राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरु असेल. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. आपल्याला लोकांनी निवडून दिलं आहे. सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रातील लोकांचे संरक्षण करायला पाहिजे. मात्र, सध्या तसे होताना दिसत नाही. सध्या राजकारणात सुरु असलेल्या कुस्त्या या अगदी चिल्लर आहेत, असे उदयनराजे यांनी म्हटले. आज राजेशाही नाही, लोकशाही आहे या लोकशाहीत तुम्ही राजे आहात, लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार कोणत्याही पक्षातील असू द्या गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने सुरु असलेल्या राजकारणावर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. सध्या राज्यात कोणत्या कुस्त्या चालल्या आहेत, हे कळत नाही. मात्र, या…
Author: Saimat
जळगाव ग्रामीण प्रतिनिधी जळगाव तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे केळी पीक उत्पादकांचे नुकसान झालेअसून जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील सकाळी 6 वाजेपासून नुकसानीची पाहणी करण्यासाठी निघाले. काल संध्याकाळी 9 जून रोजी आलेल्या वादळी वाऱ्याने कापणीसाठी आलेले केळीचे पीक पार उद्ध्वस्त झाल्याने तालुक्यातील करंज, भोकर, भादली, पळसोद, किनोद, कठोरा, नंदगाव, देवगाव, गाढोदा आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहे. राज्यसभेचे खासदार निवडून देण्यासाठी निवडणूक असल्या कारणाने महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील हे मतदान करण्यासाठी आज मुंबई येथे आहेत. त्यांच्या निर्देशानुसार जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील हे मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व नागरिकांची भेट घेऊन सर्वोतोपरी मदत मिळवून…
पाचोरा – प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णसेवेचा मानबिंदू असलेले विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर पाटील यांच्या कार्याची दखल …इंडिया फोर्ब्ज… या आंतरराष्ट्रीय इंग्रजी नियतकालिकाने घेतली आहे. इंडिया फोर्ब्जच्या 3 जूनच्या अंकामध्ये (पृष्ठ 43 वर) …विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डिलिव्हरिंग अफोर्डेबल, कॉलिटी हेल्थकेअर सर्विसेस अप टू द लास्ट पर्सन ऑफ सोसायटी… या शिर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध केला आहे. या लेखांमध्ये विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. भूषण मगर -पाटील यांच्या समग्र रुग्णसेवेचा गौरव केला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या समाजाभिमुख डॉक्टरची दखल पहिल्यांदाच इंडिया फोर्ब्ज या इंग्रजी नियतकालिकाने घेतली आहे. यानिमित्ताने डॉ.भूषण मगर पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत…
भडगावं प्रतिनिधी : भडगावं येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिवस साजरा करण्यात आला असून ध्वजारोहन ज्येष्ठ नागरिक निंबा पाटील विकास सोसायटीचे चेअरमन निंभोरा, मोतीलाल नरवाडे भडगाव, प्रकाश गुरुजी , भगवान पाटील भडगाव ,यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष श्यामकांत भोसले, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष योजना ताई पाटील, अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष रफी उद्दीन शेख, शहराध्यक्ष शेरू पठाण ,मागासवर्गीय सेल अध्यक्षअरुण सोनवणे, युवक अध्यक्ष स्वप्नील पाटील, मा शहराध्यक्ष रवींद्र महाजन ,महिला शहराध्यक्ष हर्षदा पाटील, युवती तालुका अध्यक्ष दक्षता पाटील, अपंग सेल तालुका अध्यक्ष किसन धोबी, कजगाव शहराध्यक्ष अशोक…
जळगाव ः प्रतिनिधी बनावट कागदपत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांची साडेपाच लाखांची शिष्यवृत्ती दोघांनी लाटल्याची तक्रार केली होती. न्यायालयाच्या आदेशाने गुरुवारी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खान्देश बहुद्देशीय संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी नार्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी हे बांभोरी येथे आहे. