Author: Saimat

महिलेच्या पतीला घटस्फोट देण्यासाठी पतीसमवेत संगनमत करुन संबंधित महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेच्या पतीसह करुणा शर्मा ह्यांच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा साहाय्यक पोलिस आयुक्त यांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री मुंबई येथून करुणा शर्मा यांना ताब्यात घेऊन पुण्यात आणले असून अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगतिले. गुन्हा दाखल अजयकुमार विष्णू देडे , करुणा शर्मा असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे, अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (ऍट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वप्नांजली अजयकुमार देडे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2021 ते 30…

Read More

यावल प्रतिनिधी  भारतासाठी हिंदु राष्ट्र ही संकल्पना नवीन नाही.यापूर्वी अनेक हिंदु साम्राज्य येथे होऊन गेली आहेत.त्यातील एक ‘विजयनगर’चे साम्राज्य.या विजयनगर साम्राज्य हे सार्वभौम आणि बलशाही होते.आपल्या ऋषीमुनींनी अशा प्रकारच्या हिंदु साम्राज्याची कामना आधी पासूनच केली आहे; मात्र हिंदूंच्या अनास्थेमुळे ते वैभव आपण टिकवून ठेऊ शकलेलो नाही.हा दोष हिंदूंचा आहे.आता तरी हिंदूंनी त्यासाठी प्रयत्न करायला हवे,असे प्रतिपादन हम्पी येथील प्राचीन मंदिरांचे अभ्यासक तथा जळगाव येथील अधिवक्ता सुशील अत्रे यांनी केले. रामनाथी,गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘धर्मरक्षणाच्या हेतूने कायद्याची संघर्षाची दिशा’ या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जळगाव येथील अधिवक्ता सुशील अत्रे पुढे म्हणाले की, विजयनगर साम्राज्यातील तत्कालीन…

Read More

आपल्या भारत भुमित योग फार फार प्राचीन कालापासून ज्ञात आहे. योगाचे मुळ भारत देश आहे. योग आपल्या संस्कृतित पूर्वी पासून असला तरी आज कोरोना परिस्थीती मुळे त्याचे महत्त्व अधिक वाटत व वाढत आहे. योग आपण घरी राहुण, सुरक्षित राहुण आपल्या कुटुंबासोबत करू शकतो व आजचा प्रत्येकावर वाढलेला ताणतणाव कमी करू शकतो व आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवु शकतो. हीच आजच्या काळाची आताची खरी गरज आहे ‘योग’ हा शब्द संस्कृत ‘युज’ या धातूपासून बनलेला आहे अर्थ “जोडणे”. म्हणूनच तर म्हणतान योगाने शरीर मन व आत्म्याचे ऐक्य साध्य होते. या एकत्रितते मुळे आनंद व शांतीची अनुभूती येते व जीवन प्रगत होण्यास सहाय्य ठरते.…

Read More

भडगाव प्रतिनिधी  कजगाव ता.भडगाव दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिये याचा प्रत्यय आला तो भोरटेक च्या बरड भागातील लंगडी भवानी मंदिर परिसरातील रहिवाशांना भंडारा उधळत भुरळ टाकत एकाच्या पस्तीस हजार च्या तीन बकऱ्या तर एकाचे दोन अडीच हजार रुपये रोख घेत अज्ञात भामट्यांनी पळ काढला सदर घटनेमुळे नागरिकांत घबराट पसरली आहे भोरटेक बु.ता.भडगाव येथील बरड भागातील लंगडी भवानी मंदिर परिसरात पाच ते सहा घर वजा झोपडे असुन पाच सहा कुटूंब येथे वास्तव्यास आहेत दि.१७ च्या सकाळी तीन अज्ञात भामटे विना नंबर प्लेट असलेल्या मोटरसायकल ने या विरळ वस्ती असलेल्या भागात आले नी आपण एका प्रसिध्द असलेल्या ,बाबा चे शिष्य असल्याचे…

Read More

सुरत : वृत्तसंस्था मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 12 वाजता शिवसेनेची बैठक बोलावली आहे. तत्पुर्वी शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि महाविकास आघाडीतील नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार संध्याकाळपासून नाराज असून ते नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये असून ते आज दुपारी 12 वाजता सुरतमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्य सभा पाठोपाठ विधान परिषदेतही शिवसेनेच आमदार फुटले शिवसेनेच्या अनेक मंत्र्यात सध्या नाराजी नाट्य सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 12 वाजता शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. तर तिकडे नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे हे सुरतमध्ये आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. हे…

