साईमत लाईव्ह मुंबई : प्रतिनिधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उस्मानाबादमधील आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली.संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दोन वेगळ्या भूमिका मांडल्या.सुरुवातीला संजय राऊत यांनी हा संघर्ष पोहोचल्यास महाविकास आघाडी सरकार विश्वास दर्शक ठरावात विजयी होईल, असे नमूद केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षावर पुन्हा परतील हा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी संजय राऊत यांनी गुवाहाटीमधील आमदारांना एक आवाहन केले. मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंसमोर प्रस्ताव मांडा, शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे नसले तरी शिवसैनिक ठाण मांडून बसला आहे कारण, आपल्या सगळ्यांना उद्धव ठाकरे इथं येतील…
Author: Saimat
टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन किंवा अन् कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट खरेदी करायचा प्लान असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेल जून 2022 आजपासून सुरू झाला आहे. हा सेल २७ जून पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि एसीसह अनेक प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. ५ दिवस चालणाऱ्या या सेल सोबत SBI क्रेडिट कार्ड आणि ईएमआय खरेदीवर १५०० रुपयांपर्यंत १० टक्के सूट मिळत आहे. आम्ही तुमच्या सुविधेसाठी टीव्ही, फ्रिज, एसीसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स वर मिळणारी सर्वात बेस्ट डिल्स संबंधीची लिस्ट तयार केली आहे. तुम्हाला जर टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशीन किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्त खरेदी…
साईमत लाइव्ह जळगाव प्रतिनिधी आंतराष्ट्रीय मानवअधिकार परिषद महाराष्ट्र राज्याच्या युवा विभाग अध्यक्षपदी सुरज विजय नारखेडे यांची निवड करण्यात आली आहे. हि निवड राष्ट्रीय युवा विभागाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबई येथे मुख्य कार्यालयात करण्यात आली. यावेळी संदर्भीय राष्ट्रीय कार्यकारणी कमिटीच्या सर्व सदस्य तथा कार्यकारणी सचिव यांच्या उपस्थितीत सर्वानुमते त्यांची आंतराष्ट्रीय मानव अधिकार परिषदेेच्या महाराष्ट्र राज्याच्या युवा विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली. डॉ.सनी लक्ष्मीचंद शहा यांच्या सूचनेनुसार या परिषदेच्या राष्ट्रीय बोर्ड कार्यकारणी कमिटीने सर्वानुमते ठराव करीत आंतराष्ट्रीय मानव अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य युवा विभाग अध्यक्षपदी सुरज नारखेडे यांची झाल्याचे पत्रकान्वये घोषीत केले. कार्यकारणी बोर्डने हा ठराव तर पारित केला. तसेच सुरज नारखेडे यांचा…
SaimatLive/ मुंबई प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला मार्च २०२४ पर्यंत नळ जोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर प्रतिदिन, गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या ३७ हजार २२७ कोटी रुपयांच्या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी लागणारा निधी केंद्र व राज्य शासनाकडून ५०-५० या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत सन २०२४ पर्यंत जल जीवन मिशन कार्यक्रमासाठी एकूण रु. ३७,२२७.५० कोटीचा आराखडा मंजूर केला आहे. या अंतर्गत राज्यात ३७,९९३ नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असून त्यानुसार ग्रामीण भागातील एकूण १,४६,०८,५३२…
