Author: Saimat

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आहे. हा ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का मनला जातो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मध्यस्थीचे प्रयत्न होऊनदेखील शिंदेंची नाराजी कायम आहे. त्यातच शिवसेनेकडून शिंदेंवर मोठी कारवाई करण्यात आली. त्यांचं गटनेते पद रद्द करण्यात आले. सध्या शिंदे हे आमदारांसोबत आसाममधील गुवाहटीत आहेत. त्याठिकाणाहून दुपारपर्यंत ते मुंबईत येतील आणि मुंबईत आल्यानंतर राज्यपालांची भेट घेतील. या भेटीनंतरच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला शिवसेना आमदारांनी दिलेला पाठिंबा काढून घेतला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच ते भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावाही करतील, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे. दुपारच्या घडामोडीनंतरच ठाकरे सरकार…

Read More

​मेष राशी: मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही मोठे सुख येणार आहे. तुम्ही स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. व्यापार्‍यांसाठी दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीने अधिकारी प्रभावित होतील. कठोर परिश्रमाने अवघड कामेही सहज पूर्ण होतील. व्यवसायात चांगला फायदा होईल. आज आरोग्य चांगले राहील. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. कामानिमित्त लांबचा प्रवास संभवतो. आज ८५% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. ​वृषभ राशी: आज तुम्ही तुमचे विचार आणि वागणूक संतुलित ठेवा. दागिने व कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. तुमच्यासमोर एखादे आव्हान येऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. मनाला आनंद होईल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता…

Read More

यावल प्रतिनिधी  दि.21जुन 2022मंगळवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल तालुका वतीने यावल शहरातील खंडेराव महाराज मंदिरा सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान पाणी फिल्टर हाऊस,बोरावल रोडजवळ,यावल येथे भव्य योग शिबिराचे आयोजन केले होते शिबिरास नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. संयुक्त राष्ट संघाच्या बैठकीत भारताचे लोक प्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करावा असा प्रस्ताव मांडून 11 डिसेंबर2014ला हा प्रस्ताव मान्य करून दरवर्षी21 जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे आव्हान श्री नरेंद्र मोदीजी यांनी जनतेला केले होते. आज 8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल तालुक्याच्या वतीने भव्य योग…

Read More

बोदवड प्रतिनिधी बोदवड येथील जामनेर भुसावळ रोड वरील महात्मा फुले चौकात. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा लवकरात लवकर बसवण्याची मागणी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी बोदवड तालुका यांच्यावतीने मुख्याधिकारी यांना करण्यात आली. मुख्याधिकारी व नगराध्यक्ष आनंद भाऊ पाटील यांनी निवेदन कर्ते यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू अशी ग्वाही निवेदन करतांना दिले. निवेदन देतांना संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष दीपक एकनाथ खराटे, शहराध्यक्ष पवन नंदू पाटील, आकाश माळी ,आनंद माळी, वैभव माळी, सागर तेली, गोपाल साळुंखे, गणेश भाऊ सोनोने उपस्थित होते.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ खडसे यांनी बंड पुकारला आहे. त्यांच्यासोबत अनेक आमदार सुरतमधील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार असून राज्यातील ठाकरे सरकार कोसळणार असा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्वीट करत भाजपाला टोला लगावला आहे. https://twitter.com/deepalisayed/status/1539101499971842049?s=20&t=P26MPP_bZ4VavWI8_5_D1w माननीय एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणणाऱ्यांनी भाजपची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे उगाच भाजपच्या IT CELL च्या लिंबु टिंबुनी सोशल मिडीयावर तर्क-वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपला झेपणार नाही, असा टोला दिपाली सय्यद यांनी…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  शिवसेनेचे  नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसनेमध्ये हालचालींना सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच दुसरीकडे मोठी कारवाई करत शिवसेनेने शिंदे यांना गटनेतेपदावरुन हटविले आहे. शिंदेंच्याजागी मुंबईतील शिवसेना आमदाराला संधी देण्यात आली आहे.अजय चौधरी  यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड मागे घेण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत यापुढे आघाडी नको. त्याऐवजी शिवसेनेने भाजपासोबत युती करून सत्ता स्थापन करावी. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद द्यावं आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद द्यावं, असा थेट प्रस्ताव शिंदे यांनी मांडला आहे. शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमूळे राज्यात राजकीय…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरे सरकार बनविताना देखील अशी बंडाळी झाली होती. पण नंतर काय झालं, हे संपर्ण देशाने पाहिलं. आताही चर्चेतून सगळं काही ठीक होईल, असा विश्वास आहे. पण सध्या शिवसेनेत जे काही चाललंय तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू असं शरद पवार म्हणाले. त्यावर सरकार कोसळेल का? आणि सरकार पडल्यावर राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, आपण भाजपसोबत जाणार का?, असा थेट सवाल पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर ‘जरा तरी सेन्सिबल प्रश्न विचारा. आम्ही विरोधी पक्षात बसू’, असं थेट…

Read More

औरंगाबाद : वृत्तसंस्था विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडात मराठवाड्यातील सहा आमदारांची नावे समोर येत आहेत. यात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील दोन मंत्र्यांसकट, चार कट्टर आमदारांचा समावेश असल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आज सकाळी एकनाथ शिंदे यांचे बंड व त्यातील एकेक आमदारांची नावे समोर येऊ लागताच वातावरण तापू लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मंत्रिमंडळातील संदीपान भुमरे व अब्दुल सत्तार यांच्यासह औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय सिरसाट, वैजापूरचे रमेश बोरणारे, परंड्याचे तानाजी सावंत, उमरग्याचे ज्ञानराज चौगुले हे सहा आमदार नाॅटरिचेबल असून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये आहेत. मराठवाड्यात शिवसेनेचे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपनं यश मिळवल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारपुढं राजकीय संकट निर्माण आहे. शिवसेनेचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे हे सध्या नॉट रिचेबल असून बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. https://twitter.com/mieknathshinde/status/1539171911044718593?s=20&t=qufqwqPuUPFyCvCfTZSdGw एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे २२ आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं असून “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Read More