Author: Saimat

मायक्रोसॉफ्टचे इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर १५ जून २०२२ रोजी कायमचे बंद होणार. मायक्रोसॉफ्ट कंपनीने २०१६ पासूनच इंटरनेट एक्सप्लोरर अपडेट करणे थांबवले आहे. यानंतर १७ ऑगस्ट २०२१ रोजी ‘मायक्रोसॉफ्ट ३६५’ने (Microsoft 365) आणि ३० नोव्हेंबर २०२१ रोजी मायक्रोसॉफ्ट टीम्सने (Microsoft Teams) इंटरनेट एक्सप्लोररला तांत्रिक मदत देणे थांबवले. आता १५ जून २०२२ रोजी इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर औपचारिकरित्या कायमचे बंद होणार आहे. इंटरनेट एक्सप्लोरर बंद होत असल्यामुळे सोशल मीडियावर इंटरनेट एक्सप्लोरर संदर्भात आठवणी सांगणाऱ्या पोस्टचा पूर आला आहे. मायक्रोसॉफ्ट एग्ज (Microsoft Edge) या नव्या वेब ब्राउझरसाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी…

Read More

जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यात सर्वात मोठी सहकारी संस्था म्हणून ओळख असलेल्या कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक हा सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला प्रक्रियेला सुरू झाली दोन गटात काट्याची लढत असून महा विकास आघाडी प्रणित सहकार विकास पॅनल तर विरोधात भाजपाचे शेतकरी विकास पॅनल अशा दोन पॅनल मध्ये ही एक आस एक लढत असून तेरा जागेसाठी 26 उमेदवार रिंगणात आहे. आज सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली सकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण आठशे अकरा मतदार मतदारांपैकी 380 मतदान शांततेत पार पडले.

Read More

नाशिक  प्रतिनिधी मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 108 रुग्णवाहिका ( 108 Ambulance ) चालकाने एका मृतासह एका जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेत रुग्णालयात दाखल केले होते, सदर रुग्णाचे पडलेले दागिने रुग्णवाहिका चालकाने पंचवटी पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की (दि.२ ) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर हॉटेल सयाजी पॅलेस समोर स्विफ्टकार व ट्रक मध्ये जोराची धडक होऊन मोठा अपघात झाल्याने आडगाव नाका पंचवटी येथे 108 रुग्णवाहिकेवर कर्तव्यावर असलेले डॉ. दानिश शहा, व चालक नारायण जेजुरकर यांनी जखमी व्यक्तीला औषधोपचारासाठी आडगाव नाका येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते व मयताला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान (दि. 9) रुग्णवाहिका…

Read More

फैजपूर l प्रतिनिधी येथील रथगल्ली येथील रहिवासी सौ. मीनाक्षी किशोर सितापुरे(राणा) ( वय – ६३) यांचे दि. ११ जून २०२२ रोजी हृदय विकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. ते किशोर सितापुरे  यांच्या पत्नी व हितेश सितापुरे (राणा)यांचे आई होत.

Read More

चाळीसगांव प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सहज जलबोध अभियानाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून त्यात जळगांव जिल्हा समन्वयक म्हणून गेल्या चार वर्षांपासून चाळीसगांव परिसरात जलमित्र परिवाराच्या माध्यमातून पाणी, पर्यावरणासाठी तसेच सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती चळवळीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विषमुक्त अन्न मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेले शशांक अहिरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शशांक अहिरे हे सहज जलबोध अभियानात अगदी सुरुवातीपासूनच जलसाक्षरतेच्या प्रसारासाठी निसर्गरक्षक म्हणून सक्रियपणे सहभागी आहेत. या घोषणेतून पिंपरी चिंचवड येथील रहिवासी आणि केंद्रीय भूजल विभागात कार्यरत ज्येष्ठ भूजलवैज्ञानिक आणि सहज जलबोधकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रास सुपरिचित उपेंद्रदादा धोंडे यांच्या जलक्षेत्रातील तांत्रिकतेबाबत समाजात जनजागृतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनी पुढचा टप्पा गाठला आहे.…

