Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी महापालिकेत गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या शहर अभियंतापदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एम. जी. गिरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी ते पदभार स्वीकारणार आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे राज्यमंत्री असताना त्यांनी ओएसडी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. नवनियुक्त शहर अभियंता गिरगावकर हे मूळचे नांदेड येथील असले तरी गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबईत स्थायिक आहेत. वसई विरार महापालिकेत त्यांची एका वर्षासाठी शहर अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर त्यांना मजीप्रा येथील मूळ पदावर पदस्थापना मिळाली होती. दरम्यान, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी शासनाकडे पत्र पाठवून शहर अभियंतापदी शासकीय अधिकारी नियुक्तीची विनंती केली…

Read More

जळगाव ःप्रतिनिधी येथील आयएमए आणि रिजनल व स्टेट ऑर्गन ॲण्ड टिश्‍यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेन, केईएम हॉस्पिटल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अवयवदान’ जनजागृती या विषयावर डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव आयएमएच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेप्रसंगी अध्यक्ष डॉ. दीपक आठवले, सचिव डॉ.जितेंद्र कोल्हे, डॉ.अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत अवयवदान गरज व प्रक्रिया या विषयी डॉ.अमित भंगाळे यांनी तर ब्रेनडेड संकल्पना याबद्दल डॉ.तेजेंद्र चौधरी यांनी माहिती दिली. मानवी अवयवाचे प्रत्यारोपण, त्याविषयीचा कायदा 1994 व सुधारणा या विषयी डॉ.राहुल चिरमाडे यांनी तर डॉ.सचिन सरोदे अवयवदानाविषयीचे व्हिडिओ सादर केले. रोटो, सोटोच्या संचालक व केईएम हॉस्पिटलच्या विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुजाता पटवर्धन यांच्या मार्गदर्शनात…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये काल विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात व फुलांचा वर्षावाने स्वागत करण्यात आले. स्माईली पेन्सीलचे वाटप करण्यात आले. कोरोनानंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष शाळेत येता आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अनुभूती स्कूलमधील मुख्याधपकांसह सर्वच शिक्षिक शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत केले. शाळेत पहिल्या दिवसापासून हसत-खेळत शिकता यावे यासाठी अनुभूती स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या समाजकल्याणाच्या विचारधारेतून विविध शैक्षणिक उपक्रम शाळेतर्फे राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस कायम स्मरणात राहवा यासाठी भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यशस्वेीतेसाठी शिक्षक- शिक्षकेतर व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Read More

मेष राशी: मेष राशीच्या लोकांसाठी व्यवसायातील मागील कामे मार्गी लावण्यासाठी आजचा काळ उत्तम आहे. तुम्हाला काही नवीन लोक भेटतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. रिअल इस्टेट खरेदी करण्याची योजना बनवू शकता. सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणार्‍यांसाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आज कामाच्या ठिकाणी प्रभाव राहील. चांगला धनलाभ होईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांच्या काही सवयी सुधारल्यास तुमचा दिवस चांगला जाईल. जुन्या गुंतवणुकीतून मिळालेल्या पैशाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तारुण्याचा दिवस आनंदात जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव येथे रात्री उशीरा एकाने केलेल्या चाकू हल्ल्यामध्ये तीन तरूण जखमी झाल्याची घटना घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी की, १५ १५ जुनच्या रात्री साडेदहाच्या सुमारास किनगावातील शाह नामक तरूणाने तौसीफ समीर तडवी (वय१९ ), शरीफ लुकमान तडवी ( वय १९) व सद्दाम नवाज तडवी (वय २०) या तीन युवकांवर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. यात हे तिन्ही तरूण गंभीर जखमी झाले असून तिघांनाी यावलच्या ग्रामीण रुग्णातयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांवर वैद्यकीय अधिकारी डॉ अमीत तडवी व त्यांच्या आरोग्य कर्मचार्‍यांनी प्रथमोपचार करून यातील दोन जणांना पुढील उपचारासाठी जळगाव वैद्यकीय विद्यालयात पाठवणार…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  राज्यात मागील अडीच  वर्षात  १७५०.६३ चौ.कि.मीचे २३ नवीन संवर्धन राखीव,  ६४७.१२९४  चौ.कि.मी ची ५ नवीन अभयारण्ये आणि  ८५.८९ हेक्टरच्या ४ जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती ही हरित महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल दर्शवित असून या माध्यमातून राज्याच्या संरक्षित वनाचे क्षेत्र वाढतांना वन्यजीवांचा भ्रमणमार्ग ही सुरक्षित होतांना दिसत आहे.  शासनाने नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य दिले असून शाश्वत विकासाचा तो महत्वाचा आधार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या २३ संवर्धन राखीव क्षेत्रांपैकी ९ संवर्धन राखीव क्षेत्रं अधिसूचित झाले असून उर्वरित संवर्धन राखीव क्षेत्रांची अधिसुचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे. ही आहेत संवर्धन राखीव क्षेत्रं (कंसातील आकडे…

