फैजपूर l प्रतिनिधी गजानना हॉस्पिटल फैजपूर मध्यरात्री १२ वाजता केले रक्तदान फैजपूर येथील गजानन प्रसुतीगृह हॉस्पिटलमध्ये मोठा वाघोदा येथील माहेर वाशीण महिलेस प्रसुतीसाठी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्रीची बारा वाजेची वेळ होती, आणि पेशंट अशक्त असल्यामुळे चार बॅग रक्त पाऊच ची आवश्यकता होती. ती डॉक्टरांनी उपलब्ध करण्यासाठी पेशंटच्या वडील नातेवाईक यांना सांगितले. मात्र मध्यरात्रीचे १२ वाजेची वेळ असल्याने काय करावं तेच उमजेना. अशी अवस्था समोर होती. त्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये उपस्थित मोठा वाघोदा येथील प्रगतिशील शेतकरी कुंदन काशिनाथ (गोटू सेंड) यांनी मोठा वाघोदा ग्रामपंचायत चे सरपंच मुबारक (राजू)अलिखा तडवी यांच्या भ्रमणध्वनीवरून कळवली सरपंच यांनी लगेच १२:०५ ला फैजपूर येथील…
Author: Saimat
नवी दिल्ली ः जेवणाखाण्याचे पदार्थ, फळे-भाज्या आणि क्रूड ऑइलच्या किमती वाढल्याने ठोक महागाई दर (डब्ल्यूपीआय) 15.88 टक्क्याच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. हा 30 वर्षांत याचा सर्वात उच्च स्तर आहे.याआधी ठोक महागाई ऑगस्ट 1991 मध्ये यापेक्षा(16.06 टक्के) होता. या वर्षी एप्रिलमध्ये दर 15.08 टक्के आणि गेल्या वर्षी मेमध्ये 13.11 टक्के होता. हा एप्रिल 2021 पासून सतत 14 व्या महिन्यात 10 टक्केवर आहे. सलग तिसऱ्या महिन्यात यात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक पतधोरण निश्चित करताना किरकोळ महागाई दराच्या आकड्याला प्राधान्य देते.सोमवारी आलेल्या किरकोळ महागाईच्या आकड्यांत मे दरम्यान ही मासिक आधारावर 7.79 टक्के वरून घटून 7.04 टक्के नोंदली आहे मात्र, ही सलग पाचव्या…
नवी दिल्ली ः देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या 24 तासात 8 हजार 826 नवीन रुग्ण आढळले आहेत. एकूण सक्रिय रुग्णांची संख्याही 52 हजारांच्या पुढे गेली आहे. इकडे, दिल्लीत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या 1000 च्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत येथे 1,118 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 500 रुग्ण बरे झाले तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, सक्रिय रुग्ण 3,177 आहेत. मध्यप्रदेशात 381 सक्रिय रुग्ण मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 43 नवीन रुग्ण आढळले आहेत.तेथे 1 रुग्णाचा मृत्यू झाला.यानंतर संक्रमितांची संख्या 10,43,221 वर पोहोचली आहे. -19 मुळे एकूण मृतांची संख्या 10,739 वर पोहोचली…
जांजगीर : वृत्तसंस्था छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या राहुलची 106 तासांच्या बचाव मोहिमेनंतर काल रात्री उशिरा सुटका करण्यात आली.बचावानंतर लगेचच त्याला बिलासपूरच्या अपोलो रुग्णालयात पाठवण्यात आले. गेल्या शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास राहुल 60 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. प्रशासन, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि लष्कराने हे ऑपरेशन अविरत आणि अथकपणे पार पाडले. यादरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. हे देशातील सर्वात मोठे बचाव कार्य असल्याचे बोलले जात आहे. खड्ड्यात सापही आला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते. ते राहुलच्या नातेवाइकांच्या संपर्कातही होते. काल रात्री त्यांनी सोशल मीडियावर बचाव कार्याच्या यशाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मोहिमेदरम्यान एक…
चंद्रपूर येथील इरई धरणावर ५८० कोटी रुपये खर्च करून १०५ मेगावॅटचा तरंगते सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. १५ महिन्यात हा प्रकल्प उभा राहणार असून यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी ५८० कोटींचा खर्च येणार असून याची क्षमता १०५ मेगावॅट असणार आहे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने चंद्रपूर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण बांधले. यातून चंद्रपूर शहरालाही पाणीपुरवठा केला जातो. या धरणावर सौर ऊर्जा पार्कची निर्मिती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार असून…
जळगाव ः प्रतिनिधी हरियाणा (पंचकुला) येथे 4 ते 6 जूनदरम्यान खेलो इंडिया स्पर्धा घेण्यात आली. यात जळगावच्या रुद्राक्षी भावे हिने योगासन आर्टिस्टिक गर्ल्स ग्रुप या गटात रौप्य पदक तर आर्टिस्टिक सोलो प्रकारांत कांस्य पदक पटकावले. रुद्राक्षी ही ध्रू ग्लोबल स्कूल संगमनेर येथे स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिक्षण व योगाचा अभ्यास करत आहे. तिला डॉ. संजय मालपाणी, मंगेश खोपकर, प्रवीण पाटील, स्वप्निल जाधव, किरण वाडेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. ती प्रज्ञा अशोक नाईक यांची सुकन्या आहे.
