रावेर ः प्रतिनिधी राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष स्व.लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पाल येथील सातपुडा विकास मंडळ संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. पाल येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.हितेश फिरके होते. फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयाचे प्रा.डॉ. शरद बिऱ्हाडे व भालोदच्या कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.डॉ. मुकेश पवार यांनी, बाळासाहेब चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा.डॉ. बिऱ्हाडे यांनी स्व.चौधरी यांच्या शैक्षणिक, सामाजिक योगदानाबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य फिरके यांनी स्व. बाळासाहेब चौधरी यांच्या दलित, शोषित, पीडितांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. प्रास्ताविक प्रा.चारुलता चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रदीप खैरे यांनी केले…
Author: Saimat
भुसावळ ः प्रतिनिधी कायद्याचा वापर करून शहरातील वाढती गुन्हेगारी थोपवावी, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले. शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पोलिस वसाहतीमध्ये असलेल्या जुन्या डीवायएसपी कार्यालयाच्या इमारतीमध्ये शहर वाहतूक शाखेचे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले आहे.त्याचे उद्घाटन पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांच्याहस्ते झाले. पुढे बोलताना डॉ.मुंढे म्हणाले की, वाहतूक शाखेला कार्यालय उपलब्ध करून दिलेले आहे.त्यामुळे शाखेने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करून जास्तीत जास्त चांगली सेवा द्यावी. शहर वाहतूक शाखेला स्वतंत्र कार्यालय नसल्याने हे कार्यालय देण्यात आले आहे. या इमारतीची दुरुस्ती करून शहर वाहतूक शाखेचे कार्यालय तयार करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. कार्यालयाची…
जळगाव ः प्रतिनिधी दहावीनंतर आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या कोणत्याही शाखेत थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आयटीआयच्या सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. याद्वारे पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील जागाही भरण्यास मदत होऊ शकेल. दरम्यान, यंदा खान्देशात पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षासाठी 29 महाविद्यालयात 7 हजार 482 जागा उपलब्ध आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया (ऑनलाइन पोर्टल) सुरू झाली असून दहावीच्या निकालापूर्वी या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहिती भरून प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 2 जूनपासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत नोंदणी…
जळगाव ः प्रतिनिधी शाळेची घंटा वाजली असून मुले दफ्तर घेऊन वर्गातही पोहचली आहेत मात्र पहिली ते आठवीच्या विद्यार्थांच्या हातात अद्याप बालभारतीची पुस्तके पडलेली नसल्याने त्यांची चिंता वाढली. राज्य बालभारती विभागाकडून यंदा कमी प्रणात झालेल्या छपाईमुळे पुस्तके आली नसल्याने विक्रेत्यांकडून ती पुढील दहा दिवसात मिळतील, असे सांगितले जाते आहे. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) बाजारपेठेत विक्री करण्यासाठी आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत वितरणासाठी पुस्तकांची छपाई केली जाते. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या 3000 शाळांतील पहिली ते आठवीचे सुमारे 4 लाख विद्यार्थी या पुस्तकांच्या प्रतिक्षेत आहेत. पाठपुरावा सुरु बालभारतीच्या पुस्तकांसाठी पाठपुरावा बालभारतीच्या इतिहास, हिंदीसह अन्य काही विषयांची पुस्तके मिळत नाहीत.…
जळगाव ः प्रतिनिधी दुय्यम निबंधक कार्यालयात मालमत्तेसंदर्भात खरेदी विक्री झाल्यानंतर तेथून ऑनलाइन प्रक्रियेद्वारे थेट मंडळ अधिकारी व तलाठ्यांकडे जाते. त्या व्यवहाराची 30 दिवसात नोंद घेणे बंधनकारक आहे; मात्र जिल्ह्यातील मंडळ अधिकारी व तलाठीस्तरावर तब्बल 1024 फेरफार नोंदी प्रलंबित आहेत. तर जळगाव तालुक्यात अशा 104 नोंदी प्रलंबित आहेत. तलाठ्यांनी संबंधितांना नोटीस न दिल्याने जिल्ह्यात 288 फेरफार नोंदी प्रलंबित आहेत. राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ऑनलाइन फेरफार प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत दुय्यम निबंधक कार्यालयात मिळकतीच्या