Author: Saimat

जळगांव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथील नीळकंठेश्वर हायस्कुल येथे अमेरीकेतील प्रसिद्ध पॉलिमर शास्त्रज्ञ डॉ.अभिमन्यू ओंकार पाटील ( रा. बोरखेडा) यांच्या स्मरणार्थ इयत्ता पहिली ते दहावीतील 200 गरजू होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. शैक्षणिक साहित्यांपासून गरीब होतकरु विद्यार्थी वंचित राहू नये या उद्देशाने कृती फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमाला डॉ.श्रीमती अंजली पाटील यांचे आर्थिक सहाय्य लाभले. प्रसंगी, पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, पक्षिमित्र डी.टी.महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कृती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव जी.टी. महाजन, मुख्याध्यापक गोपाल पाटील यांचे हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. श्री मनोरे यांनी सुत्रसंचालन केले. विनोद पाटील, जयेश महाजन यांचे विशेष…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी न्यायालयात निकाल झाल्यानंतर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत निसटल्याने एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की, राजेश निकुंभ उर्फ दादू धोबी याच्यासह अन्य तीन आरोपींना काल शुक्रवार दिनांक २४ जून रोजी न्यायालयात पोलीस घेऊन गेले होते. यात पोलिस मुख्यालयात कार्यरत रमेश पंढरीनाथ सोनवणे, अनिल बद्रीनाथ पवार, राकेश बारकू काळे, भगवान आनंदराव सूर्यवंशी या चौघा पोलीस कर्मचार्‍यांनी आपल्या सोबत या चारही आरोपींना कोर्टात सादर करून नंतर ते पुन्हा जिल्हा कारागृहाकडे रवाना झाले. त्यांना शासकीय वाहन नसल्यामुळे ते बसने न्यायालयात आले होते. तसेच ते बस स्थानकाकडे निघाले. दरम्यान, बस स्थानकावर पोहोचल्यावर आरोपी दादू…

Read More

मुंबई :प्रतिनिधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आजचा चौथा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. एकनाथ शिंदे गट त्यांच्या मागण्यांवर ठाम आहे, तर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना मुंबईत येऊन बोलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या आवाहनला एकनाथ शिंदेंनी नाकारलं आहे. तसेच, कालपासून शिवसेनेतील आणखी काही आमदार शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांनाही आव्हान दिले. बाळासाहेबांचे लाडके अपत्य म्हणजे शिवसेना होती. आता बंडखोरांना निष्ठा काय असते ती दाखवावी लागेल. यापुढे बाळासाहेब आणि शिवसेनेचे…

Read More

मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसमोर आज मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेमधील विश्वासू नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर पक्षात ज्यांचे मोठे स्थान होते, त्या एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षासोबतच बंडखोरी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे जवळपास सर्वच आमदार सहभागी झाले आहे. शिवसेनेकडे आता अवघे दहा ते बारा आमदार शिल्लक आहेत. मुळात शिवसेनेचा उदय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाला होता. याच मुद्द्यावर पक्षाला प्रचंड जनाधार लाभला. पक्षाने राज्यातील सत्ता काबीज करण्यापर्यंत मजल मारली. मात्र याच मुद्द्यावरून आता पक्षात फूट पडली आहे. एकनाथ शिंदे हे आता पक्षावर दावा ठोकत आहेत. आमदारांनी साथ सोडल्यामुळे   हातबल झाले…

Read More

साईमत लाईव्ह भडगांव प्रतिनिधी  कजगाव ता भडगाव येथून जवळच असलेल्या लोन पिराचे येथील मूळ रहिवासी व सध्या व्यवसाया निमित्ताने उल्हासनगर येथे स्थायिक झालेले हबीब गुलाब पिंजारी व त्यांच्या पत्नी नवशाद हबीब पिंजारी हे दाम्पत्य हज यात्रेसाठी रवाना झाले आहेत मुस्लिम धर्मात अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी रवाना झाल्याबद्दल त्यांना नातेवाईक मित्रपरिवाकडून प्रत्यक्ष भेटून व फोन वरून शुभेच्या दिल्या जात आहेत तसेच त्यांच्यावर लोण सह कजगाव परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे हबीब पिंजारी हे कजगाव येथील व्यवसायिक शौकत पिंजारी यांचे लहान बंधू व पत्रकार अमीन पिंजारी यांचे काका आहेत.

Read More

जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील गोद्री येथे मध्यरात्री घरात दरोडा टाकून वृद्ध महिलेचा गळा दाबून खून करून तिच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की जामनेर तालुक्यातील गोद्री येथील मानबा बाई सरदार तडवी वय 85 घ्या 21 जून रोजी सायंकाळी जेवण करून आपल्या घरात झोपल्या असताना मध्यरात्रीच्या सुमारास संशयित आरोपी बब्बु सांडू तडवी राहणार भारुडखेडा तालुका जामनेर वय 27 यांनी वृध्द महिलेचा गळा दाबून खून केला आहे अंगावरील सोन्याच्या बाळ्या व चांदीच्या पाटल्या असा एकूण बत्तीस हजार सहाशे रुपयांचा किमतीचा मुद्देमाल बळजबरीने काढून चोरून नेला आहे.…

Read More

गुवाहाटी: ठाकरे सरकारविरोधात एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसोबत बंड पुकारल्यानंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे सुरुवातीला सूरत आणि नंतर थेट गुवाहाटीत दाखल झाल्याने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी संवाद साधने कठीण झाले आहे. यात शिंदेंना आर्त हाक देण्यासाठी साताऱ्यातील काही शिवसैनिक गुवाहाटीत जाऊन पोहोचले. या शिवसैनिकांपैकी संजय भोसले यांनी हॉटेल रॅडिसनबाहेर जोरदार घोषणबाजी केली. यावेळी आसाम पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.आता भोसले यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भोसले यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत परतरण्याचे आवाहन केले.शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत यावे,असे आवाहन त्यांनी केले आहे. शिंदे यांनी शिवसेनेत यावे, हे सांगायला मी इकडे आलो…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  महाविकास आघाडीच्या विरोधात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसोबत बंड पुकारले आहे. शिंदे यांनी आपल्याकडे ४० ते ५० आमदार असल्याचा दावा केल्याने ठाकरे सरकारमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांना इतक्या आमदारांचे समर्थन कसं मिळाले? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. मुख्यमंत्र्यांना या संकटातून काढण्यासाठी तसेच सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड हातळण्यासाठी पवार ठाकरेंसोबत रणनीती आखात आहे. गेल्या एक तासांपासून पवारांची संजय राऊत अनिल देसाईसोबत  बैठक सुरु आहे. काल…

Read More

साईमत लाईव्ह पुणे प्रतिनिधी : शिवसेनचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. याचे पडसाद देश – विदेशातही उमटत आहेत. नेटीजन्स याबाबत सर्च करत आहेत. जगातील ३३ देशात एकनाथ शिंदे टॉपवर(Google search) आहेत तर देशात ठाकरे, फडणवीस, पवारांनापेक्षाही जास्त नेटीजन्स शिंदेच्या माहितीसाठी सर्च करत आहेत.शिवसेना आता काय करणार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे आव्हान कसे पेलणार याची उत्सुकता लोकांना आहे. हा सामना कोण जिंकणार, याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे. शिंदेबाबत देशातच नव्हे तर पाकिस्तान, सौदी या देशांमध्येही उत्सुकता आहे. तीन दिवसापासून गुगुलवर (Google Trend) ‘एकनाथ शिंदे’ सर्च केले जात आहे. एकनाथ शिंदेंविषयी अधिक माहिती…

Read More