पाटील विजय पाटील राजेंद्र पाटील भीमराव पाटील सुरेश…

Read More

मुंबई –  प्रतिनिधी राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वाढायला लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.७) मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली. यावेळी मास्कसक्तीबाबत सध्या कुठलाही निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, कोविडबाबत प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागामार्फत आपण संपूर्ण माहिती देतो. नेहमीप्रमाणं आजही याचं प्रेझेंटेशन झालं. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पॉझिटिव्हीटी वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळं चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना आज कडक पद्धतीनं देण्यात आल्या आहेत. पॉझिटिव्हीटी रेट सहा जिल्ह्यांमध्ये खूपच जास्त झाला आहे. ८ टक्के, ६ टक्के असा…

Read More

मुंबई: प्रतिनिधी  सध्या कारागृहात असलेले मंत्री नवाब मलिक आणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार का! याचा फैसला बुधवार ता.8 रोजी होणार आहे. सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) केलेल्या आरोपांमुळे मंत्री मलिक व माजी मंत्री देशमुख सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. या दोन्ही नेत्यांनी न्यायालयात अर्ज करून मतदानासाठी परवानगी मागितली आहे. दोन्ही नेत्यांच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीने वेळ मागितला आहे. या दोन्ही अर्जांवर ईडीने बुधवारपर्यत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. येत्या 8 जुन रोजी यावर सुनावणी आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी राज्यसभेसाठी मतदान करता यावे म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केले होते. हे दोघे राष्ट्रवादीचे नेते…

Read More

विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी सोयगाव शहरातील जुना बाजार चौक भागातील कुलूपबंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी भरदिवसा शनिवारी दिनांक ४ रोजी सकाळी ११.वाजता जबरी चोरी केली होती या मध्ये ७० हजार रुपयांचे दागीने व रोख रक्कम ३० हजार असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. कुटुंबातील सर्व सदस्य लग्नासाठी आळंद ता. सिल्लोड तेथे गेल्यामुळे जुना चौक भागात राहणारे युनूस तुराब शहा यांच्या कुलूप तोडून व कोंडा तोडुन चोरट्यानी घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली होती याबाबत रमजान युनूस शहा यांनी सोयगाव ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता सोयगाव पोलीस सहायक निरीक्षक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ॲम्बीस संगणकीय प्रणालीचे उद्घाटन आज सकाळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस उपअधीक्षक (गृह) संदीप गावित, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक विठठल ससे, पोलीस निरीक्षक श्री. ठोंबे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, शहर पोलीस निरीक्षक(अ.मु.) वसंत कांबळे, पोलीस उप निरीक्षक(अ.मु.) सचिन डोंगरे आदी अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. संगणकीय प्रणालीमध्ये आरोपींच्या अंगुली मुद्रा पत्रिका, तळहाताच्या पत्रिका, चेहरा (छायाचित्र). डोळ्यांचे बुबुळ हे डिजिटल स्वरुपात जतन करून जुळवण्याची क्षमता आहे. पोलीस ठाणे स्थरावर प्रणाली राबविणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य आहे.…

Read More

रायगड : वृत्तसंस्था रायगड किल्ल्यावर भव्य असा 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. औत्सुक्याने आणि आदराने हा सोहळा जगभर पाहिला जातो. या सोहळ्याचे ऐतिहासिक मूल्य पाहता शिस्तबद्धतेच्या काळजीसह प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक असा हा सोहळा होत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा ‘शिवराय मनामनात – शिवराज्याभिषेक घराघरांत` ही संकल्पना घेऊन किल्ले रायगडावर अत्यंत भव्यदिव्य प्रमाणात साजरा होत आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या सूचनेनुसार या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.आकर्षक विद्युत रोषणाईने रायगड उजळून निघाला आहे. गडावर पाच ते सहा लाख शिवभक्तांचे…

Read More