नोंदणीसह फेरफार प्रक्रिया एकाचवेळस करण्यात येत आहे. त्यामुळे मिळकतीवर फेरफार लावण्यासाठी नागरिकांना तलाठ्यांकडे जावे लागत नाही. दुय्यम निबंधक कार्यालये महसूल कार्यालयांशी जोडण्यात आलेले…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आलेल्या जनरल तिकिटाची सुविधा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून जाणाऱ्या 167 गाड्यांसाठी 29 जूनच्या मध्यरात्रीपासून जनरल तिकीट सुरू करण्यात येणार आहे. कोरोनापूर्वी जेवढ्या एक्स्प्रेस गाड्यांमधून जनरल तिकिटाची सुविधा होती तेवढ्या सर्वच गाड्यांमधून प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या 167 गाड्यांमधून जनरल तिकिटाची सुविधा मिळणार आहे. या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांना सामान्य तिकीट खिडकीतून तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. तसेच मासिक पासधारकांनाही सुविधा देण्यात आली आहे. 29 जूनच्या रात्री पासून सुविधा 29 जूनच्या मध्य रात्रीपासून जनरल तिकिटाची सुविधा सुरू होत आहे. रेल्वे…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथून जवळ असलेल्या पुरनाड फाट्याजवळ रात्रीच्या सुमारास एका ट्रकमधून निर्दयीपणे कत्तलीसाठी गायी घेऊन जाणार्या ट्रक व चौघांना ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातून अनेकदा परराज्यातून गुरांची वाहतूक करणारी वाहने जात असतात. पोलीस अनेकदा या प्रकारच्या धडक कारवाया करत असतात. अशीच एक कारवाई काल रात्री पाऊण वाजेच्या सुमारास तालुक्यातील पुरनाड फाटा येथे झाली आहे. पुरनाड फाट्याजवळून एचआर ५५ डब्ल्यू-८५६१ या क्रमांकाच्या ट्रकमधून गायींची अतिशय निर्दयीपणे वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी नेले जात असतांनाची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पुरनाड फाट्याजवळ पोलिसांनी या ट्रकला अडविले असता याच्या चालकासह चौघे जण ट्रक टाकून पळण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांना पोलिसांनी…
मेष राशी : आज मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. एवढेच नाही तर आज तुमची विचारसरणी सकारात्मक असेल. जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालवत असाल, तर विस्तार योजना अंमलात आणण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुमच्या व्यवसायातील काम खूप दिवसांपासून रखडले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतात. निरोगी पर्याय निवडल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वृषभ राशी: आज वृषभ राशीचे लोकं परीक्षा किंवा स्पर्धेच्या माध्यमातून नोकरी शोधत असतील किंवा ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी सतत प्रयत्न करावेत. कार्यक्षेत्रात सहकार्यांसोबत काम करा. विशेष काळजी घ्या. सामाजिक सौहार्द आणि प्रतिष्ठा चांगली राहील.…
ठाणे: प्रतिनिधी वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. तिला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने अखेर तिला जामीन मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात २०२० साली अॅट्रोसेटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवी मुंबई पोलिसांनी केतकी चितळेला अटक केल्यानंतर तिला ठाणे न्यायालयाने न्यालयीन कोठडी सुनावली होती. ठाणे न्यायालयात याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. यावेळी युक्तिवाद होऊन तिला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तर कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयात…
मुबई : प्रतिनिधी सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी दिग्दर्शित केलेला ‘दे धक्का’ सुमारे 14 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद चित्रपटाला मिळाला होता. ‘दे धक्का’ चित्रपटाने रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये विशेष स्थान मिळवले होते आणि आता या चित्रपटाचा सिक्वेल महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. येत्या 5 ऑगस्ट 2022 रोजी ‘दे धक्का 2’ रिलीज होणार आहे. नुकताच चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित करुन चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. https://www.instagram.com/tv/Ce0OCZmlTMO/?utm_source=ig_web_copy_link ‘थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय…’, म्हणत हा धमाल टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या टीझरमध्ये पुन्हा एकदा…