जळगाव प्रतिनिधी भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार राजु मामा यांचा वाढदिवस रोजी भाजपा जिल्हा महानगर तर्फे जनसेवेच्या माध्यमातुन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भाजपा जिल्हा महानगर तर्फे जन सेवा हिच राष्ट्र सेवा या भावनेने आ सुरेश भोळे यांचा वाढदिवस साजरा केला सकाळी १० वाजता पांझरा पोळ येथे जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्या हस्ते गोशाळेत गाईंना गो ग्रास (लापसी देऊन) कार्यक्रमाची सुरुवात केली, या नंतर ११वाजता भाजपा कार्यालयात कोरोना काळात मयत झालेल्या व्यक्तीच्या २५ मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. दुपारी १२ मातोश्री वृध्दाश्रम येथे आजी आजोबा यांना पुरण पोळी व आमरस जेवनाचा आस्वाद दिला, भाजपा महानगरातील…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी श्रीराम मंदिरातून 14 जून रोजी श्रीराम मंदिर संस्थान संचलित श्री संत मुक्ताबाई राम पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरला प्रस्थान करण्यात आले. त्याआधी सोमवारी जुन्या जळगावातील श्रीराम मंदिरात कुमारी मुलींच्या व मान्यवरांच्या हस्ते या पालखीचे पूजन करण्यात आले. प्रतिवर्षीप्रमाणे ग्रामदैवत श्रीराम मंदिरात पालखी भोईटेगढी, कोल्हेवाडा, तळेलेवाडामार्गे गोपाळपुरा येथे श्री सद््गुरू बाबाजी महाराज समाधी मंदिरात भजन होईल. त्यानंतर या पालखीने श्री सद््गुरू अप्पा महाराज समाधी मंदिरात मुक्काम केला व आज 14 जून रोजी सकाळी 8 वाजता श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया उपस्थित…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी भाजप खासदार खासदार रक्षा खडसे यांची शर्म-अल-शेख (इजिप्त) येथे होणाऱ्या दोनदिवसीय आठव्या आयसीयू जागतिक युवा पार्लमेंट संमेलनासाठी निवड करण्यात आली आहे. या संमेलनासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खडसे यांचे नाव तीन सदस्यीय भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी निश्चित केले आहे. शर्म-अल-शेख (इजिप्त) हे शिनाई द्वीपकल्पातील वाळवंट आणि तांबडा समुद्र यांच्यामधील किनारपट्टीवर वसले असून आंतरराष्ट्रीय परिषदा आणि राजनैतिक बैठकांसाठी या शहराला ओळखले जाते. या ठिकाणी होणाऱ्या संमेलनात जागतिक पर्यावरण हवामान बदलावर चर्चा होणार आहे. या चर्चासत्रात जगातील तरुण पिढी सहभाग नोंदविणार असून आपले विचार मांडतील. खासदार रक्षा खडसे आयपीयू इंटर-पार्लमेंटरियन फोरमच्या एशिया पॅसेफिक ग्रुपवर चार वर्षांपासून बोर्ड मेंबर…
केंद्र सरकारने आज अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही घोषणा जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गंत तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. तसंच, तरुणांना रोजगारही दिला जाणार आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलाचे प्रमुखांसह या योजनेचा आज घोषणा केली आहे. भारतीय सैन्याला जगातील सर्वश्रेष्ठ सेना बनवण्यासाठी सीसीएअंतर्गंत एक निर्णय घेतला आहे. आज अग्नपथाच्या माध्यमातून एक ऐतिहासिक योजनेची घोषणा आम्ही करत आहोत. अग्निपथ योजनेअंतर्गंत अग्निवीर सेनामध्ये सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ही योजना देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी व देशातील युवकांना सैन्यात भरती करण्यांच्या दृष्टीने सुरू करण्यात येत आहे, असं राजनाथ…
जळगाव प्रतिनिधी शाळा प्रारंभ दिनाचे औचित्य साधून, विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघ नगर ,येथे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रसंगी विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. गेटवर विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, रंगीत फुगे तसेच शालेय आवारात विद्यार्थ्यांना साठी सेल्फी पॉइंट तयार करून आकर्षक पद्धतीने सजावट केलेली होती. यावेळी मुख्याध्यापक हेमराज पाटील यांनी प्रत्येक वर्गाला एक झाड भेट देऊन त्याची लागवड आणि देखभाल, संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येक वर्गाला दिली. शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्याध्यापक हेमराज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक हेमराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयिका वैशाली…
