Author: Saimat

मुंबई : प्रतिनिधी  शिवसेनेच्या  आमदारांनंतर आता शिवसेनेतील खासदारही भाजपासोबत (BJP) सरकार बनवण्यासाठी आग्रही असल्याची माहिती पुढे आली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसला सोडा आणि भाजपसोबत चला असा सूर शिवसेना खासदारांनी शिवसेनेच्या बैठीकीत आवळला असून, त्याबाबतचा निरोप पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. विरोधकांना नाकीनऊ आणण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारकडून सातत्याने ईडी यासारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका सातत्याने होत आहे. एकीकडे भाजपाच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी होत नसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यातील राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या विविध नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणा ईडीच्या नोटीस येत आहेत. त्यांना सतावण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकारकडून होत आहे. याला कंटाळूनच आता शिवसेनेच्या काही आमदारांनी…

Read More

जामनेर : प्रतिनिधी गणपती नगर जामनेर येथे दैनिक योग वर्गात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग शिक्षिका : सौ. पुष्पा अग्रवाल, सौ.अंजु पवार, सौ.माधुरी लखोटे यांनी प्राणायाम व आसनांमधून “निरोगि शरीर हाच खरा दागिना” हा संदेश दिला. त्यावेडी राष्ट्रसेविका समितिच्या जामनेर तालुका अध्यक्षा सौ.आरती देशपांडे यांचे सौ.अंजु पवार यांनी आयुर्वेदिक गुळवेल वनस्पतीचे रोपटे देऊन स्वागत केले.त्यावेडी सौ.छाया पाटील, सौ.अरुणा रोनखेडे, सौ.सुरेखा वाघ, सौ.रेखा पाटील तसेच आनंदी महिला बचत गट व गणपती नगर येथील महिला उपस्थित होत्या. आयोजक: सौ.अंजू पुखराज पवार. कोणत्याही दोन चांगल्या व परस्पर पूरक गोष्टी एकत्र येणे याला योग म्हणतात. व्याधीमुक्त शरीर व नियंत्रीत मन यांचा…

Read More

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक आमदारांसोबत बंड पुकारला आहे. शिवसेनेने या बंडाच्या विरोधात कठोर पाऊले उचलत बंडखोर आमदारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे बंड पुकारलेले आमदर वर्षा बंगल्यावर संध्याकाळपर्यंत पोहोचणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी आमदारांना सूचना जारी करण्यात आल्या आहे . सध्या सुरु असलेल्या घडामोडी पाहता शिवसेनेकडून हा व्हिप जारी करण्यात आला आहे.पक्षांतर घडवून सरकार पडण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एका प्रौढ व्यक्तीला अज्ञात चार जणांनी बेदम मारहाण व शिवीगाळ केल्याचा प्रकार शहरातील स्वातंत्र्य चौक येथे घडला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील स्वातंत्र्य चौक येथे धनराज रामकृष्ण वाघ (वय-५५) रा. कंकराळा ता. सोयगाव जि.औरंगाबाद हे कामाच्या निमित्ताने सोमवारी २० जून रोजी जळगावात आले होते. दुपारी ४ वाजता शहरातील स्वातंत्र्य चौक येथे औरंगाबादकडे जाण्यासाठी वाहनाची वाट बघत होते. एका महिलेला त्यांनी मावशी म्हटल्याचा रागातून बाजूला उभी असलेली एका चार चाकी वाहनामध्ये बसलेल्या अज्ञात चार जणांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. दरम्यान धनंजय धनराज वाघ यांनी…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी बंड केलं. शिवसेनेसोबत अपक्ष आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे रातोरात सूरतमध्ये पोहोचले. तिथून मग आसामला पोहचले. अशातच महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने जात असल्याचे सूचक ट्वीट शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी  केले. या सगळ्यात घडामोडींचा मास्टरमाईंड कोण होता? एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे उद्धव ठाकरेच  होते का? काँग्रेस राष्ट्रवादीला चेकमेट करण्याचा हा डाव उद्धव ठाकरेंनी आखला होता का? अशी शंकाही आता उपस्थित केली जात आहे. आणि ही शंका उपस्थित होण्यासाठी अनेक कारणे आहेत. ही बातमी पण वाचा :  एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४६आमदार आहेत, तसंच ही संख्या ५० पर्यंत जाईल, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.…

Read More

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सध्याच्या घडीला शिंदे यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारला मोठा धोका निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. नवी मुंबईतील शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. यातच शिवसेनेचे फायर ब्रँड नेते नितिन नांदगावकर यांनी देखील या घडामोडीवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. गद्दारांना सोडणार नाही. माझे काम ठोकायचे आहे. याआधी समाजकंटकांना ठोकून काढत होतो. मात्र, आता मला असे वाटतेय की गद्दारांना चोपायची वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसेना भवनाबाहेर…

Read More

मुंबई प्रतिनिधी  यास्मिन शेख  शिवसेनेतील बंड नवीन नसले तरी शिवसेनेतील बंडाने आघाडी सरकार ला अडचणीत आले आहे. सरकार अल्पमतात आले आहे .  त्यामुळे आज काय काय घडते या कडे लक्ष लागले आहे . यातच आदित्य ठाकरे यांनी आपल्या प्रोफाइल वरून मंत्री पद हटवले आहे तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जातंय . शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे. दरम्यान, सुरतमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर एकनाथ शिंदे भल्या पहाटेच 33 आमदारांना घेऊन गुवाहाटीला तळ ठोकून आहे. एकनाथ शिंदे यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यात गेल्या दोन दिवसापासून राजकीय वातावरण एकनाथ शिंदे यांनी तापवून ठाकरे सरकारला गॅसवर ठेवले होते तर आज खान्देशची मुलुख मैदान तोफ जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज नॉट रिचेबल झाले असून त्यांनी आपल्या समर्थकांना जय महाराष्ट्र असा मेसेज केल्याचे समजते. ना.गुलाबराव पाटलांसोबत असलेले मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील हे देखील आज नॉट रिचेबल झाले आहेत. दोन्ही नेते गुवाहाटीच्या दिशेने निघाल्याचे सांगण्यात येत आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याचे वृत्त माध्यमातून झळकत होते. नगरविकास खात्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या कामात होत असलेल्या ढवळाढवळला ते कंटाळले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी याबाबत बोलून दाखविले…

Read More

मुंबई : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या शक्तीशाली प्रदर्शनापुढे आणि त्यांना असलेल्या आमदारांच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर काहीही पर्याय उरलेला नाहीय. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे आता लक्ष ठेवून राहायचं, असं मुख्यमंत्र्यांचं ठरलेलं असतानाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं प्लॅन फोडणारं ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरु आहे, असं ट्विट राऊतांनी केलं आहे. म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याचे संकेतच संजय राऊतांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळच बरखास्त होईल. https://twitter.com/rautsanjay61/status/1539490296412643328?s=20&t=Uc6Oag3A-vXS_ybuTtQfUQ आदित्य ठाकरेंनी ट्विटर बायोमधून मंत्रिपद हटवलं एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खिळखिळी केल्यानंतर ठाकरे सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं.…

Read More