विजय चौधरी, सोयगाव प्रतिनिधी छायाचित्रओळी-सोयगाव घरफोडी प्रकरणातील आरोपींना पोलिसांसोबत,दुसऱ्या छायाचित्रात आरोपींकडून हस्तगत केलेले कुलूप तोडीचे साहित्य. सोयगाव शहरातील जुना बाजार चौकात भरदिवसा झालेल्या जबरी घरफोडीत पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करून मंगळवारीही दुसरा आरोपी सराफा दुकानदार यास मंगळवारी शिताफीने अटक केली असून दोघांना मंगळवारी सोयगाव न्यायालयासमोर हजे केले असता,त्यांना गुरुवारपर्यंत तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.दरम्यान सोयगाव घरफोडी प्रकरणाचे धागेदोरे शेंदुर्णी ता.जामनेर येथेच आढळून आल्याने सोयगावात खळबळ उडाली आहे.सोयगाव शहारापासून हाकेच्या अंतरावर शेंदुर्णी हे मोठे बाजारपेठ म्हणून गाव आहे याच गावात सोयगाव शहरातील जबरी घरफोडीचे धागेदोरे सोयगाव पोलिसांना हाती आले आहे. शेंदुर्णी ता,जामनेर गावातून सोमवारी संदीप गुजर यास…
Author: Saimat
-सत्ता स्थापनेवेळची रणनीती पुन्हा अमलात, अपक्ष आमदारांची साथ मिळवण्यात यश -राज्यसभेच्या चारी जागा निवडून येण्याचे स्पष्ट संकेत ;ट्रायडंट हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन प्रतिनिधी । मुंबई दाेन वर्षापूर्वी राज्यात तीन पक्षांच्या सरकार स्थापनेवेळी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या आमदारांची एकजूट करण्याची रणनीती आखली होती, त्याचपद्धतीने मंगळवारी (ता.७) राज्यसभा निवडणुकांसाठी एकजूट दाखवण्यात आली. अपक्ष व छोट्या पक्षांचे १३ आमदार आज ट्रायडंट हॉटेलमध्ये आघाडीने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे शुक्रवारी (ता.१०) होत असलेल्या सहा जागांच्या निवडणुकीत आघाडीचे ४ सदस्य राज्यसभेवर बिनदिक्कीतपणे निवडुन जाणार असे स्पष्ट संकेत दिसत आहेत. बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील व निवडणूक प्रभारी मल्लिकर्जून खर्गे…
जळगाव ः प्रतिनिधी एमआयडीसीतील नेहा प्लास्टिक इंडस्ट्रीजमध्ये उत्पादीत पिशव्यांची जाडी मोडण्याच्या पध्दतीवरून काल मनपा प्रशासनाविरूध्द मालक असा दोन तास वाद झाला. मायक्रॉन कशा पध्दतीने मोजावे यासाठी जळगाव, नाशिकपासून थेट मुंबईपर्यंत मार्गदर्शन घेण्यात आले. अखेर पिशव्यांची एका बाजूची मोजणी केली जाते हे स्पष्ट झाल्यानंतर कंपनीला सायंकाळी 7 वाजता सील ठोकण्यात आले तसेच मालकाला 10 हजारांचा दंड करण्यात आला. महापालिका पथकाकडून सध्या प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन, विक्री व वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. 1 ते 6 जून या सहा दिवसांत तीन कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी जप्त केलेला माल सील बंद गोडावूनमधून हलवण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने आयुक्त विद्या गायकवाड…
जळगाव : प्रतिनिधी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यात सुरुवातीला गोंधळ गीत, शौर्यनृत्य, दांडपट्टा व कवायतींचे प्रात्यक्षिक या कार्यक्रमात सादर करण्यात आले. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यातर्फे सोमवारी शिवतीर्थ मैदानात शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने शिवजयंती महोत्सवाची सांगता करण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, करीम सालार, मुकुंद सपकाळे यांनी मार्गदर्शन केले. अनिता चौधरी यांच्या शिष्यांनी शौर्यगीत, शेखर कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी यांनी दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी आमदार राजूमामा भोळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, प्रतिभा शिरसाठ, अनंत जोशी, पुरुषोत्तम चौधरी,…
जळगाव ः प्रतिनिधी थॅलेसिमियाग्रस्त चिमुकल्यांची 40 चित्र प्रदर्शित झाली आहेत. ती कला संजीवनी चित्रप्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. भाऊंच्या उद्यानातील वानखेडे कला दालनात 10 जूनपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. केशव स्मृती प्रतिष्ठानचे सहकार्य लाभत आहे, असे डॉ. सई नेमाडे यांनी सांगितले. कोसला फाउंडेशनने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.व्यासपीठावर डॉ. राधेश्याम चौधरी, डाएटचे माजी प्राचार्य नीळकंठ गायकवाड, चोपडा येथील कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र महाजन उपस्थित होते. सकारात्मक ऊर्जा देणारा हा उपक्रम आहेे. थॅलेसेमिया रुग्णांवर कोसला फाउंडेशनच्या माध्यमातून उपचार उपलब्ध करून देणाऱ्या डॉ. सई नेमाडे यांच्यासोबत आपण सर्वांनी या आरोग्य…