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व प्राचार्य या तिघांच्या नावाने संस्थेचे स्टेट बँकेत खाते आहे. या खात्यात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे पैसे टाकले जातात. संस्थाध्यक्षा यांचे पती रतीलाल वना पाटील (आर. व्ही पाटील, रा. शिव कॉलनी) व उपाध्यक्षा यांचे पती विलास दत्तात्रय नायर (रा. प्रभुदेसाई नगर) या दोघांनी 12 मे 2018 ते 24 जून 2021 या कालावधीत बँक व्यवहारात विश्वासात न…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात अनेक गावठाण जागा आहेत. ज्यांच्या मालकी हक्कांची अधिकृत नोंदच नाही. केंद्राच्या स्वामित्व हक्क योजनेंतर्गत गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात ड्रोनच्या मदतीने मोजणी करण्यात येत आहे. त्यामुळे लाखो मालमत्तांना सनद मिळू शकणार आहे. जिल्ह्यातील महसूल क्षेत्राची मोजणी ब्रिटीश काळात 1919 मध्ये झाली होती. तेव्हा पहिला सिटी सर्व्हे झाला होता. त्यानंतर 30-35 वर्षांनंतरच मालमत्तांची मोजणी झाली. ती देखील अर्धवटच झाली. जिल्ह्यतील 275 गावांची पारंपारिक पध्दतीने मोजणी झाली. केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेतंर्गत जिल्ह्यात डिसेंबर 2021पासून ड्रोनच्या माध्यमातून मालमत्तांची मोजणी करण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 1150 महसुली गावांतील मालमत्ता, शेतजमीन, गावठाण जमिन यांची मोजणी ड्रोनच्या सहाय्याने केली जात आहे.…
मेष राशी : मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येईल. तुम्ही तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही हुशारीने काम केले तर तुम्ही अतिरिक्त पैसे कमवू शकता. सामाजिकदृष्ट्या सक्रिय लोकांना इतरांना मदत करण्यात आनंद होईल. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि तुम्ही काही महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करू शकाल. तुमच्या नवीन कल्पना आणि कार्यशैलीचे कौतुक केले जाईल. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. काही लोकांना तुमची उदारता आवडेल. पैसे कमावण्याच्या संधी मिळतील. न्यायालयीन प्रकरणे तुमच्या बाजूने होतील. नोकरदार लोकांचे सहकार्यांशी वाद होऊ शकतात, काळजी घ्या. व्यावसायिकदृष्ट्या, गोष्टी सुरळीत राहतील आणि तुमची…
पारोळा शहर प्रतिनिधी : पारोळा शहरातील श्री. बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित आप्पासो. यु. एच. करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला असून यात भाऊ बहीण संयुक्त प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पारोळा शहरातील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित आप्पासो.यु. एच.करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेत पारोळा शहरातील तेजस विश्वास चौधरी व सुजता प्रदीप चौधरी हे दोघे भाऊ बहीण 82.67% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब यु.एच.करोडपती सर संस्थेचे सचिव डॉक्टर सचिन बडगुजर संस्थेचे मुख्याध्यापक प्राचार्य विजय बडगुजर व शिक्षक शिक्षकेतर वृंद व पारोळा…
मुक्ताईनगर – प्रतिनिधी सुप्रसिद्ध आंबेडकरी ख्यातनाम कवी गायक दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम येत्या 9 रोजी भदन्त विशुद्धानंद बोधी तसेच भारतीय बौद्ध महासभेचेतर्फे आयोजित करण्यात आला असून त्याच रोजी गीत गायनाच्या माध्यमातून श्रद्धांजलीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पूज्य भदन्त विशुद्धानंद बोधी व त्यांचा पवित्र भिक्षु संघ तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांच्यासह प्रसिद्ध कवी गायक आनंद शिंदे प्रकाशनाथ पाटणकर, विष्णु शिंदे , दत्ता शिंदे तसेच शिंदे परीवार शाहीर डी.आर.इंगळे, राहुल अनविकर , नागसेन सावदेकर , प्रा.डॉ.किशोर वाघ, कुणाल वराळे , नानासाहेब इंदीसे , विजय मांडकेकर , राजाभाऊ शिरसाट, संतोष गायकवाड, धम्मानंद…
जळगाव ः प्रतिनिधी महानगरपालिकेच्या माध्यमातून स्त्री संसाधन केंद्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मनपा क्षेत्रात सात सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीच्या माध्यमातून योजनेसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार आहे. स्त्री संसाधन केंद्र योजनेच्या समिती अध्यक्षपदी मनपाचे अतिरीक्त आयुक्त श्याम गोसावी, सदस्यपदी नागरी समाज संघटनेचे प्रतिनिधी म्हणून निवेदिता सुनिल ताठे, मनिषा किशोर पाटील, मराठी प्रतिष्ठानचे ॲड. जमील देशपांडे, फिरोज रफिक शेख, आर्या फाउंडेशनच्या छाया रविंद्र पाटील, सदस्य सचिवपदी महिला व बालकल्याण विभागाच्या अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड आयुक्त विद्या गायकवाड यांनी केली आहे.