विशाखापट्टणम ःवृत्तसंस्था आयपीएलच्या पर्पल कॅप विजेत्या युजवेंद्र चहल (3/20) व युवा गोलंदाज हर्षल पटेलने (4/25) शानदार गोलंदाजीतून यजमान टीम इंडियावरील मालिका पराभवाचे सावट यशस्वीपणे दूर केले. भारताने मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात काल दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव केला. त्यातून भारताने सलग सात पराभवानंतर आफ्रिकेवर मात केली. यासह भारताने घरच्या मैदानावरील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजयाचे खाते उघडले. आता मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी राजकोटमध्ये होणार आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना पाच गड्यांच्या मोबदल्यात आफ्रिकेसमोर 180 धावांचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्युत्तरात आफ्रिका संंघाचा 19.1 षटकांत 131 धावांत धुव्वा उडाला. ऋतुराज-ईशानची विक्रमी भागीदारी पुण्याचा ऋतुराज गायकवाड (57) आणि ईशान किशनने (54) भारतीय संघाला…
जळगाव ः प्रतिनिधी शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील जिड लाख लोकांच्या आरोग्याशी संबंधित घनकचरा प्रकल्पाचे काम रखडले आहे. मक्तेदार काम करण्यास तयार नसेल तर मनपाने बीओटी तत्त्वावर प्रकल्प उभारावा, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी केली आहे. आव्हाणे शिवारात मनपाच्या जागेवर घनकचरा प्रकल्पाचे काम नियोजित आहे. सध्या या प्रकल्पाच्या जागेवर सात वर्षांपासून कचरा साठवला जात आहे. मनपा व सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळू नये.घनकचरा प्रकल्प बीओटी तत्त्वावर उभारावा. त्यामुळे मनपाच्या 48 कोटींच्या निधीची बचत होईल.तो निधी शहरातील विकास कामांसाठी खर्च करणे शक्य होईल,या मागणीचे निवेदन माजी उपमहापौर डॉ. सोनवणे यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना दिले.
जळगाव ः प्रतिनिधी जैन सोशल ग्रुप जळगावचा स्नेहमिलन सोहळा नंदग्राम (भुसावळ) येथे नुकताच झाला. त्यात 110 सदस्य परिवारासह सहभागी झाले होते. स्विमिंग, रेन डान्स, विविध खेळ खेळवण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्ष प्रियेश छाजेड, प्रोजेक्ट चेअरमन राहुल राका, रूपल राका, जितेंद्र बोरा, निर्मला बोरा, राजेश भंडारी, किशोर चोपडा व योगेश चोपडा, पंकज जैन, आनंद श्रीश्रीमाळ, अनिल पगारिया, विजय सांड, तेजस कावडिया, संदीप रेदासनी व जैन सोशल गृपच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
जळगाव ः प्रतिनिधी रेडक्रॉस रक्तकेंद्रात जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम झाला. यात 18 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यावेळी रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कार्यक्रमात एक लहान मुलाची आई असलेल्या दीपाली शांताराम बारी यांनीही पहिल्यांदा रक्तदान करून आनंद व्यक्त केला. तर रेडक्रॉसचे कर्मचारी मंगेश ओतारी यांनी 23 वे रक्तदान केले. त्यांचे रेडक्रॉस चेअरमन विनोद बियाणी यांनी कौतुक केले. रेडक्रॉसचे सह कोषाध्यक्ष सुभाष सांखला यांचा ए.बी. निगेटिव्ह जे स्वत: दुर्मीळ रक्तगट असून त्यांनी आजपर्यंत 66 वेळा रक्तदान केलेले आहे असे रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी सांगितले. एका व्यक्तीच्या रक्तदानाने तीन जणांचे प्राण वाचवण्यास मदत होते तसेच रक्तदानाने आत्मिक समाधान मिळते असे…