पुणे ः प्रतिनिधी राज्यात राजकीय भुकंप आले असून, महाविकास आघाडी सरकार संकटामध्ये सापडली आहे. शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महाविकास आघाडी सरकार राहते की, पडते हा प्रश्न पडलाय आहे. दरम्यान, पुण्यात “मी पुन्हा येईल“ असे म्हणणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लागले आहेत. त्या पोस्टरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याचे साकडे विठ्ठलाला घालण्यात आले आहे. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लागले असून, त्यात फडणवीस मुख्यमंत्री होवो अशा मागणीचे पोस्टर लावण्यात आलेले आहे. भाजपच्या वतीने हे पोस्टर लावण्यात आले असून, त्यात लिहिले आहे की, “हे…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत जळगाव जिल्हा पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीने 20 सुवर्ण व 2 रजत पदक प्राप्त केले आहेत. भोपाळ येथे यूथ स्पोर्ट्स कराटे असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील 12 खेळाडू सहभागी झाले होते. खेळाडूंना प्रशिक्षक अश्विनी निकम, राजेंद्र जंजाळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच बेस्ट अकॅडमीच्या द्वितीय पुरस्काराने जळगाव संघाचा गौरव करण्यात आला. विजेत्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सहायक पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी गौरव केला. यावेळी पालकही उपस्थित होते. पदक प्राप्त खेळाडू असे उर्वशी बोरनारे, नेत्रा अहिरे, हर्षाली विरकर, कौस्तुभ जंजाळे, मयूर पाटील, स्वरूप पाटील, पूर्वेश विधाते, जान्हवी पाटील, वेदांत हिवराळे, अविनाश राठोड, राम जाधव,…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेलं आमदारांचं बंड काही थांबता थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भावनिक आवाहन केल्यानंतरही शिवसेनेला लागलेली गळती सुरूच आहे. एक एक करून आमदार गुवाहाटीला जाऊन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटत आहेत. सध्या शिंदे गटात शिवसेना आणि अपक्ष असे ४६ आमदार सहभागी झाले आहेत. आता पर्यंत शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेले ४१ आमदार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे १४ आमदार उरले आहेत. त्यामुळे शिवसेनेनेही आता आशा सोडली आहे. उद्धव ठाकरे काही वेळातच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. अशातच शिवसेनेने हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदारांना बंधनमुक्त केले आहे. तुम्हाला आपल्या मतदारसंघात…
जळगाव ः प्रतिनिधी गेल्या 60 तासात खूप मोठा राजकीय भूकंप राज्यात झाला आहे. त्याच पार्श्वभूमिवर शिवसेना पक्षपमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक एकत्र येवून शहरातील गोलाणी मार्केट पक्ष कार्यालयापासून ते टॉवर चौकापर्यंत समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती. यावेळी शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. शिवसेनेतील प्रत्येक नेत्यांनी बंडखोर शिंदेना स्वगृही परत येण्याची भावनिक साद घातली जात आहे. जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेनेचे नेते गुलाबराव वाघ, महानगराध्यक्ष शरद तायडे, महापौर जयश्रीताई महाजन, गजानन मालपुरे, सरिताताई माळी, शोभा चौधरी, नितीन सपके, नगरसेवक सचिन पाटील मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, मंगला बारी, शिवराज पाटील यांच्यासह…
शिवसेनेत बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच आता भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडल्याने अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडे सरकार टीकवण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाही. त्यात आता एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वाचं आहे. भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपद, केंद्रात २ मंत्रिपद देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सहा मंत्रिपद असलेल्या शिंदे गटाल एकूण मंत्रिमंडळाच्या २५ टक्के हिस्सा देण्याची ऑफर भाजपकडून असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटात काही आमदार सहभागी झाले आहेत.…
ईडीच्या भीतीने पक्ष सोडून दोन-चार लोक म्हणजे शिवसेना पक्ष नव्हे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही आमदाराला थांबण्याचे आवाहन केलेले नाही. पण मी एवढंच सांगतो की, या आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावेच, असे जाहीर आव्हान शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना दिले. जो कुठल्या तणावाखाली येऊन पक्ष सोडतो तो बाळासाहेबांचा भक्त नसू शकतो, आम्ही आहोत, आमच्यावरही मोठा दबाव, गेल्या ४ दिवसांपासून एक मंत्री सतत ईडीच्या कार्यालयात जात आहे, त्याने पक्ष नाही सोडला, मी आणि माझ्या कुटुंबावर ईडीचा दबाव, आम्ही आजही ठाकरे कुटुंब आणि पक्षासोबत राहू, अखेरच्या श्वासापर्यंत राहू, असे संजय राऊत यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत…
खानदेशातील शिवसेनेचा ढाणा वाघ म्हणून ओळख असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. पाटील यांनी आज थेट गुवाहटीमध्ये पोहचून एकनाथ शिंदे यांना चरणस्पर्श करून नमस्कार केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी बोलताना पाटील यांनी उद्या आणखी शिवसेनेचे आमदार गुवाहटीममध्ये पोहचणार असल्याचा दावा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज सकाळीच गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आपण गुवाहटी येथे निघोलो असल्याची घोषणा केली होती. माझ्या रक्तात शिवसेना आहे, आम्ही शिवसेना म्हणूनच राहणार आहोत. पक्ष बदलणार नाही, मी गुवाहटीला चाललो आहे. राज्यातील बहुतेक मंत्री नेते गेले. जिल्यातील तीन जणही गेले मी एकटा काय करू? असे स्पष्ट…
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजकीय खळबळ माजली आहे. खुर्ची आणि पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील असले तरी त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. मिळालेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतरही पक्षातील आणखी काही आमदार बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचले आहे. त्याचवेळी या सात बंडखोरांसह 2 अपक्ष आमदारही गुवाहाटीमध्ये पोहोचल्याचे वृत्त आहे. गुवाहाटीत रेडिसन हॉटेलमध्ये शिवसेने बंडखोर एकनाथ शिंदे आणि समर्थकांची खलबते सुरुच आहेत. शिंदेंच्या गटात शिवसेनेचे 38 आमदार, 7 अपक्ष आमदार असे एकूण 45 आमदार शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत. शिंदे गटाकडे दोन तृतीयांश संख्याबळाचा आकडा पोहोचला आहे. कालपासून 8 आमदार शिंदेंच्या गटात सहभागी झाले आहेत. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर शिंदे समर्थकांच्या…
मेष राशी: मेष राशीचे लोक आज जे काही विचार करतील त्यात यश मिळू शकते. भाग्यवृद्धीमुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. भागीदारीपासून दूर रहा. अधिकार्यांशी वाद टाळल्यास व्यावसायिक क्षेत्रात चांगली प्रगती करू शकाल. मनातील बोलल्याने संदिग्धता दूर होईल. घरातील लोक तुम्हाला खूप प्रेम देतील. आज ८६% नशिबाची साथ आहे. पिवळ्या वस्तू दान करा. वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांच्या मनात नवा उत्साह असेल. आज तुम्हाला काही चांगल्या संधी मिळतील. नवीन करार करण्यापूर्वी त्यांची कायदेशीर बाजू विचारात घ्या. अधिकारी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवू शकतात. आज तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल आणि पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. घरामध्ये बदल होण्याची शक्यता आहे, नवीन…