Author: Saimat

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सध्याच्या घडीला शिंदे यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारला मोठा धोका निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. नवी मुंबईतील शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. यातच शिवसेनेचे फायर ब्रँड नेते नितिन नांदगावकर यांनी देखील या घडामोडीवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. गद्दारांना सोडणार नाही. माझे काम ठोकायचे आहे. याआधी समाजकंटकांना ठोकून काढत होतो. मात्र, आता मला असे वाटतेय की गद्दारांना चोपायची वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसेना भवनाबाहेर…

Read More

मुंबई प्रतिनिधी  यास्मिन शेख  शिवसेनेतील बंड नवीन नसले तरी शिवसेनेतील बंडाने आघाडी सरकार ला अडचणीत आले आहे. सरकार अल्पमतात आले आहे .  त्यामुळे आज काय काय घडते या कडे लक्ष लागले आहे . यातच आदित्य ठाकरे यांनी आपल्या प्रोफाइल वरून मंत्री पद हटवले आहे तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जातंय . शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे. दरम्यान, सुरतमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर एकनाथ शिंदे भल्या पहाटेच 33 आमदारांना घेऊन गुवाहाटीला तळ ठोकून आहे. एकनाथ शिंदे यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यात गेल्या दोन दिवसापासून राजकीय वातावरण एकनाथ शिंदे यांनी तापवून ठाकरे सरकारला गॅसवर ठेवले होते तर आज खान्देशची मुलुख मैदान तोफ जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज नॉट रिचेबल झाले असून त्यांनी आपल्या समर्थकांना जय महाराष्ट्र असा मेसेज केल्याचे समजते. ना.गुलाबराव पाटलांसोबत असलेले मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील हे देखील आज नॉट रिचेबल झाले आहेत. दोन्ही नेते गुवाहाटीच्या दिशेने निघाल्याचे सांगण्यात येत आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याचे वृत्त माध्यमातून झळकत होते. नगरविकास खात्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या कामात होत असलेल्या ढवळाढवळला ते कंटाळले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी याबाबत बोलून दाखविले…

Read More

मुंबई : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या शक्तीशाली प्रदर्शनापुढे आणि त्यांना असलेल्या आमदारांच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर काहीही पर्याय उरलेला नाहीय. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे आता लक्ष ठेवून राहायचं, असं मुख्यमंत्र्यांचं ठरलेलं असतानाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं प्लॅन फोडणारं ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरु आहे, असं ट्विट राऊतांनी केलं आहे. म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याचे संकेतच संजय राऊतांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळच बरखास्त होईल. https://twitter.com/rautsanjay61/status/1539490296412643328?s=20&t=Uc6Oag3A-vXS_ybuTtQfUQ आदित्य ठाकरेंनी ट्विटर बायोमधून मंत्रिपद हटवलं एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खिळखिळी केल्यानंतर ठाकरे सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील जुन्या अपार्टमेन्टमधील स्वतंत्र नळ जोडणी मिळण्यासाठी जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. याबाबत मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील 25 वर्षापासून जुने शेकडो अपार्टमेन्ट आहेत. त्यामधील प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र नळजोडणी आहे. त्याद्वारे प्रत्येक फ्लॅट धारकांना स्वतंत्र्यरित्या शुध्द पाण्याचा पुरवठा होता.  नुकतेच अमृत योजनेची नविन जलवाहिनी संपूर्ण शहरात टाकण्यात आली आहे. त्या नविन जलवाहीनीवरुन जुन्या नळांना स्वतंत्र्यरित्या जोडणी करून द्यावी अशी मागणीचे अनेक अर्ज महापालिका प्रशासनाकडे आलेले आहेत. दरम्यान, महानगरपालिका प्रशासनातर्फे जुन्या अपार्टमेंन्टला पूर्वीप्रमाणे नळ कनेक्शन न देता एका अपार्टमेंन्टला एकच कनेक्शन देण्याचे तोंडी सांगितले जात आहे.…

Read More

सोयगाव तालुका प्रतिनिधी शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळाचे, कै.बाबुरावजी काळे स्कूल, सोयगांव येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे शिबीर घेण्यात आले यावेळी शाळेत योगप्रशिक्षण घेतलेला प्रथमेश काटोले या विद्यार्थ्याने शाळेतील विद्यार्थ्यांना योगा चे प्रकार व योगासने कसा करावा याचे प्रात्यक्षिके करून दाखवली यावेळी शाळेचे शिक्षक श्री ज्ञानेश्वर एलीस यांनी विद्यार्थ्यांना योग ही काळाची गरज असून तो सर्व नागरिकांनी प्राणायाम करणे अत्यंत गरजेचे आहे,सध्याच्या काळात योग मनुष्याचे ताणतणाव कमी करतो त्यामुळे प्रत्येक नागरिकाने.सकाळी अथवा संध्याकाळी जसा वेळ मिळेल तेव्हा किमान दहा ते विस मिनिटे स्वतः साठी द्यावा.जेणेकरून जिवन हे सुखकर होईल.असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना त्यांनी केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Read More

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. आमच्याकडे राखेतून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आहे. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? सत्ताही परत मिळवता येईल. पण पक्षाची प्रतिष्ठा ही आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे बंड शमेल, असा आशावाद व्यक्त केला. एकनाथ शिंदे हे सध्या आमच्यापासून लांब आहेत, ते जवळ आल्यावर आम्ही त्यांच्याशी…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील कॉलेज तरुणाचा आज सकाळी पहूर येथील खर्चाने फाट्याजवळ उभ्या असलेल्या कंटेनर ला जोरदार धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज आठ वाजता घडली आहे. सविस्तर माहिती अशी की पहुर पाळधी येथील रहिवाशी समाधान देव सिंग परदेशी वय 23 हा कॉलेज तरुण सकाळी सोयगाव येथे परीक्षा असल्यामुळे तो पेपर देण्यासाठी मोटरसायकल क्रमांकm h 19 b s 0235 या मोटरसायकली ने जात असताना जळगाव संभाजीनगर महामार्गावर पहूर जवळ खर्चाने फाटा दरम्यान पंचर झालेल्या उभी असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्याच्या हातापायाला डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे समाधान परदेशी याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ…

Read More

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० पेक्षा जास्त आमदारांसोबत बंड पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार धोक्यात आले आहे. त्यातच एकनाथ शिंदे हे दुपारी राज्यपालांची भेट घेणार होते.मात्र आता ते शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या गुवाहटीत असलेले एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत मुंबईत येणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण शिंदे यांनी विधानसभेत…

Read More