Author: Saimat

शिवसेनेत बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच आता भाजपने  शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडल्याने अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडे सरकार टीकवण्यासाठी पुरेसं संख्याबळ नाही. त्यात आता एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वाचं आहे. भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्रिपद, केंद्रात २ मंत्रिपद देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सहा मंत्रिपद असलेल्या शिंदे गटाल एकूण मंत्रिमंडळाच्या २५ टक्के हिस्सा देण्याची ऑफर भाजपकडून असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटात काही आमदार सहभागी झाले आहेत.…

Read More

ईडीच्या भीतीने पक्ष सोडून दोन-चार लोक म्हणजे शिवसेना पक्ष नव्हे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही आमदाराला थांबण्याचे आवाहन केलेले नाही. पण मी एवढंच सांगतो की, या आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावेच, असे जाहीर आव्हान शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना दिले. जो कुठल्या तणावाखाली येऊन पक्ष सोडतो तो बाळासाहेबांचा भक्त नसू शकतो, आम्ही आहोत, आमच्यावरही मोठा दबाव, गेल्या ४ दिवसांपासून एक मंत्री सतत ईडीच्या कार्यालयात जात आहे, त्याने पक्ष नाही सोडला, मी आणि माझ्या कुटुंबावर ईडीचा दबाव, आम्ही आजही ठाकरे कुटुंब आणि पक्षासोबत राहू, अखेरच्या श्वासापर्यंत राहू, असे संजय राऊत यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत…

Read More

खानदेशातील शिवसेनेचा ढाणा वाघ म्हणून ओळख असलेले मंत्री गुलाबराव पाटील  यांनी आज शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे  यांची साथ सोडली. पाटील यांनी आज थेट गुवाहटीमध्ये पोहचून एकनाथ शिंदे यांना चरणस्पर्श करून नमस्कार केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी बोलताना पाटील यांनी उद्या आणखी शिवसेनेचे आमदार गुवाहटीममध्ये पोहचणार असल्याचा दावा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज सकाळीच गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आपण गुवाहटी येथे निघोलो असल्याची घोषणा केली होती. माझ्या रक्तात शिवसेना आहे, आम्ही शिवसेना म्हणूनच राहणार आहोत. पक्ष बदलणार नाही, मी गुवाहटीला चाललो आहे. राज्यातील बहुतेक मंत्री नेते गेले. जिल्यातील तीन जणही गेले मी एकटा काय करू? असे स्पष्ट…

Read More

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजकीय खळबळ माजली आहे. खुर्ची आणि पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील असले तरी त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. मिळालेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतरही पक्षातील आणखी काही आमदार बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचले आहे. त्याचवेळी या सात बंडखोरांसह 2 अपक्ष आमदारही गुवाहाटीमध्ये पोहोचल्याचे वृत्त आहे. गुवाहाटीत रेडिसन हॉटेलमध्ये शिवसेने बंडखोर एकनाथ शिंदे आणि समर्थकांची खलबते सुरुच आहेत. शिंदेंच्या गटात शिवसेनेचे 38 आमदार, 7 अपक्ष आमदार असे एकूण 45 आमदार शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत. शिंदे गटाकडे दोन तृतीयांश संख्याबळाचा आकडा पोहोचला आहे. कालपासून 8 आमदार शिंदेंच्या गटात सहभागी झाले आहेत. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर शिंदे समर्थकांच्या…

Read More

मेष राशी: मेष राशीचे लोक आज जे काही विचार करतील त्यात यश मिळू शकते. भाग्यवृद्धीमुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. भागीदारीपासून दूर रहा. अधिकार्‍यांशी वाद टाळल्यास व्यावसायिक क्षेत्रात चांगली प्रगती करू शकाल. मनातील बोलल्याने संदिग्धता दूर होईल. घरातील लोक तुम्हाला खूप प्रेम देतील. आज ८६% नशिबाची साथ आहे. पिवळ्या वस्तू दान करा. ​वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांच्या मनात नवा उत्साह असेल. आज तुम्हाला काही चांगल्या संधी मिळतील. नवीन करार करण्यापूर्वी त्यांची कायदेशीर बाजू विचारात घ्या. अधिकारी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवू शकतात. आज तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल आणि पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. घरामध्ये बदल होण्याची शक्यता आहे, नवीन…