Read More

फैजपूर ता यावल l प्रतिनिधी पंतप्रधान ना. नरेंद्र जी मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या केंद्र सरकारची यशस्वी आठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरसेवा, सुशासन, गरिबांचे कल्याण या पर्वाच्या माध्यमातून भारतीय  जनता पार्टी तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेता तथा माजी मुख्यंत्री देवेंद्रजी फडणवीस ,भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून माजी मंत्री आ गिरीशभाऊ महाजन,भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेषदादा पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्यासह सर्व जिल्हाभरातील पक्षाचे सर्व आमदार प्रदेश व जिल्हा पदाधिकारी यांच्या सूचनेनुसार करण्यात आले. जळगाव जिल्हा युवा मोर्चा च्या माध्यमातून…

Read More

फैजपूर l प्रतिनिधी येथील विद्यानगर मधील रहिवासी तथा म्युनिसिपल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक चंद्रकांत हिरामण भिरुड (वय -७२ ) यांचे दि. ११-६-२०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्यात पत्नी, दोन मुले, एक सून व   नातू असा परिवार आहे.

Read More

चाळीसगांव प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष,व जेष्ठ पत्रकार किसनरावजी जोर्वेकर यांना फोनवर आमदार मंगेश चव्हाण यांनी “आयुष्यातून उठवून टाकेल” अशी एकप्रकारे जीवे मारण्याची धमकी दि.८जून रोजी दिली, त्याबाबतची ऑनलाइन तक्रार जोर्वेकर यांनी पोलिस स्टेशन येथे दिली असून सोशल मिडियाद्वारे ती आम्हा सर्वांना ज्ञात झाली आहे, मागील काळात मुख्यमंत्री महोदयांना अपशब्द वापरनारे आमदार एका जेष्ठ पत्रकारांना आशा प्रकारची धमकी देत असतील तर,समाजात सदर घटनेचा मोठ्याप्रमाणावर निषेध व्यक्त होत आहे , या तक्रारीची दखल घेऊन तातडीने कायदेशीर कार्यवाही करावी.असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आले. यावेळी जि.प गटनेते शाशीभाऊ साळुंखे,अतुलदादा देशमुख, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील  तालुकाध्यक्ष दिनेश पाटील,शहर अध्यक्ष शाम…

Read More

नाशिक प्रतिनिधी  धावपळीची जीवनशैली, वाढत्या जबाबदाऱ्या आणि ताणतणावामुळे बहुतांश व्यक्ती स्वतःच्या आरोग्याकडे,व्यक्तिमत्त्वाकडे दुर्लक्ष करतात.स्वतःची अशी एक स्पेस असते हेदेखील विसरून जातात. जीवनाच्या एका टप्प्यावर याची जाणीव होते आणि आपण काही गोष्टी गमावल्याची भावना मनात तयार होते.विशेषकरून महिलांच्या बाबतीत ही गोष्ट अधिक प्रमाणात घडते. घरातल्या जबाबदाऱ्या,कुटुंबाची देखभाल,नोकरीतले ताणतणाव आदी गोष्टींमुळे महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात.परंतु,ही गोष्ट भविष्यात महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकते,असे प्रतिपादन फिटनेस तज्ञ सई संघई यांनी व्यक्त केले. स्वतःकडे दुर्लक्ष झाल्यानं भविष्यात होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी काही उपाय करता येणं शक्य आहे. महिलांनी स्वतःवर प्रेम करण्यासाठी नेमकं काय करावं,यासंदर्भातील घे भरारी आनंदी सखी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात…

Read More

ओझर प्रतिनिधी नुपुर शर्मा यांनी केलेल्या विधानावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ओझर मुस्लिम समाज कडून करण्यात आली आहे. त्यासाठी ओझर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांच्याकडे निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे दि.२८/५/२०२२ रोजी रिपब्लिक भारत न्युज चैनलवर डिबेट करतांना भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता नुपुर शर्मा हिने इस्लाम धर्माचे पैगंबर हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या बद्दल अपशब्द वापरून संपुर्ण मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुःखविल्या आहेत. या प्रकरणी संपुर्ण मुस्लिम समाज संत्पप्त झालेला आहे, तरी सदरहु भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता नुपुर शर्मा हिच्यावर आयपीसी धारा कलम २९५ए व १५३ए…

Read More