मुक्ताईनगर प्रतिनिधी येथील जी.जी.खडसे महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने आज दिनांक ०६ जून रोजी शिवस्वराज्य दिन अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. या निमित्त भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव भीमराव पवार यांचे “छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन व कार्य” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी महाराजांनी केलेल्या स्वाऱ्या त्याच पद्धतीने महाराजांनी खऱ्या अर्थानं जनतेचे स्वराज्य निर्माण केले, त्यासंदर्भातील अनेक आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच.ए. महाजन होते. त्यांनीही महाराजांच्या एकंदरीतच कार्यकर्तृत्वांवर भाष्य केलं आणि महाराजांना यानिमित्ताने वंदन करून त्यांच्या स्मृती जागृत केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.…
सोयगांव प्रतिनिधी आठवडाभरापासून मृग नक्षत्र कोरडे जात असतांना रविवारी भूर- भूर झालेल्या पावसावर सोयगाव तालुक्यात मृग नक्षत्राचा पहिला दिवस उजाडला होता.जिल्ह्यात पावसाच्या सरींवर सरी कोसळत असतांना मात्र सोयगाव तालुका कोरडा ठाक झाला होता . रविवारी झालेल्या भूर – भूर पावसामुळे तहानलेल्या जमिनीचा घसा कोरडाच राहिला आहे . मात्र वातावरणाने दिलासा दिला असल्याचे वातावरण सोयगाव तालुक्यात निर्माण झाले आहे . मृग नक्षत्रात आठवडाभरापासून खंड दिल्याने खरिपाच्या पेरण्यांची तयारीही खोळंबली होती सोयगाव तालुक्यात आठवडाभराचा खंड यामुळे मशागत झालेल्या जमिनींवरील ताण वाढला होता तर दुसरीकडे बियाणे घरात आणून आठवडा झाला परंतु अद्यापही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत मशागतीच्या कामात व्यस्त झाले होते रविवारी भूर भूर…
कोरोना महामारीचा सर्वाधिक तडाखा ज्या क्षेत्रांना बसला त्यात ऑटोमोबाईल क्षेत्राचा समावेश आहे. मात्र आता अर्थव्यवस्था हळूहळू गती पकडत असताना आणि विविध आर्थिक घडामोडींनी गती आली असताना ऑटोमोबाईल क्षेत्रदेखील जोरदार वाटचाल करण्याच्या दिशेने कार्यरत झाले आहे. कोरोनानंतर भारतीय ऑटोमोबाईल उद्योग सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सध्या वाहनांची मागणी जोरात आहे. यावेळी भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे, त्यामुळे कंपन्यांना दीर्घ प्रतीक्षा कालावधीचा सामना करावा लागत आहे. कोरोना महामारीचा सर्वाधिक तडाखा ज्या क्षेत्रांना बसला त्यात ऑटोमोबाईल क्षेत्राचा समावेश आहे. मात्र आता अर्थव्यवस्था हळूहळू गती पकडत असताना आणि विविध आर्थिक घडामोडींनी गती आली असताना ऑटोमोबाईल क्षेत्रदेखील जोरदार वाटचाल करण्याच्या दिशेने कार्यरत झाले आहे. कोरोनानंतर…
जळगाव ः प्रतिनिधी सिव्हिलच्या आवारात सुमारे 90 हजार स्क्वेअर फूट जागेत तीन मजली 100 खाटांचे माता व बालसंगोपन केंद्र येत्या 18 महिन्यांत उभारण्यात येणार आहे. या केंद्रात 5 लेबर रूम, 4 ऑपरेशन थिएटर, 20 डिलिव्हरी टेबल, 3 महिला, 2 लहान मुलांचे वॉर्ड, 4 बेडचा अतिदक्षता कक्ष, सोनोग्राफी केंद्र आदींचा समावेश असेल.जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काल या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पंकज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाकडून माता-बालसंगोपन केंद्राला 2020-21 मध्ये मंजुरी मिळाली असून, 29 कोटी 95 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला…
जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तसेच युवासेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे 15 जून 2022 रोजी अयोध्या दौऱ्यावर असून अयोध्या येथे रामलल्ला, हनुमान गढी, इस्कॉन टेम्पल या ठिकाणी दर्शन घेणार आहेत व सायंकाळी शरयू नदीच्या घाटावर शिवसैनिक व युवासैनिकांच्या उपस्थितीत भव्य आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यासाठी जळगाव जिल्ह्यातील युवासैनिक, शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, युवासेना विभागीय सचिव अविष्कार भुसे, युवासेना सहसचिव विराज कावडीया, विस्तारक कुणाल दराडे, विस्तारक किशोर भोसले यांच्या नेतृत्वात रावेर लोकसभेतील युवासेना जिल्हा अधिकारी चंद्रकांत शर्मा, पवन सोनवणे, विष्णू इंगळे, प्रविण पंडीत, राकेश घोरपडे, ॲड.भरत पवार, मोहन जोशी यासह…