Read More

मुंबई: शिवसेना ही संघटना संकटांच्या छातीवर पाय ठेऊन उभी राहिली आहे. जय-पराजय पचवले. सत्ता असली काय आणि गेली काय, शिवसेनेसारख्या संघटनेला फरक पडत नाही. फरक पडणार आहे तो भाजपच्या प्रलोभनांना व दबावास बळी पडलेल्या आमदारांना. शिवसैनिकांनी ठरवले तर हे सगळेच लोक कायमचे ‘माजी’ होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा, असा इशारा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखातून देण्यात आला आहे. आसामात गेलेल्या लोकांना आमदार-नामदार होता आले. हे सर्व आमदार पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले तर जनता त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. याचे भान या मंडळींना नसेलच असे नाही. त्यामुळे हे शिवसेनेचे आमदार व नामदार पुन्हा…

Read More

सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगावसह परिसरात बुधवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसाने सोयगाव आणि जरंडी मंडळात जोरदार मुसंडी मारली आहे तर रावेरी शिवारात शेतात काम करणाऱ्या युवा शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याने या घटनेत युवा शेतकरी गंभीररित्या भाजला असून दुसऱ्या अन्य घटनेत कंकराळा शिवारात वीज कोसळून झाडाखाली बांधलेल्या गायीचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे सोयगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोयगाव परिसरात बुधवारी जोरदार विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली यामध्ये रावेरी शिवारात गट क्रमांक-एक मध्ये शेतात काम करणाऱ्या संजय राजाराम मोरे(वय २४ रा.जरंडी) याच्या अंगावर वीज कोसळल्याने तो गंभीररित्या भाजला असून त्याच्या डोक्यावरील केस यामध्ये जळलेल्या अवस्थेत असून त्याच्या हाताला जोरदार गंभीररीत्या दुखापत झाल्याची…

Read More

मुंबई प्रतिनिधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असून, एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास ४० हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. https://twitter.com/MeNarayanRane/status/1539509722360840193?s=20&t=GkfvzDQxWWutGozifMG60g शिवसेनेला सत्तेतून खाली खेचल्याचा आनंद संजय राऊत यांना झाला असेल, अशा शब्दांत नारायण राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. “संजय राऊत खूश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका भागात राहणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मंगळवार २१ जून रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात ७ वर्षीय चिमुकली ही आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तव्याला आहे. मंगळवारी २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी दामोदर पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) याने पीडित मुलीला किराणा दुकानावर बोलून तिचा लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत अश्लिल चाळे केले. दरम्यान हा प्रकार पीडित मुलीने घराच्यांना सांगितला. मुलीच्या आईसह नातेवाईकांनी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी देशात नावलौकिक प्राप्त केलेली भोरगाव लेवा पंचायत ही लेवा पाटीदार समाजाची अग्रणी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून अव्याहतपणे समाज हिताचे कार्य सुरू आहे. संस्थेचे कुटुंबनायक हे पद वंशपरंपरेने पाडळसा येथील पाटील घराण्याकडे असून उर्वरीत कार्यकारिणी ही समाजबांधवांना विश्‍वासात घेऊन गठीत केली जाते. सदर कार्यकारिणीवर कुलसचिवपदी 2016 मध्ये ॲड संजय राणे यांची नियुक्ती केली होती. मात्र त्यांच्या कामकाजाची कार्यपध्दत चुकीची असल्याची समाजबांधवांच्या लक्षात आले. ज्या पध्दतीने पारदर्शी काम व्हायला पाहिजे होते ते न होता समाजास वेठीस धरण्याचे काम होत असल्याचे ज्यावेळी सुज्ञ समाजबांधवांना दिसू लागले त्यावेळी त्यांनी सदर बाब कुटुंबनायक रमेशदादा विठू पाटील यांच्या निदर्शनास आणून…

Read More