Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात अनेक गावठाण जागा आहेत. ज्यांच्या मालकी हक्कांची अधिकृत नोंदच नाही. केंद्राच्या स्वामित्व हक्क योजनेंतर्गत गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात ड्रोनच्या मदतीने मोजणी करण्यात येत आहे. त्यामुळे लाखो मालमत्तांना सनद मिळू शकणार आहे. जिल्ह्यातील महसूल क्षेत्राची मोजणी ब्रिटीश काळात 1919 मध्ये झाली होती. तेव्हा पहिला सिटी सर्व्हे झाला होता. त्यानंतर 30-35 वर्षांनंतरच मालमत्तांची मोजणी झाली. ती देखील अर्धवटच झाली. जिल्ह्यतील 275 गावांची पारंपारिक पध्दतीने मोजणी झाली. केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेतंर्गत जिल्ह्यात डिसेंबर 2021पासून ड्रोनच्या माध्यमातून मालमत्तांची मोजणी करण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 1150 महसुली गावांतील मालमत्ता, शेतजमीन, गावठाण जमिन यांची मोजणी ड्रोनच्या सहाय्याने केली जात आहे.…

Read More

मेष राशी : मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येईल. तुम्ही तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही हुशारीने काम केले तर तुम्ही अतिरिक्त पैसे कमवू शकता. सामाजिकदृष्ट्या सक्रिय लोकांना इतरांना मदत करण्यात आनंद होईल. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि तुम्ही काही महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करू शकाल. तुमच्या नवीन कल्पना आणि कार्यशैलीचे कौतुक केले जाईल. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. ​वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. काही लोकांना तुमची उदारता आवडेल. पैसे कमावण्याच्या संधी मिळतील. न्यायालयीन प्रकरणे तुमच्या बाजूने होतील. नोकरदार लोकांचे सहकार्‍यांशी वाद होऊ शकतात, काळजी घ्या. व्यावसायिकदृष्ट्या, गोष्टी सुरळीत राहतील आणि तुमची…

Read More

पारोळा शहर प्रतिनिधी :            पारोळा शहरातील श्री. बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित आप्पासो. यु. एच. करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला असून यात भाऊ बहीण संयुक्त प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.  पारोळा शहरातील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित आप्पासो.यु. एच.करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेत पारोळा शहरातील  तेजस विश्वास चौधरी व सुजता प्रदीप चौधरी हे दोघे भाऊ बहीण 82.67% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब यु.एच.करोडपती  सर संस्थेचे सचिव डॉक्टर सचिन बडगुजर संस्थेचे मुख्याध्यापक प्राचार्य विजय बडगुजर व शिक्षक शिक्षकेतर वृंद व पारोळा…

