विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले असून, ते काल संध्याकाळापासून नॉट रिचेबल आहेत. निवडणुकीत शिवसेना आमदारांच्या फुटीमुळे शिंदे हे नाराज असल्याचे कळते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये असल्याची माहिती आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची मुंबईत वर्षांवर बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीला शिंदे हजर राहणार का? हे पाहावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनूसार, एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना देखील उधाण आले आहे. सोमवारी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे काही आमदार फुटले असून, भाजपचे सर्व पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर शिवसेनेकडून नाराजी नाट्य सुरू झाले आहे.…
Author: Saimat
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील वाघरे येथे शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली असून यात १२ जण जखमी झाले आहेत. याबाबत ८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वाघरे येथे दोन गटांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. यात दिनांक १९ रोजी रात्री आठच्या सुमारास तुफान हाणामारी झाली. तर यात जखमी झालेल्यांवर दुसर्या दिवशी म्हणजे दिनांक २० जून रोजी हल्ला करण्यात आला. यात मल्हारी विक्रम पाटील, सुदाम रमेश पाटील, रोशन पुंडलिक पाटील, सुनील रमेश पाटील, नाना भिकारी पाटील, भाऊसाहेब भिकारी पाटील, रमेश विक्रम पाटील, अनिल मल्हारी पाटील, पुंडलिक विक्रम पाटील, महादेव नानू पाटील, योगेश कृष्णा पाटील, दीपक महादू पाटील, आधार भिकारी पाटील, महादू पाटील,…
भडगांव प्रतिनिधी कजगाव ता.भडगाव कजगाव भडगाव मार्गावरील पासर्डी गावाजवळील वळणावर थांबलेल्या कामा जवळील नाल्यात मोटारसायकल सह चालक नाल्यात पडल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला सदर वळणावर आता पर्यंत दहा ते पंधरा अपघात झाले असुन अनेकजण जखमी, गंभीर जखमी झाले आहेत तर आज या वळणावरील थांबलेल्या कामाने एक बळी घेतल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे थांबलेले काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कजगाव भडगाव मार्गावरील कजगाव पासुन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पासर्डी गावाजवळ वळणावरील थांबलेल्या कामा जवळ मोठे पुल आहे नेमके पुला जवळच वळण रस्ता काढण्यात आला आहे भडगाव कडुन येणारा वाहनधारक सिमेंट च्या बनलेल्या रस्त्याने…
जळगांव प्रतिनिधी :- विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालविलेल्या प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल व प्रगती माध्यमिक शाळेचा निकाल 100% लागला असून संस्थेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक माननीय श्री प्रेमचंदजी ओसवाल, संस्था अध्यक्षा श्रीमती मंगलाताई दुनाखे,संस्था सचिव श्री सचिन दुनाखे सर यांनी विद्यार्थी व पालकांचा पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून सत्कार केला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा पाटील व श्रद्धा दुनाखे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ वैद्य मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व…
नवी दिल्ली : रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्यावतीने चालवण्यात आलेल्या समर्पण अभियानात आतापर्यंत सुमारे 5457.94 कोटींचा निधी जमवला आहे. मात्र, दान म्हणून आलेल्या रक्कमेतील जवळपास 22 कोटींच्या रक्कमेचे चेक बाउन्स झाले आहेत. त्याबाबतचा एक वेगळा अहवाल तयार केला जात आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे जमा झालेला निधी अद्यापही पूर्णपणे मोजली नाही. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्यावतीने चालवण्यात आलेल्या समर्पण अभियानात आतापर्यंत सुमारे 5457.94 कोटींचा निधी जमवला आहे. मात्र, दान म्हणून आलेल्या रक्कमेतील जवळपास 22 कोटींच्या रक्कमेचे चेक बाउन्स झाले आहेत. त्याबाबतचा एक वेगळा अहवाल तयार केला जात आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे जमा झालेला निधी अद्यापही पूर्णपणे मोजली नाही. काही जिल्ह्यानिहाय ऑडिटींगचे काम…
मुंबई प्रतिनिधी राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या आज, सोमवारी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे. महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली आहे. या निवडणुकीत ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे. सकाळी नऊ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील एक जागा रिक्त आहे तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता मावळली आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २५ ते २६ मतांची आवश्यकता असेल. गुप्त पद्धतीने…
पंढरीची वारी वारकऱ्यांसाठी भक्तीचा, श्रद्धेचा आणि चैतन्याचा सोहळा असतो. पंढरीची वारी पायीच करण्याचा प्रघात एके काळी होता व आजही अनेक वारकरी तो पाळतात. वाहनांची सोय झाल्यामुळे बरेचसे लोक वाहनानेही जातात. एरव्ही ठिकठिकाणी विखुरलेले वारकरी पंढरीच्या वाटेवर एकमेकांना भेटू शकतात. जे जाऊ शकत नाही त्याची भावना संत नामदेवांनी ‘पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ॥1्॥’ अशा शब्दात वर्णिली आहे. असा हा वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी राज्यातून आणि राज्याबाहेरून भाविक येतात. विठूनामाचा गजर करीत एकरूप होतात. तहान-भूक विसरून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. त्यांना वारीचा आनंद लुटता यावा आणि उत्साहाने पंढरीच्या दर्शनासाठी ते मार्गस्थ व्हावे यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. पुणे जिल्ह्यात…
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र.6 जवळ भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना 3 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर खोटेनगरच्या पुढे असलेले हॉटेल मराठा मटन जवळ भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार MH.19.DQ.8749 जागीच ठार झाल्याची घटना दि.20 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी तालुका पोलिस स्थानकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेत अपघातग्रस्तांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केल्याची प्राथमिक माहिती आहे.
सामाजिक विशेष अर्थ सहाय योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय योजना राबविल्या जातात. दिव्यांग, वयोवृद्ध, अनाथबालके, दुर्धर आजारी व्यक्ती, एकल महिला इत्यादी हे या योजनांचे लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात दरमहा ठराविक अर्थसहाय वितरीत करण्यात येते. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय एकरकमी अर्थसहाय या योजनेच्या लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते. दिव्यांग, वयोवृद्ध, दुर्धर, आजारी व्यक्ती व इतर लाभार्थ्यांना बँकेत जावून त्यांचे अर्थसहाय आवश्यकतेनुसार काढावे लागते. दरवेळी या लाभार्थ्यांना बँकेत जाणे शक्य होईलच असे नाही.…
आषाढी एकादशीच्या वारीत संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) पालखी सोहळ्यातील मानाचे स्थान असलेल्या छत्रपती घराण्याकडून जरी पताका देण्याची परंपरा अखंडित ठेवण्याचा निर्णय कोल्हापूरचे छत्रपती घराणे आणि देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान यांनी घेतला. रविवारी या मानाच्या जरी पताका पूजन करून मानकरी प्रा. महादेव तळेकर (पंढरपूर) यांच्या सुपूर्द करण्यात आल्यात. स्वराज्यावर आलेले औरंगजेबरूपी महाभयंकर संकट सलग २६ वर्षे महाराष्ट्राच्या भूमीवर होते. त्याच्यासह निजामशाह, आदिलशाह, इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्धी व अंतर्गत कलह, आदी संकटांचा सामना देत असतानासुद्धा छत्रपतींनी वारकरी संप्रदायाची परंपरा अखंडित व निर्भयपणे सुरू ठेवली. पंढरीच्या वारीमध्ये कधीच खंड पडू दिला नाही. त्याचे प्रतीक म्हणजे या जरी पताका होय.…