Read More

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले असून, ते काल संध्याकाळापासून नॉट रिचेबल आहेत. निवडणुकीत शिवसेना आमदारांच्या फुटीमुळे शिंदे हे नाराज असल्याचे कळते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये असल्याची माहिती आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची मुंबईत वर्षांवर बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीला शिंदे हजर राहणार का? हे पाहावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनूसार, एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना देखील उधाण आले आहे. सोमवारी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे काही आमदार फुटले असून, भाजपचे सर्व पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर शिवसेनेकडून नाराजी नाट्य सुरू झाले आहे.…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील वाघरे येथे शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली असून यात १२ जण जखमी झाले आहेत. याबाबत ८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वाघरे येथे दोन गटांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री झाली. यात दिनांक १९ रोजी रात्री आठच्या सुमारास तुफान हाणामारी झाली. तर यात जखमी झालेल्यांवर दुसर्‍या दिवशी म्हणजे दिनांक २० जून रोजी हल्ला करण्यात आला. यात मल्हारी विक्रम पाटील, सुदाम रमेश पाटील, रोशन पुंडलिक पाटील, सुनील रमेश पाटील, नाना भिकारी पाटील, भाऊसाहेब भिकारी पाटील, रमेश विक्रम पाटील, अनिल मल्हारी पाटील, पुंडलिक विक्रम पाटील, महादेव नानू पाटील, योगेश कृष्णा पाटील, दीपक महादू पाटील, आधार भिकारी पाटील, महादू पाटील,…

Read More

भडगांव प्रतिनिधी कजगाव ता.भडगाव कजगाव भडगाव मार्गावरील पासर्डी गावाजवळील वळणावर थांबलेल्या कामा जवळील नाल्यात मोटारसायकल सह चालक नाल्यात पडल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला सदर वळणावर आता पर्यंत दहा ते पंधरा अपघात झाले असुन अनेकजण जखमी, गंभीर जखमी झाले आहेत तर आज या वळणावरील थांबलेल्या कामाने एक बळी घेतल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे थांबलेले काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कजगाव भडगाव मार्गावरील कजगाव पासुन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पासर्डी गावाजवळ वळणावरील थांबलेल्या कामा जवळ मोठे पुल आहे नेमके पुला जवळच वळण रस्ता काढण्यात आला आहे भडगाव कडुन येणारा वाहनधारक सिमेंट च्या बनलेल्या रस्त्याने…

Read More

जळगांव प्रतिनिधी :- विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालविलेल्या प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल व प्रगती माध्यमिक शाळेचा निकाल 100% लागला असून संस्थेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक माननीय श्री प्रेमचंदजी ओसवाल, संस्था अध्यक्षा श्रीमती मंगलाताई दुनाखे,संस्था सचिव श्री सचिन दुनाखे सर यांनी विद्यार्थी व पालकांचा पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून सत्कार केला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा पाटील व श्रद्धा दुनाखे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ वैद्य मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व…

Read More

नवी दिल्ली : रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्यावतीने चालवण्यात आलेल्या समर्पण अभियानात आतापर्यंत सुमारे 5457.94 कोटींचा निधी जमवला आहे. मात्र, दान म्हणून आलेल्या रक्कमेतील जवळपास 22 कोटींच्या रक्कमेचे चेक बाउन्स झाले आहेत. त्याबाबतचा एक वेगळा अहवाल तयार केला जात आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे जमा झालेला निधी अद्यापही पूर्णपणे मोजली नाही. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्यावतीने चालवण्यात आलेल्या समर्पण अभियानात आतापर्यंत सुमारे 5457.94 कोटींचा निधी जमवला आहे. मात्र, दान म्हणून आलेल्या रक्कमेतील जवळपास 22 कोटींच्या रक्कमेचे चेक बाउन्स झाले आहेत. त्याबाबतचा एक वेगळा अहवाल तयार केला जात आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे जमा झालेला निधी अद्यापही पूर्णपणे मोजली नाही. काही जिल्ह्यानिहाय ऑडिटींगचे काम…

Read More