मुंबई: शिवसेना ही संघटना संकटांच्या छातीवर पाय ठेऊन उभी राहिली आहे. जय-पराजय पचवले. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा, असा इशारा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखातून देण्यात आला आहे. आसामात गेलेल्या लोकांना आमदार-नामदार होता आले. हे सर्व आमदार पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले तर जनता त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. याचे भान या मंडळींना नसेलच असे नाही. त्यामुळे हे शिवसेनेचे आमदार व नामदार पुन्हा…
Author: Saimat
सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगावसह परिसरात बुधवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसाने सोयगाव आणि जरंडी मंडळात जोरदार मुसंडी मारली आहे तर रावेरी शिवारात शेतात काम करणाऱ्या युवा शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याने या घटनेत युवा शेतकरी गंभीररित्या भाजला असून दुसऱ्या अन्य घटनेत कंकराळा शिवारात वीज कोसळून झाडाखाली बांधलेल्या गायीचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे सोयगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोयगाव परिसरात बुधवारी जोरदार विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली यामध्ये रावेरी शिवारात गट क्रमांक-एक मध्ये शेतात काम करणाऱ्या संजय राजाराम मोरे(वय २४ रा.जरंडी) याच्या अंगावर वीज कोसळल्याने तो गंभीररित्या भाजला असून त्याच्या डोक्यावरील केस यामध्ये जळलेल्या अवस्थेत असून त्याच्या हाताला जोरदार गंभीररीत्या दुखापत झाल्याची…
मुंबई प्रतिनिधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असून, एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास ४० हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. https://twitter.com/MeNarayanRane/status/1539509722360840193?s=20&t=GkfvzDQxWWutGozifMG60g शिवसेनेला सत्तेतून खाली खेचल्याचा आनंद संजय राऊत यांना झाला असेल, अशा शब्दांत नारायण राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. “संजय राऊत खूश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका भागात राहणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मंगळवार २१ जून रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात ७ वर्षीय चिमुकली ही आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तव्याला आहे. मंगळवारी २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी दामोदर पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) याने पीडित मुलीला किराणा दुकानावर बोलून तिचा लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत अश्लिल चाळे केले. दरम्यान हा प्रकार पीडित मुलीने घराच्यांना सांगितला. मुलीच्या आईसह नातेवाईकांनी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली.…
जळगाव ः प्रतिनिधी देशात नावलौकिक प्राप्त केलेली भोरगाव लेवा पंचायत ही लेवा पाटीदार समाजाची अग्रणी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून अव्याहतपणे समाज हिताचे कार्य सुरू आहे. संस्थेचे कुटुंबनायक हे पद वंशपरंपरेने पाडळसा येथील पाटील घराण्याकडे असून उर्वरीत कार्यकारिणी ही समाजबांधवांना विश्वासात घेऊन गठीत केली जाते. सदर कार्यकारिणीवर कुलसचिवपदी 2016 मध्ये ॲड संजय राणे यांची नियुक्ती केली होती. मात्र त्यांच्या कामकाजाची कार्यपध्दत चुकीची असल्याची समाजबांधवांच्या लक्षात आले. ज्या पध्दतीने पारदर्शी काम व्हायला पाहिजे होते ते न होता समाजास वेठीस धरण्याचे काम होत असल्याचे ज्यावेळी सुज्ञ समाजबांधवांना दिसू लागले त्यावेळी त्यांनी सदर बाब कुटुंबनायक रमेशदादा विठू पाटील यांच्या निदर्शनास आणून…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेच्या आमदारांनंतर आता शिवसेनेतील खासदारही भाजपासोबत (BJP) सरकार बनवण्यासाठी आग्रही असल्याची माहिती पुढे आली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसला