Author: Saimat

सोयगाव तालुका प्रतिनिधी तालुका कृषी विभागाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून आत्महत्या ग्रस्त आणि कोरोनामुळे विधवा झालेल्या महिला शेतकऱ्यांना तूर कीटचे मोफत वितरण करण्यात आले आहे.त्यामुळे खरिपाच्या हंगामात या महिला शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोयगाव तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे वारस आणि कोरोनामुळे निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना खरिपाच्या हंगामासाठी मदत म्हणून तूर कीटचे मोफत वितरण करण्यात आले यामध्ये तब्बल १२५ शेतकऱ्यांपर्यंत हि मदत पोहचली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संगीता पवार यांनी दिली असून उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.तालुका कृषी विभागाकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यात प्राप्त लक्षांकानुसार मदतीचे वाटप पूर्ण झाले असून दुसया टप्प्यातही पुन्हा या…

Read More

यावल प्रतिनिधी  यावल तालुक्यात ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक स्वच्छता अभियाना अंतर्गत शौचालयाची व दलित वस्तीत झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी निळे निशान सामाजिक संघटना जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी केली आहे. जिल्हा परिषद जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दि 16 जून 2022 रोजी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की,शासनातर्फे स्वच्छता अभियान यशस्वी होण्याकरिता लाखो रुपयांचा खर्च केला जातो परंतु ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ग्रामविस्तार अधिकारी ठेकेदार संबंधितानी सार्वजनिक शौचालयाचे निकृष्ट प्रतीचे आणि थातूरमातुर अपूर्ण कामे केले जातात ती अपूर्ण कामे पूर्ण दाखवून बिले काढण्यात आली आहेत काही कामे वर्क ऑडर येण्या अगोदर आपल्या मार्जितील कामे दाखवून कामे सुरु करण्यात आली आहे.या…

Read More

यावल  प्रतिनिधी  यावल तालुक्यात नावारूपाला आलेली अठरा वर्षा पासूनची विश्वसनीय शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल.या शाळेतील सन 2021-22 या वर्षाची पहिली दहावीच्या वर्गाची बॅचने घवघवीत यश संपादन केले. यात यावर्षी दहावीचे दहा विद्यार्थी होते या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य संपादन करून शाळेचे नाव लौकिक केले नर्सरी पासून ते दहावीपर्यंतचे आपल्या शाळेत असलेले हे विद्यार्थी 100% निकालाने पास झाले. त्यातील 90% मुले हे डिस्टिंक्शन मध्ये आले आहेत.पृथ्वी रमेश तायडे 86% मिळवत शाळेत सर्व प्रथम आली. तमन्ना फिरोज तडवी ही 83.80 % मिळून द्वितीय आली.ओम चौधरी 83.40% तर हिमांशू तडवी 82.40%, युगल नाफडे 80.20%,शेख बाशीद याला 77%,अबरार खान76%, जुनेद…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. नाशिकमध्ये देखील कोरोना रुग्ण वाढत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात 75 नवे कोरणा बाधित आढळले आहेत. एका दिवसात 36 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे कुरणा बधितांचा आकडा 158 वर गेला आहे नाशिक शहरात यातील सर्वाधिक 103 बाधित आहेत. आतापर्यबत केवळ शहरात 4105 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाची संख्या नाशिक शहरासाठी पुन्हा ही धोक्याची घंटा आहे. हळूहळू घट्ट होणारा विळखा टाळण्यासाठी आरोग्य प्रशासनानं आतापासून कठोर भूमिका घेण्याची गरज आहे राज्यात आज 4 हजार 4 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात…

Read More

एरंडोल ; प्रतिनिधी तालुक्यातील नांदखुर्द येथील माहेर असलेल्या विवाहितेला नोकरीसाठी माहेरहून साडे तीन लाख रूपये आणावे यासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील नांदखुर्द येथील माहेर असलेल्या दिपीका तुषार पाटील याचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील तुषार बाजीराव पाटील यांच्याशी रितीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती तुषार पाटील याने नोकरीसाठी माहेरहून साडे तीन लाख रूपये आणावे अशी मागणी केली. पैशांची पुर्तता न केल्याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या छळाला कंटाळून विवाहिता माहेर निघून आल्या. शनिवारी १८…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जळगाव – पाचारो रोडवर असलेल्या जैन व्हॅली कंपनीजवळ असलेल्या राजपाल नगर येथे महिलेचा आज सकाळी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. तर मयत महिलेचा मृतदेह शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छदेनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर आलेल्या रिपोर्टमध्ये समजल्यावरच या महिलेचा मारहाणीत खून की पाय घसरून पडल्याचे स्पष्ट होणार आहे. मिळालेली माहिती अशी की, जळगाव – पाचोरा रस्त्यालगत असलेल्या जैन व्हॅली जवळ असलेल्या राजपाल नगरातील रहिवासी भाऊलाल भिल हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. ते त्यांच्या पत्नी या दोघंही जैन व्हॅली येथे मजूरी करून आपल्या कुटूंबातील सहा मुली व एक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भडगाव तालुकयात दोन वर्षाच्या मुलीला विहिरीत फेकून खून करणाऱ्या फरार असलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काकनबर्डी येथून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जितेंद्र उर्फ नाना जंगलू ठाकरे रा. कराब ता. भडगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की, जितेंद्र ठाकरे याचे पत्नीसोबत वाद झाला होता. या वादातून त्याने त्याची दोन वर्षाची मुलगीला घेवून जावून विहिरीत फेकून दिले. तिला फेकत असतांना परिसरातील नागरीकांनी पाहिले असता जितेंद्र ठाकरेने विहिरीत उडी घेतली. दरम्यान, नागरीकांनी त्याला विहीरीतून बाहेर काढून भडगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान संशयित जितेंद्र ठाकरे हा…

Read More

मेष राशी: मेष राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. उत्पन्नात वाढ शक्य आहे. तुमच्याकडे नवीन गोष्टी असतील ज्यामुळे तुमची सामाजिक स्थिती सुधारेल आणि तुमचे समाधान होईल. आज महिला घरातील कामात जास्त व्यस्त राहतील. कुटुंबियांकडून शुभवार्ता मिळतील. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील. आज ८५% नशिबाची साथ आहे. हनुमानाची पूजा करावी. वृषभ राशी: वृषभ राशीचे लोक कामाच्या ठिकाणी नवीन समीकरणांमुळे संपूर्ण वेळ व्यस्त राहतील. काही रखडलेले प्रकल्प आता मार्गी लागतील. पगारदार लोकांना प्रमोशन मिळू शकते आणि इच्छित ठिकाणी बदली देखील शक्य आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांसोबत काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला…

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी तालुक्यातील शिरसाड येथील जिल्हा परिषद शाळेस भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार काल रोजी नियोजन भवनात झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार शिरीषदादा चौधरी,आमदार संजयभाऊ सावकारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया,आदिवासी प्रकल्प अधिकारी सौ.सोनवणे मॅडम,प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील,माध्यमिक शिक्षणाधिकारी बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील व केंद्रप्रमुख किशोर चौधरी सर यांनी हा पुरस्कार स्विकारला.हा पुरस्कार मिळाल्याने तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातून शाळेचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे. यासाठी जिल्ह्यातील अनेक शाळांनी सर्वेक्षण द्वारा स्वयंमूल्यमापन पूर्ण करून या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता.त्यानंतर पर्यवेक्षीय यंत्रणेद्वारे बाह्य मूल्यमापन…

Read More