जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील गोद्री येथे मध्यरात्री घरात दरोडा टाकून वृद्ध महिलेचा गळा दाबून खून करून तिच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की जामनेर तालुक्यातील गोद्री येथील मानबा बाई सरदार तडवी वय 85 घ्या 21 जून रोजी सायंकाळी जेवण करून आपल्या घरात झोपल्या असताना मध्यरात्रीच्या सुमारास संशयित आरोपी बब्बु सांडू तडवी राहणार भारुडखेडा तालुका जामनेर वय 27 यांनी वृध्द महिलेचा गळा दाबून खून केला आहे अंगावरील सोन्याच्या बाळ्या व चांदीच्या पाटल्या असा एकूण बत्तीस हजार सहाशे रुपयांचा किमतीचा मुद्देमाल बळजबरीने काढून चोरून नेला आहे.…
Author: Saimat
गुवाहाटी: ठाकरे सरकारविरोधात एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसोबत बंड पुकारल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे सुरुवातीला सूरत आणि नंतर थेट गुवाहाटीत दाखल झाल्याने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी संवाद साधने कठीण झाले आहे. यात शिंदेंना आर्त हाक देण्यासाठी साताऱ्यातील काही शिवसैनिक गुवाहाटीत जाऊन पोहोचले. या शिवसैनिकांपैकी संजय भोसले यांनी हॉटेल रॅडिसनबाहेर जोरदार घोषणबाजी केली. यावेळी आसाम पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.आता भोसले यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भोसले यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत परतरण्याचे आवाहन केले.शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत यावे,असे आवाहन त्यांनी केले आहे. शिंदे यांनी शिवसेनेत यावे, हे सांगायला मी इकडे आलो…
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या विरोधात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसोबत बंड पुकारले आहे. शिंदे यांनी आपल्याकडे ४० ते ५० आमदार असल्याचा दावा केल्याने ठाकरे सरकारमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांना इतक्या आमदारांचे समर्थन कसं मिळाले? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. मुख्यमंत्र्यांना या संकटातून काढण्यासाठी तसेच सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड हातळण्यासाठी पवार ठाकरेंसोबत रणनीती आखात आहे. गेल्या एक तासांपासून पवारांची संजय राऊत अनिल देसाईसोबत बैठक सुरु आहे. काल…
साईमत लाईव्ह पुणे प्रतिनिधी : शिवसेनचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. याचे पडसाद देश – विदेशातही उमटत आहेत. नेटीजन्स याबाबत सर्च करत आहेत. जगातील ३३ देशात एकनाथ शिंदे टॉपवर(Google search) आहेत तर देशात ठाकरे, फडणवीस, पवारांनापेक्षाही जास्त नेटीजन्स शिंदेच्या माहितीसाठी सर्च करत आहेत.शिवसेना आता काय करणार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे आव्हान कसे पेलणार याची उत्सुकता लोकांना आहे. हा सामना कोण जिंकणार, याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे. शिंदेबाबत देशातच नव्हे तर पाकिस्तान, सौदी या देशांमध्येही उत्सुकता आहे. तीन दिवसापासून गुगुलवर (Google Trend) ‘एकनाथ शिंदे’ सर्च केले जात आहे. एकनाथ शिंदेंविषयी अधिक माहिती…
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनीधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.पी. आर्टस् , एस.एम.ए. सायन्स अँड के.के.सी.कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज चाळीसगाव येथे बारावी बोर्डाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंताचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या मैनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल हे होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. विनोद कोतकर, ज्येष्ठ संचालक क. मा. राजपूत, अॅड. प्रदीप अहिरराव, सुरेश स्वार, डॉ. सुनील राजपूत यांची उपस्थिती होती. बारावी बोर्डाच्या परीक्षेत महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम सी व्ही सी या शाखांमधून गुणांनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय आलेल्या गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या संचालकांच्या हस्ते करण्यात आला. कला शाखेतून प्राची…
मुंबई : प्रतिनिधी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. शिंदे यांनी ५० हून अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केल्याने ठाकरे सरकार धोक्यात आले आहे. शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आता शिवसेनेच्या चिन्हावरच हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आता पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी धडपड सुरु केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेतील नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख तसेच जिल्हा संपर्क प्रमुखांच्या बैठका बोलावल्या आहेत. आज दिवसभर या बैठका होणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय होणार हे…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी शिवसेनेचे (Shivsena)बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी ३७ आमदारांचा पाठिंबा मिळवल्यानंतर त्यांच्याकडे पक्षातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याने त्यांच्यावर पक्षांतरविरोधी कायदा लागू होणार नाही. आता त्यांना पक्षातील खासदारांचाही पाठिंबा मिळू लागला आहे.१७ खासदार आणि ४०० आजी-माजी नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. मुबिश अनेक ठिकाणचे कार्यकर्तेही शिंदेंच्या गटात जाण्याच्या तयारीत असल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपासोबत युती करा, शिवसेना खासदारांची मागणी वाशीमच्या खासदार भावना गवळी(Bhavna Gawali) या शिंदेंना पाठिंबा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच गवळी यांनी शिवसेनेला भाजपशी युती करण्याचा सल्ला दिला होता. २२ जून रोजी मुख्यमंत्र्यांना…
रत्नागिरी : खेड-दापोली चे आमदार योगेश कदम शिंदे गटात सामील झाल्यानंतर कोकणातल्या मनसेने शिवसेनेला पाठींबा देत बॅनरच्या माध्यमातून सूचक संदेश दिला आहे. ‘कोकणची भूमी निष्ठावंतांची, ठाकरे बँड वाचवा गद्दारांना ठोका, असे या बॅनरमध्ये लिहिण्यात आले आहे. रत्नागिरी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी हे बॅनर लावले आहे. महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आता उघडउघड ठाकरे सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. आपल्या जवळ ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा ते वारंवार करत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार धोक्यात आले आहे. सध्या एकनाथ शिंदे गुवाहाटीतील रेडिसन हॉटेलमध्ये शिवसनेच्या नेत्यांना घेऊन थांबले आहे.
मालेगाव : प्रतिनिधी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे हे देखील काल रात्री गुवाहाटी येथे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात पोचलेत. आता या बंडाबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. यातली एक चर्चा अशी की बंडानंतर, ठाकरे गटात काय हालचाली सुरू आहेत, याची माहिती घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच भुसे यांना मागे ठेवले होते. पक्षांतरविरोधी कायदा लागू न होण्याइतके, शिवसेनेचे दोन तृतीयांश (३७) आमदार शिंदे यांच्या गटात आल्यानंतर, काल रात्री भुसे शिंदे यांच्या गटात पोहचले आहेत. त्याआधी तीन दिवस ते सतत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रत्येक बैठकीत सहभागी झाले. आदित्य ठाकरे सारथ्य करत असलेल्या गाडीतून हॉटेलकडे जातांनाही ते सोबत होते. यानंतर भुसे…