Read More

यावल ः प्रतिनिधी येथील तहसील कार्यालयात आज साडेबारा वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच स्वीकारतांना एका नायब तहसीलदारास रंगेहात पकडल्याचे वृत्त आहे.लाच स्वीकारताना पकडण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे.मुक्तार फकिरा तडवी असे या नायब तहसिलदाराचे नाव आहे. यावल तहसीलदार कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिले नसल्याने सर्रासपणे टेबलवर पैसे घेतले जात असल्याची सुद्धा जोरदार चर्चा तालुक्यात आहे नाशिक जवळील सप्तशृंगी देवीच्या परिसरात लाखो रुपये खर्चून एका महसूल अधिकाऱ्याकडून भव्य दिव्य बांधकाम सुरु असल्याचेसुद्धा जळगाव जिल्ह्यात महसूल कार्यक्षेत्रात व राजकारणात बोलले जात आहे.बदली करून आणणाऱ्या लोकप्रतिनिधीचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने मतदार संघात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावल तालुक्यात एक…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी राज्य शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समर्पित आयोगामार्फत होणारे चुकीचे कामकाज तत्काळ थांबविण्यात यावे, अन्यथा अ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्यातवतीने राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समता परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे देण्यात आला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना यासंदर्भात निवेदन देवून या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. निवेदन देतांना समता परिषदेचे कार्याध्यक्ष वसंत पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, हेमरत्न काळुंखे, नितीन महाजन, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, समर्पित आयोगाने सर्वांच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इंम्पेरिकल डाटा दारोदारी…

Read More

जामनेर प्रतिनिधी  येथील जामनेरपुरा परिसरातील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयात सर्व कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेतील विद्यार्थ्यांचे आज फुलपुष्प देऊन  स्वागत पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी.जी.अत्तरदे, यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रा.विजय पाटील, प्रा.सोनूसिंग पाटील, प्रा.रवींद्र शेले,प्रा.दिनेश   न्हावकर, प्रा.मनीषा घडेकर, प्रा.उज्ज्वला सावळे, प्रा.माधुरी तायडे, प्रा.कोमलसिंग परिहार,प्रा.समीर घोडेस्वार(क्रीडा शिक्षक) इ.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Read More

मुंबई : प्रतिनिधी  तुम्ही नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी १४५० रुपये मोजावे लागत होते. पण आता यासाठी तुम्हाला अधिक ७५० रुपये म्हणजेच २२०० रुपये द्यावे लागणार आहेत. कंपन्यांनी केलेला हा बदल १६ जूनपासून लागू होणार आहे. दोन सिलिंडरसाठी ४४०० रुपये सिक्युरिटी पेट्रोलियम कंपन्यांच्या वतीने १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या कनेक्शनमध्ये प्रति सिलिंडर ७५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जर तुम्ही दोन सिलिंडर कनेक्शन घेतले तर तुम्हाला १५०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. म्हणजेच, यासाठी तुम्हाला ४४०० रुपये सिक्युरिटी म्हणून…

Read More