साईमत लाइव्ह मुंबई प्रतिनिधी : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सत्ताच नाही तर शिवसेना आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्य बाणही काढून घेण्याची तयारी करत आहेत. गुवाहाटीमधून शिंदे यांनी कायदे तज्ज्ञांशी चर्चा सुरु केली आहे. यामुळे शिंदे ही आपल्याकडे असलेली खरी शिवसेना आहे, असा दावा करत आहेत. त्याचबरोबर आपल्याला शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह आपल्याला दिले जावे अशी मागणी करणार आहेत. यामुळे ठाकरे यांच्याकडून शिवसेना आणि निवडणूक चिन्ह देखील जाण्याची शक्यता आहे. कायदे तज्ज्ञ श्रीहरी अणे यांनी एका वृत्त वाहिनीला याबाबतची माहिती दिली. ही कायदेशीर प्रक्रिया आहे, शिंदे यांनी म्हटले म्हणून निवडणूक आयोग लगेच घोषणा करणार नाही. काही कायदेशीर प्रक्रिया आहे, त्यानंतरच…
पुणे ः प्रतिनिधी राज्यात राजकीय भुकंप आले असून, महाविकास आघाडी सरकार संकटामध्ये सापडली आहे. शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महाविकास आघाडी सरकार राहते की, पडते हा प्रश्न पडलाय आहे. दरम्यान, पुण्यात “मी पुन्हा येईल“ असे म्हणणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लागले आहेत. त्या पोस्टरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याचे साकडे विठ्ठलाला घालण्यात आले आहे. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लागले असून, त्यात फडणवीस मुख्यमंत्री होवो अशा मागणीचे पोस्टर लावण्यात आलेले आहे. भाजपच्या वतीने हे पोस्टर लावण्यात आले असून, त्यात लिहिले आहे की, “हे…
जळगाव ः प्रतिनिधी कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत जळगाव जिल्हा पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीने 20 सुवर्ण व 2 रजत पदक प्राप्त केले आहेत. भोपाळ येथे यूथ स्पोर्ट्स कराटे असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील 12 खेळाडू सहभागी झाले होते. खेळाडूंना प्रशिक्षक अश्विनी निकम, राजेंद्र जंजाळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच बेस्ट अकॅडमीच्या द्वितीय पुरस्काराने जळगाव संघाचा गौरव करण्यात आला. विजेत्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सहायक पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी गौरव केला. यावेळी पालकही उपस्थित होते. पदक प्राप्त खेळाडू असे उर्वशी बोरनारे, नेत्रा अहिरे, हर्षाली विरकर, कौस्तुभ जंजाळे, मयूर पाटील, स्वरूप पाटील, पूर्वेश विधाते, जान्हवी पाटील, वेदांत हिवराळे, अविनाश राठोड, राम जाधव,…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेलं आमदारांचं बंड काही थांबता थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भावनिक आवाहन केल्यानंतरही शिवसेनेला लागलेली गळती सुरूच आहे. एक एक करून आमदार गुवाहाटीला जाऊन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटत आहेत. सध्या शिंदे गटात शिवसेना आणि अपक्ष असे ४६ आमदार सहभागी झाले आहेत. आता पर्यंत शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेले ४१ आमदार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे १४ आमदार उरले आहेत. त्यामुळे शिवसेनेनेही आता आशा सोडली आहे. उद्धव ठाकरे काही वेळातच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. अशातच शिवसेनेने हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदारांना बंधनमुक्त केले आहे. तुम्हाला आपल्या मतदारसंघात…
जळगाव ः प्रतिनिधी गेल्या 60 तासात खूप मोठा राजकीय भूकंप राज्यात झाला आहे. त्याच पार्श्वभूमिवर शिवसेना पक्षपमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक एकत्र येवून शहरातील गोलाणी मार्केट पक्ष कार्यालयापासून ते टॉवर चौकापर्यंत समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती. यावेळी शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. शिवसेनेतील प्रत्येक नेत्यांनी बंडखोर शिंदेना स्वगृही परत येण्याची भावनिक साद घातली जात आहे. जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेनेचे नेते गुलाबराव वाघ, महानगराध्यक्ष शरद तायडे, महापौर जयश्रीताई महाजन, गजानन मालपुरे, सरिताताई माळी, शोभा चौधरी, नितीन सपके, नगरसेवक सचिन पाटील मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, मंगला बारी, शिवराज पाटील यांच्यासह…