चाळीसगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील कळमडु येथे सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प अंतर्गत भूजल अभियानात तलावाच्या कामाला शेतकऱ्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. गावकरी, भजनी मंडळ व पारंपरिक पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. या तलावामुळे 100 ते 150 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. या तलावाच्या नावाबद्दल जुने जाणते लोक सांगतात की, कळमडूचे राजधर बुवा तलाव हे नाव कशावरून पडले. फार जुन्याकाळी कळमडूचे वाणी समाजाचे बाबा गावातून पायी चालत आले होते. आधी हा जंगल फार घनदाट होता म्हणजे एवढं दाट होता की, जवळचा माणूस दिसायचे नाही त्यावेळी राजधर बुवा या जंगलात आले आणि मरेपर्यंत इथंच राहिले तर त्या ठिकाणी त्यांचा आज पण छोटासा ओटा बांधलेला…
Author: Saimat
सावदा : प्रतिनिधी विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खडसे या निवडणुकीत नक्कीच बाजी मारतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही खडसे विधान परिषदेत निवडून येतील असे वाटते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडसे यांचे अनेक समर्थक गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत, असे राजेश वानखेडे यांनी सांगितले. राष्ट्रवादीने खडसे यांना उमेदवारी दिल्याने खानदेशात आणि विशेषत: तापी खोऱ्यात त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खडसे यांचा संभाव्य विजय साजरा करण्यासाठी मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, रावेर, सावदा या तापी परिसरातून त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांचे बुकींग देखील केले. आहे.…
मुंबई : प्रतिनिधी आज सकाळी ९ वाजल्यापासून विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. एक एक करून आमदार मतदान करत आहे. आतापर्यंत जवळपास भाजपच्या (BJP) सर्व आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आत केवळ लक्ष्मण जगताप आणि सुधीर मुनगंटीवार यांचे मतदान बाकी आहे. ते दुपारी मतदान करणार आहे. विधान परिषदेच्या एकूण १० जागांसाठी मतदान सुरू आहे. आतापर्यंत भाजपच्या १०४ आमदारांनी मतदान केले आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या सत्रातच भाजपच्या आमदारांना मतदान करण्याची सूचना केली होती. त्यानंतर भाजप आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आत सुधीर मुंनगंटीवार आणि लक्ष्मण जगताप देखील मतदानासाठी निघाले आहेत ते दुपारच्या सत्रात मतदान करणार आहे.…
जळगाव ः प्रतिनिधी वेस्टर्न आशियाई यूथ रॅपिड (जलद) बुद्धिबळ स्पर्धेत भाग्यश्री पाटील प्रथम आली. मालदीव फिडे अंतर्गत 18 वयोगटातील मुलींच्या वेस्टर्न आशियाई यूथ रॅपिड (जलद) बुद्धिबळ स्पर्धेत पाचोऱ्याची एम. एम. कॉलेजची विद्यार्थिनी भाग्यश्री हिने 7 पैकी 6 गुण घेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या खेळात कजकस्थान व उझबेकिस्तानची अव्वल खेळाडू असतानादेखील भाग्यश्रीने 1 गुण जास्त मिळवून विजेती ठरली. भाग्यश्रीचा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अतुल जैन, एम. एम. कॉलेजचे चेअरमन संजय वाघ, प्रा. स्वप्निल पाटील यांनी गौरव केला.
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या तरसोद येथील मराठी शाळेत निवृत्त शिक्षक विजय लुल्हे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. वडील स्वर्गीय मुख्याध्यापक सुपडू सुतार यांच्या स्मरणार्थ त्यांनी हा उपक्रम राबवला. शशिकांत हिंगोणेकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे निरीक्षक तथा विस्तार अधिकारी सुनिल जोशी (सांख्यकीय विभाग ) व अभियंता योगेश पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधाकर सोनवणे, आदर्श केंद्रप्रमुख भगवान देवरे, भास्कर पाटील, तुकाराम पाटील, प्रभारी मुख्याध्यापिका सुषमा पाटील, आत्माराम सावकारे उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय लुल्हे व मनोहर बाविस्कर यांनी केले. कार्यक्रमाची प्रेरणा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील आदींकडून मिळाली होती.
मुंबई : प्रतिनिधि राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटेपासूनच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईतल्या अनेक उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. इतकंच नाही तर आज हवामान खात्याकडून या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस कोसळेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता असून पुण्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. यामुळे घाट माथ्यावर जोरदार पावसाने…
जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने आपले लक्ष्य ठरवले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील भाजपचे अनेक सत्तास्थाने हातून गेले आहे. भाजपचे (BJP) नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचीदेखील कोंडी झाली. अशातच राष्ट्रवादीने खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी देत महाजनांची आणखी कोंडी केली आहे. त्यामुळे खडसे यांना कुठल्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी महाजनांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ही बातमी पण वाचा : शिवसेनेचं ठरलं ; विधान परिषदेत ४ मते काँग्रेसला देणार राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांच्या यादीत त्यांचा नावाचा…
मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेतील पराभवानंतर आज होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने भाजपाला पराभूत करण्यासाठी मोट बांधली आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून अतिरिक्त ४ मते काँग्रेसच्या भाई जगताप यांच्या पारड्यात टाकण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भांत काल रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस (Congress) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेची चार ते पाच मतं काँग्रेसला देणार असल्याचे आश्वासन काँग्रेसला दिले आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपचे ५ उमेदवार तर महाविकास आघाडीचे सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. मतांचा कोटा गाठण्यासाठी छोटे पक्ष, अपक्ष आमदारांची भूमिका निर्णायक…
मलकापूर प्रतिनिधी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन व औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन च्या वतीने विभागीय क्रिडा संकुल गारखेडा औरंगाबाद येथे दि ३० जून ते २ जुलै दरम्यान आयोजित ज्युनिअर राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिक्यपद स्पधेसाठी भाग घेनाऱ्या बुलढाणा जिल्हा संघाची जिल्हास्तरीय अजिक्यपद स्पर्धा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्त साधुन बॅडमिंटन स्पोर्टस् असोशिएशन ऑफ बुलढाणा व विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२२ जुन पासुन जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले अहं. १३ व १९ वयोगटातील मुले-मुली यांच्या स्पर्धा दि. २२ जुन ला सिंगल व डबल्स अश्या स्पर्धा राहणार असून सदर जिल्हास्तरीय अजिक्यपद स्पधेतुन बुलढाणा जिल्हा संघाची निवड केली जाणार असून हा संघ…
सोयगाव प्रतिनिधी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षाचा 56 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख आबासाहेब काळे, नगर पंचायततील शिवसेना गटनेते अक्षय काळे, नगरसेवक संतोष बोडखे, गजानन कुडके,भगवान जोहरे,हर्षल काळे,लतिफ शहा,अशोक खेडकर तसेच ,राजू दुतोंडे,किशोर मापारी,डॉ.फुसे,रमेश गव्हांडे, शेख बबलू,शरीफ शहा,जावेद पिंजारी,अकील शेख,योगेश नागपुरे सह इतर शिवसैनिकांची उपस्थिती होती.