Author: Saimat

सांगलीमधील मिरज येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मिरजेमधील म्हैसाळ येथे रविवारी रात्री एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष पिऊन जीवन संपवलं. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे या दोन भावांनी आपल्या कुटुंबासहित आत्महत्या केली. मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. सोमवारी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे दोघे वेगवेगळ्या घऱात राहत होते.…

Read More

चोपडा – प्रतिनिधी  जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. जळगाव म्हणजेच ग.स. च्या चोपडा शाखेच्या शाखाधिकारी पदावर जगन्नाथ तुळशीराम बाविस्कर (गोरगावले बु.) यांची नियुक्ती करण्यात आली. सहकार नेते व संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.बी.बी.पाटील यांनी सन १९८९ मध्ये बाविस्कर यांची भडगाव शाखेवर लिपीक म्हणुन नियुक्ती केलेली होती. त्यानंतर त्यांनी अमळनेर, यावल व एरंडोल येथेही चांगल्या प्रकारे सेवा बजाविली. सध्या ते शाखा चोपडा नं.५ येथे उपशाखाधिकारी पदावर कार्यरत होते. मुख्य कार्यालयाचे आदेशान्वये सेवा जेष्ठता व शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना शाखा चोपडा नं.५ येथेच शाखाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदय पाटील, समस्त संचालक मंडळ, व्यवस्थापक वाल्मिकराव पाटील,…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  स्वप्न  ही प्रत्येकालाच पडतात. त्या स्वप्नांचे अर्थ लावण्याचे प्रकार आपण सारे जण करतो. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा प्रत्यक्ष आयुष्याशी संबंध जोडणारे अनेक सिनेमे, गोष्टी आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात स्वप्नातील गोष्टी खऱ्या होण्याचे प्रकार कमीच घडतात. मुंबईतील लालबागच्या व्यापाऱ्याचं स्वप्न मात्र खरं ठरलं आहे. या व्यापाऱ्याच्या स्वप्नात त्याचे दिवंगत वडील आले होते. त्यांनी त्याला कोट्यवधींच्या खजिन्याची माहिती दिली. वडिलांनी स्वप्नात दिलेल्या माहितीनुसार त्या मुलाने खजिन्याचा शोध घेतला आणि तब्बल 4 कोटींच्या चोरीचा उलगडा झाला आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार लालबागाचे व्यापारी दीपक जैन यांच्या कुटुंबीयांनी गिरगावच्या विठ्ठलवाडी परिसरात एक रूम भाड्यानं घेतली होती. जैन यांच्या वडिलांच्या निधनानंतर ही रूम बंद…

Read More

जामनेर : इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालय तर्फे इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, प्रमुख मार्गदर्शक सिद्धार्थ पाटील यांनी विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा बद्दल माहिती दिली तसेच आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अभ्यास , चिकाटी ध्येय हे महत्त्वाचे असून केवळ दहावी परीक्षा उत्तीर्ण किती मार्कस्‌ मिळवले हे महत्त्वाचे नसून ती गुणवत्ता सिद्ध करणे हेच महत्त्वाचे आहे असे उदगार या प्रसंगी केले. कार्यक्रम प्रसंगी इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुल संस्थेचे सचिव किशोर महाजन यांनी- महाविद्यालयीन शिक्षण कुठून व कसे घ्यावे व ते किती महत्त्वाचे या बद्दल माहिती व पालकांचे शंकेचे निरसन केले. संचालक फकिरा धनगर, संचालक तथा माजी मुख्याध्यापक के.व्ही.महाजन, मुख्याध्यापक…

Read More

चाळीसगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील कळमडु येथे सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प अंतर्गत भूजल अभियानात तलावाच्या कामाला शेतकऱ्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. गावकरी, भजनी मंडळ व पारंपरिक पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. या तलावामुळे 100 ते 150 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. या तलावाच्या नावाबद्दल जुने जाणते लोक सांगतात की, कळमडूचे राजधर बुवा तलाव हे नाव कशावरून पडले. फार जुन्याकाळी कळमडूचे वाणी समाजाचे बाबा गावातून पायी चालत आले होते. आधी हा जंगल फार घनदाट होता म्हणजे एवढं दाट होता की, जवळचा माणूस दिसायचे नाही त्यावेळी राजधर बुवा या जंगलात आले आणि मरेपर्यंत इथंच राहिले तर त्या ठिकाणी त्यांचा आज पण छोटासा ओटा बांधलेला…

Read More

सावदा : प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खडसे या निवडणुकीत नक्कीच बाजी मारतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही खडसे विधान परिषदेत निवडून येतील असे वाटते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडसे यांचे अनेक समर्थक गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत, असे राजेश वानखेडे यांनी सांगितले. राष्ट्रवादीने खडसे यांना उमेदवारी दिल्याने खानदेशात आणि विशेषत: तापी खोऱ्यात त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खडसे यांचा संभाव्य विजय साजरा करण्यासाठी मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, रावेर, सावदा या तापी परिसरातून त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांचे बुकींग देखील केले. आहे.…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  आज सकाळी ९ वाजल्यापासून विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. एक एक करून आमदार मतदान करत आहे. आतापर्यंत जवळपास भाजपच्या (BJP) सर्व आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आत केवळ लक्ष्मण जगताप  आणि सुधीर मुनगंटीवार  यांचे मतदान बाकी आहे. ते दुपारी मतदान करणार आहे. विधान परिषदेच्या एकूण १० जागांसाठी मतदान सुरू आहे. आतापर्यंत भाजपच्या १०४ आमदारांनी मतदान केले आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी सकाळच्या सत्रातच भाजपच्या आमदारांना मतदान करण्याची सूचना केली होती. त्यानंतर भाजप आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आत सुधीर मुंनगंटीवार आणि लक्ष्मण जगताप देखील मतदानासाठी निघाले आहेत ते दुपारच्या सत्रात मतदान करणार आहे.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी वेस्टर्न आशियाई यूथ रॅपिड (जलद) बुद्धिबळ स्पर्धेत भाग्यश्री पाटील प्रथम आली. मालदीव फिडे अंतर्गत 18 वयोगटातील मुलींच्या वेस्टर्न आशियाई यूथ रॅपिड (जलद) बुद्धिबळ स्पर्धेत पाचोऱ्याची एम. एम. कॉलेजची विद्यार्थिनी भाग्यश्री हिने 7 पैकी 6 गुण घेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या खेळात कजकस्थान व उझबेकिस्तानची अव्वल खेळाडू असतानादेखील भाग्यश्रीने 1 गुण जास्त मिळवून विजेती ठरली. भाग्यश्रीचा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अतुल जैन, एम. एम. कॉलेजचे चेअरमन संजय वाघ, प्रा. स्वप्निल पाटील यांनी गौरव केला.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या तरसोद येथील मराठी शाळेत निवृत्त शिक्षक विजय लुल्हे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. वडील स्वर्गीय मुख्याध्यापक सुपडू सुतार यांच्या स्मरणार्थ त्यांनी हा उपक्रम राबवला. शशिकांत हिंगोणेकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे निरीक्षक तथा विस्तार अधिकारी सुनिल जोशी (सांख्यकीय विभाग ) व अभियंता योगेश पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधाकर सोनवणे, आदर्श केंद्रप्रमुख भगवान देवरे, भास्कर पाटील, तुकाराम पाटील, प्रभारी मुख्याध्यापिका सुषमा पाटील, आत्माराम सावकारे उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय लुल्हे व मनोहर बाविस्कर यांनी केले. कार्यक्रमाची प्रेरणा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील आदींकडून मिळाली होती.

Read More