Read More

मुक्ताईनगर – प्रतिनिधी  सुप्रसिद्ध आंबेडकरी ख्यातनाम कवी गायक दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम येत्या 9 रोजी  भदन्त विशुद्धानंद  बोधी तसेच भारतीय बौद्ध महासभेचेतर्फे आयोजित करण्यात आला असून त्याच रोजी  गीत गायनाच्या माध्यमातून  श्रद्धांजलीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.           या कार्यक्रमास पूज्य भदन्त विशुद्धानंद बोधी व त्यांचा पवित्र भिक्षु संघ तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांच्यासह प्रसिद्ध  कवी गायक आनंद शिंदे  प्रकाशनाथ पाटणकर, विष्णु शिंदे , दत्ता शिंदे  तसेच शिंदे परीवार शाहीर डी.आर.इंगळे, राहुल अनविकर  , नागसेन  सावदेकर  , प्रा.डॉ.किशोर वाघ, कुणाल  वराळे , नानासाहेब इंदीसे , विजय मांडकेकर , राजाभाऊ शिरसाट, संतोष गायकवाड, धम्मानंद…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महानगरपालिकेच्या माध्यमातून स्त्री संसाधन केंद्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मनपा क्षेत्रात सात सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीच्या माध्यमातून योजनेसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार आहे. स्त्री संसाधन केंद्र योजनेच्या समिती अध्यक्षपदी मनपाचे अतिरीक्त आयुक्त श्‍याम गोसावी, सदस्यपदी नागरी समाज संघटनेचे प्रतिनिधी म्हणून निवेदिता सुनिल ताठे, मनिषा किशोर पाटील, मराठी प्रतिष्ठानचे ॲड. जमील देशपांडे, फिरोज रफिक शेख, आर्या फाउंडेशनच्या छाया रविंद्र पाटील, सदस्य सचिवपदी महिला व बालकल्याण विभागाच्या अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड आयुक्त विद्या गायकवाड यांनी केली आहे.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीत भाजपाने पंकजा मुंडे यांना डावलल्याने मुंडे समर्थक संतप्त झाले आहेत. विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच मुंडे यांना डावलल्याचा आरोप करत निषेध करण्यात आला. वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर टरबूज फोडून भाजप नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून पाच जागांकरिता उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याने वंजारी समाजाचे कार्यकर्ते ईश्वर पाटील, अनिल घुगे, गजानन वंजारी, रितेश लाडवंजारी, योगेश नाईक, राहुल सानप, शेखर लाडवंजारी, महेश घुगे, तेजस वाघ, विशाल घुगे, अभिजीत घुगे, गौरव वाघ, किरण नाईक, वैभव वाघ, ऋषिकेश वाघ, आकाश पाटील, मयूर पाटील,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महावितरणमध्ये कंत्राटी महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तणूकप्रकरणी महावितरणच्या मानव संसाधन विभागाच्या व्यवस्थापकासह लिपिकाला पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर महावितरणच्या कार्यकारी संचालकांनी दोघांना निलंबित केले आहे. व्यवस्थापक उद्धव रामभाऊ कडवे व निम्नस्तर लिपिक राजेंद्र निळकंठ अमोदकर अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहे. पीडीत महिलेने महावितरण कार्यालयाच्या विशाखा समितीकडे कडवे व अमोदकर याने अश्लील वर्तन केल्याची तक्रार दाखल केली होती परंतु त्याची दखल न घेतल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता तसेच शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी देखील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.या तक्रारीच्या आधारे महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक अरविंद भादलीकर (मुंबई) यांनी दोघांच्या निलंबनाचे आदेश काढले.

Read More

मुंबई : प्रतिनिधी  येत्या २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे  आणि रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी झहीर झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आभार मानत भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडे  यांना उमेदवारी न दिल्यावरून खंतही व्यक्त केली. माझे नाव विधान परिषदेसाठी जाहीर केले यासाठी मी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मी मनापासून आभार मानतो. मागील ४० वर्षे भाजपामध्ये निष्ठेने काम करत होतो. पण अनेकदा त्याठिकाणी माझ्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली. भाजपात असताना विधान परिषदेसाठी नाव देण्याचे आश्वासन देण्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महेश नवमी हा दिवस माहेश्वरी समाजाच्या वंश उत्पत्ती दिनाचे प्रतीक म्हणून देशभरात साजरा केला जातो. या निमित्ताने माहेश्वरी समाजातर्फे बुधवारी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी समाजबांधवांनी काढलेल्या शोभायात्रेने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले होते. महेश नवमीनिमित्त पहाटे 6.30 वाजता ‘बालाजी मंदिर संस्थान` येथे अभिषेक व आरती, पांजरपोळ गोशाळेत अ.भा. माहेश्वरी सभेच्या संघटन मंत्री शैला कलंत्री यांच्या हस्ते गोसेवा, अयोध्यानगर येथील महादेव मंदिरात सकाळी 9.30 वाजता आरती, सकाळी 10 वाजता वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांच्या उपस्थितीत स्व. मोतीभाऊ दहाड परिवारातर्फे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम, सकाळी 10.30 वाजता माहेश्वरी बोर्डिंग येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक…

Read More