बंगळुरु : वृत्तसंस्था राजकीय पक्षांमध्ये होणारे वाद काही लोकांसाठी नवीन नाहीत. जनकल्याण योजना, धोरणे, न्याय अशा अनेक मुद्यांवर राजकीय नेत्यांमध्ये चर्चा तसेच आरोप-प्रत्यारोप होत असतात पण कर्नाटकमधील एक वाद चक्क अंतर्वस्त्रापर्यंत पोहोचला आहे. काँग्रेस नेते सिद्धरमय्या यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निषेध करण्यासाठी चड्ड्या जाळल्या जातील असे वक्तव्य केले होत. याला उत्तर देताना आरएसएसने काँग्रेस कार्यालयात पाठवण्यासाठी अंतर्वस्त्रे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसची विद्यार्थी शाखा असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने राज्याचे शिक्षणमंत्री बीसी नागेश यांच्या घराबाहेर खाकी चड्डी जाळली. राज्यातील शालेय पाठ्यपुस्तकांच्या कथित ‘भगवीकरणा`च्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यानंतर कर्नाटकातील विरोधी नेते सिद्धरमय्या म्हणाले की, “नॅशनल…
जळगाव ः विशेष प्रतिनिधी जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे पूर्व नेते माजीमंत्री तथा सद्य स्थितीतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व भाजपचे गिरीश महाजन यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत आहे त्याचप्रमाणे जिल्हा पालकमंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटलांचेही खडसे यांच्याशी सख्य नाही.अर्थात महाजन व गुलाबराव दोन्हीही वजनदार नेते खडसेंच्या विरोधात आहेत आणि उल्लेखनीय की, राज्यात भाजप-शिवसेनेची युती नसली तरीही या दोघा नेत्यांचे गळ्यात गळे आहेत हे लपून राहिलेले नाही.याचा परिणाम येत्या जिल्हा दूध संघ,जिल्हा परिषद,पंचायत समित्या तसेच बाजार समित्या व नगरपालिका निवडणुकात होणे निश्चित असून खडसे यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांच्या दोस्तीने नवे राजकीय समीकरण होण्याची चिन्हे असून तसे…
मुंबई : प्रतिनिधी एकीकडे राज्यात राज्यसभा निवडणुकीवरून वातावरण तापलेलं असतानाच आता विधानपरिषद निवडणुकांसाठी देखील हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. लवकरच शिवसेनेकडून या दोन नावांची अधिकृत घोषणा होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.त्यात मुंबईचे सचिन अहिर यांचा समावेश असल्याचे विश्वसनीय गोटातील वृत्त आहे. सचिन अहिर यांचे पुनर्वसन? 2019च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले आणि आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवर पाणी सोडणारे सचिन अहिर यांचे नाव शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या माध्यमातून सचिन अहिर यांचे शिवसेनेकडून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा देखील अंदाज बांधला…
पहूर,ता.जामनेर प्रतिनिधी(विठ्ठल चव्हाण)- येथून जवळच असलेल्या पिंपळगांव कमानी येथील ग्रामपंचायत हद्दीतील इलेक्ट्रिक खांब तसेच हायमास्ट लँप वरील पथदिवे हे गेल्या २ वर्षापासून बंद आहेत.यामुळे गावात रात्रीच्या वेळी अंधार राहत असून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होत आहे. याबाबतीत सविस्तर माहिती अशी की,पिंपळगांव कमानी,ग्रामपंचायत हद्दीमधे हायमास्ट लँप(पथदिवे) सह एकूण २०-२२ इलेक्ट्रिक खांब आहेत त्यापैकी फक्त ३ खांब्यावरील पथदिवे सुरु असून बाकी सर्व बंद अवस्थेत पडले आहेत.याविषयी राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे माजी प्रदेशाध्यक्ष तथा जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,ग्रामपंचायत चे उपसरपंच-संदिपभाऊ राठोड,ग्रामपंचायत सदस्या-अनुसया चव्हाण,कैलासभाऊ चव्हाण,यांनी येथील ग्रामपंचायत चे सरपंचसाहेब यांना या दिव्यांची दुरुस्ती कधी करणार हे विचारले…