गुवाहाटी : वृत्तसंस्था शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असून आज गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत सरकार स्थापनेबाततच्या पुढील रणनिती आखण्यात येतील, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना शिंदे यांनी ही दावा केला आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे देखील गुवाहाटीला पोहोचले असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, अद्याप भास्कर जाधव यांच्याशी संपर्क झाला नसल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच, सध्या आम्हाला ५० आमदारांचा पाठिंबा असून त्यात ४०पेक्षा अधिक आमदार शिवसेनेचे आहेत. तर, इतर अपक्ष आमदार आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज आमची बैठक…
Author: Saimat
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी विविध गुन्ह्यातील वारंट मधील सहा आरोपींना गुरुवारी भल्या पहाटे झोपेतुनच उठवून अटक करण्याची कारवाई सोयगाव पोलिसांनी केली आहे.विविध गुन्ह्यातील पाच वारंट मधील सहा आरोपींना अटक करून सोयगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्यातील एकाची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जरंडी,निंबायती आणि माळेगाव,पिंप्री या चार गावातील विविध गुन्ह्यातील वारंट मधील सहा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात सोयगाव पोलिसांना यश आले असून त्यापैकी एकाला हर्सूलला रवानगी करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश पंडित,जमादार राजू बर्डे,ज्ञानेश्वर सरताळे,रवींद्र तायडे,गणेश रोकडे,महिला शिपाई भाग्यश्री चव्हाण आदींच्या पथकाने हि धडक कारवाई केली आहे. बनोटी चोरी प्रकरणी तिघांची…
यावल : प्रतिनिधी तालुक्यात नावरे गावात काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसात एका महिलेच्या अंगावर वीज कोसळून तिचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की नावरे ग्रामपंचायत महिला सदस्य रेखा ताई मेढे हिची बहिण रीनाबाई सुनील मेढे वय 39 हीच्या अंगावर आज दुपारी वादळी पाऊस सुरू असताना अचानक वीज कोसळली असता तिला तात्काळ यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात आले,या घटनेमुळे संपूर्ण नावरे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मेष राशी: मेष राशीचे लोक या दिवशी कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील. तुमचे काम चांगले होईल. पैसा असेल, पण अचानक खर्चही होईल. आज तुम्ही हुशारीने काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देणार नाही, परंतु त्यांचा पराभव करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब तुमची साथ देईल, पण निष्काळजीपणा टाळा, थोडीशी चूकही नुकसान करू शकते. तुमच्या कृती योजना काळजीपूर्वक तयार करा. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे, आई-वडिलांचा स्नेह लाभेल, मुलांचा आनंद मिळेल. कामात धनलाभ होईल. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :- शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यागटात किती आमदार सहभागी आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र आता शिंदे यांनीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली. या शक्तीप्रदर्शनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. यामध्ये एकूण ४२ आमदार दिसत असून त्यामध्ये ३५ आमदार शिवसेनेचे आहेत. गुवाहाटीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिंदेंसह सर्व बंडखोर आमदार थांबले आहेत. आज दुपारी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदारांचे फोटोसेशन झाले. तसेच याचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. हे सर्व आमदार शिवसेनेचा जयजयकार करत असल्याचे दिसतात. तसेच बाळासाहेब ठाकरे , आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे…
साईमत लाईव्ह मुंबई : प्रतिनिधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उस्मानाबादमधील आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली.संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दोन वेगळ्या भूमिका मांडल्या.सुरुवातीला संजय राऊत यांनी हा संघर्ष पोहोचल्यास महाविकास आघाडी सरकार विश्वास दर्शक ठरावात विजयी होईल, असे नमूद केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षावर पुन्हा परतील हा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी संजय राऊत यांनी गुवाहाटीमधील आमदारांना एक आवाहन केले. मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंसमोर प्रस्ताव मांडा, शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे नसले तरी शिवसैनिक ठाण मांडून बसला आहे कारण, आपल्या सगळ्यांना उद्धव ठाकरे इथं येतील…
टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन किंवा अन् कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट खरेदी करायचा प्लान असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेल जून 2022 आजपासून सुरू झाला आहे. हा सेल २७ जून पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि एसीसह अनेक प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. ५ दिवस चालणाऱ्या या सेल सोबत SBI क्रेडिट कार्ड आणि ईएमआय खरेदीवर १५०० रुपयांपर्यंत १० टक्के सूट मिळत आहे. आम्ही तुमच्या सुविधेसाठी टीव्ही, फ्रिज, एसीसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स वर मिळणारी सर्वात बेस्ट डिल्स संबंधीची लिस्ट तयार केली आहे. तुम्हाला जर टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशीन किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्त खरेदी…
साईमत लाइव्ह जळगाव प्रतिनिधी आंतराष्ट्रीय मानवअधिकार परिषद महाराष्ट्र राज्याच्या युवा विभाग अध्यक्षपदी सुरज विजय नारखेडे यांची निवड करण्यात आली आहे. हि निवड राष्ट्रीय युवा विभागाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबई येथे मुख्य कार्यालयात करण्यात आली. यावेळी संदर्भीय राष्ट्रीय कार्यकारणी कमिटीच्या सर्व सदस्य तथा कार्यकारणी सचिव यांच्या उपस्थितीत सर्वानुमते त्यांची आंतराष्ट्रीय मानव अधिकार परिषदेेच्या महाराष्ट्र राज्याच्या युवा विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली. डॉ.सनी लक्ष्मीचंद शहा यांच्या सूचनेनुसार या परिषदेच्या राष्ट्रीय बोर्ड कार्यकारणी कमिटीने सर्वानुमते ठराव करीत आंतराष्ट्रीय मानव अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य युवा विभाग अध्यक्षपदी सुरज नारखेडे यांची झाल्याचे पत्रकान्वये घोषीत केले. कार्यकारणी बोर्डने हा ठराव तर पारित केला. तसेच सुरज नारखेडे यांचा…
SaimatLive/ मुंबई प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला मार्च २०२४ पर्यंत नळ जोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर प्रतिदिन, गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या ३७ हजार २२७ कोटी रुपयांच्या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी लागणारा निधी केंद्र व राज्य शासनाकडून ५०-५० या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत सन २०२४ पर्यंत जल जीवन मिशन कार्यक्रमासाठी एकूण रु. ३७,२२७.५० कोटीचा आराखडा मंजूर केला आहे. या अंतर्गत राज्यात ३७,९९३ नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असून त्यानुसार ग्रामीण भागातील एकूण १,४६,०८,५३२…
साईमत लाइव्ह मुंबई प्रतिनिधी : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सत्ताच नाही तर शिवसेना आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्य बाणही काढून घेण्याची तयारी करत आहेत. गुवाहाटीमधून शिंदे यांनी कायदे तज्ज्ञांशी चर्चा सुरु केली आहे. यामुळे शिंदे ही आपल्याकडे असलेली खरी शिवसेना आहे, असा दावा करत आहेत. त्याचबरोबर आपल्याला शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह आपल्याला दिले जावे अशी मागणी करणार आहेत. यामुळे ठाकरे यांच्याकडून शिवसेना आणि निवडणूक चिन्ह देखील जाण्याची शक्यता आहे. कायदे तज्ज्ञ श्रीहरी अणे यांनी एका वृत्त वाहिनीला याबाबतची माहिती दिली. ही कायदेशीर प्रक्रिया आहे, शिंदे यांनी म्हटले म्हणून निवडणूक आयोग लगेच घोषणा करणार नाही. काही कायदेशीर प्रक्रिया आहे, त्यानंतरच…