सोडा आणि भाजपसोबत चला असा सूर शिवसेना खासदारांनी शिवसेनेच्या बैठीकीत आवळला असून, त्याबाबतचा निरोप पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. विरोधकांना नाकीनऊ आणण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारकडून सातत्याने ईडी यासारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका सातत्याने होत आहे. एकीकडे भाजपाच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी होत नसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यातील राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या विविध नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणा ईडीच्या नोटीस येत आहेत. त्यांना सतावण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकारकडून होत आहे. याला कंटाळूनच आता शिवसेनेच्या काही आमदारांनी…
जामनेर : प्रतिनिधी गणपती नगर जामनेर येथे दैनिक योग वर्गात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग शिक्षिका : सौ. पुष्पा अग्रवाल, सौ.अंजु पवार, सौ.माधुरी लखोटे यांनी प्राणायाम व आसनांमधून “निरोगि शरीर हाच खरा दागिना” हा संदेश दिला. त्यावेडी राष्ट्रसेविका समितिच्या जामनेर तालुका अध्यक्षा सौ.आरती देशपांडे यांचे सौ.अंजु पवार यांनी आयुर्वेदिक गुळवेल वनस्पतीचे रोपटे देऊन स्वागत केले.त्यावेडी सौ.छाया पाटील, सौ.अरुणा रोनखेडे, सौ.सुरेखा वाघ, सौ.रेखा पाटील तसेच आनंदी महिला बचत गट व गणपती नगर येथील महिला उपस्थित होत्या. आयोजक: सौ.अंजू पुखराज पवार. कोणत्याही दोन चांगल्या व परस्पर पूरक गोष्टी एकत्र येणे याला योग म्हणतात. व्याधीमुक्त शरीर व नियंत्रीत मन यांचा…
मुंबई : राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक आमदारांसोबत बंड पुकारला आहे. शिवसेनेने या बंडाच्या विरोधात कठोर पाऊले उचलत बंडखोर आमदारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे बंड पुकारलेले आमदर वर्षा बंगल्यावर संध्याकाळपर्यंत पोहोचणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी आमदारांना सूचना जारी करण्यात आल्या आहे . सध्या सुरु असलेल्या घडामोडी पाहता शिवसेनेकडून हा व्हिप जारी करण्यात आला आहे.पक्षांतर घडवून सरकार पडण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे…
जळगाव : प्रतिनिधी एका प्रौढ व्यक्तीला अज्ञात चार जणांनी बेदम मारहाण व शिवीगाळ केल्याचा प्रकार शहरातील स्वातंत्र्य चौक येथे घडला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील स्वातंत्र्य चौक येथे धनराज रामकृष्ण वाघ (वय-५५) रा. कंकराळा ता. सोयगाव जि.औरंगाबाद हे कामाच्या निमित्ताने सोमवारी २० जून रोजी जळगावात आले होते. दुपारी ४ वाजता शहरातील स्वातंत्र्य चौक येथे औरंगाबादकडे जाण्यासाठी वाहनाची वाट बघत होते. एका महिलेला त्यांनी मावशी म्हटल्याचा रागातून बाजूला उभी असलेली एका चार चाकी वाहनामध्ये बसलेल्या अज्ञात चार जणांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. दरम्यान धनंजय धनराज वाघ यांनी…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी बंड केलं. शिवसेनेसोबत अपक्ष आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे रातोरात सूरतमध्ये पोहोचले. तिथून मग आसामला पोहचले. अशातच महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने जात असल्याचे सूचक ट्वीट शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केले. या सगळ्यात घडामोडींचा मास्टरमाईंड कोण होता? एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे उद्धव ठाकरेच होते का? काँग्रेस राष्ट्रवादीला चेकमेट करण्याचा हा डाव उद्धव ठाकरेंनी आखला होता का? अशी शंकाही आता उपस्थित केली जात आहे. आणि ही शंका उपस्थित होण्यासाठी अनेक कारणे आहेत. ही बातमी पण वाचा : एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४६आमदार आहेत, तसंच ही संख्या ५० पर्यंत जाईल, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.…