Author: Saimat

मुंबई : प्रतिनिधी  मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसैनिकांनी बंडखोर नेत्यांच्या कार्यालयावर हल्ले केले. त्यांचा निषेध केला. याला शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल शक्तिप्रदर्शन करून शिवसेनेचा निषेध केला. त्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला; शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी, शिंदेंच्या समर्थनात राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. मागील अडीच वर्षांपासून आपल्या संघटनेची राष्ट्रवादी पक्षाकडून गळचेपी चालली आहे. त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असे म्हस्के यांनी आपल्या ट्विट केले. https://twitter.com/nareshmhaske/status/1540748818043482112?s=20&t=MU_HifQObXUUMZXW7s_QlQ एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेना पक्षातील हा पहिलाच राजीनामा आहे. नरेश म्हस्के यांचा राजीनामा शिवसेनेसाठी पहिला मोठा धक्का आहे. ही घोषणा म्हस्के यांनी ट्वीटमध्ये…

Read More

मुंबई :- मुबंईत शिवसैनिक शिवसनेच्या बंडखोर नेत्यांच्या कार्यालयांवर हल्ले करत आहेत. आज सकाळी उल्हासनगर येथे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. श्रीकांत शिंदे  हे बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे  यांचे पुत्र आहेत. पुण्यातही बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या ३७ पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिले आहे. त्यामुळे शिंदें विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष निर्माण झाला आहे.

Read More

मुंबई : सध्या राज्यात शिवसेनेतील बंडखोरी हा विषय चर्चेत आहे. एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी याना याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणालेत की “महाराष्ट्र सरकारवरील संकट लवकरच दूर होईल,असे मला वाटते.” हे संकट आपण दूर कराल का, याच्या उत्तरात ते म्हणालेत की “आगे-आगे देखो होता है क्या! आजच्या समस्येत उद्याची उत्तरं लपलेली असतात. लवकरच सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळतील. आलेले ढग दूर होतील. अंधकार नष्ट होईल आणि सूर्य उगवेल.” गडकरी आणि उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिगत संबंध अतिशय घनिष्ट आहेत त्यामुळे ठाकरेंवर घोंगावणारे ढग दूर होतील का? असा प्रश्न त्यांना विचरण्यात आला. गडकरी म्हणालेत, वेयक्तीक संबंध, हे राजकीय…

Read More

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आतापर्यंत त्यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांना गळाला लावले आहे. तसेच शिवसेनेचे अनेक खासदारांनाही शिंदे यांनी फोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.मात्र शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. दरम्यान, खासदार भावना गवळी आणि श्रीकांत शिंदे सोडल्यास बाकी सर्व खासदार शिवसेनेसोबत असल्याची माहिती किर्तीकर यांनी दिली. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांनी पुन्हा एकदा संख्याबळावर केलेला दावा कितपत खरा आहे अशी चर्चा सध्या रंगली आहे. एकीकडे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट संख्याबळ पूर्ण करून सरकार स्थापनेच्या तयारीत असल्याची माहिती आहे. दरम्यान फोडाफोडीचे राजकारण करत…

Read More

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर आणि घरांवर शिवसैनिक धडत देत आहेत, कार्यालये फोडत आहेत, त्यांच्या फ्लेक्सला काळं फासत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय. आजपासून पुढील १५ दिवस म्हणजेच १० जुलैपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. कोणत्याही पक्षाने किंवा पक्षाच्या कार्यकर्त्याने कायदा हातात घेऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जमावबंदी लागू केल्यानंतर चार किंवा चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसैनिक पेटून उठले…

Read More

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप आलेला आहे. महाविकास आघाडी सरकार कुठल्याही क्षणी पडू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बंडखोर आमदार आपला स्वतंत्र गट स्थापन करणार, भाजपसोबत जाणार? असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाने आपल्या गटाच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती पुढे आहे. ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे या गटाचे नामकरण करण्यात आले आहे. बंडखोर आमदारांच्या बैठकीत खूप विचार करून हे नाव ठरवण्यात आल्याची माहिती पुढे आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायचे नाही, यावरही निर्णय झाला आहे. दरम्यान, पुढील काही तासांमध्ये या सगळ्या राजकीय नाट्यामागे भाजपचा सहभाग आहे की…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा पोलिस दलात स्व.अक्षय प्रकाश महाजन हे (क्युआरटी कंमाडो) कार्यरत होते. त्यांचा कोरोना काळात दुर्देवी मृत्यू ओढवला गेला. अशा या कोरोना योध्दाच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा पोलिस दलातर्फे नविन इमारतीत थंड पाण्याचा आर.ओ. तसेच शितशव पेटीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक प्रविण मुंडे यांच्याहस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी स्व.अक्षय महाजन यांच्या पत्नी रिना अक्षय महाजन, चि.रिदम अक्षय महाजन हे उपस्थित होते. तसेच यावेळी पोलिस उपअधिक्षक संदीप गावीत, राखीव पोलिस दलाचे पोलिस निरिक्षक संतोष सोनवणे, तसेच 2014 च्या बॅचचे अंमलदार उपस्थित होते.

Read More

मुंबई / गुवाहाटी : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाविकास आघाडी सरकार पडलं तरी भाजप सरकार स्थापन करणार नाही, अशी शक्यता आहे. तर शिंदे गटाला भाजपात घेऊन निवडणूक लढवणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरु आहे. राजकीय पेचप्रसंगावर दीड ते दोन तास मंथन झाले आहे. गुवाहाटीतील हॉटेलमधून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंना गटात शिवसेनेचे 38 आमदार आहेत. एकनाथ शिंदेंनी काल गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसन ब्लू मधून बाहेर पडत कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली. काल दुपारी साडेबाराच्या सुमारास एकनाथ शिंदे अचानक…

Read More

दिल्ली : पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर पुढील पाच वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी टाका, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या महिला नेत्या जया ठाकूर यांनी दाखल केली आहे. शिवसेनेचेनेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सत्तापेच निर्माण झालेला असताना या याचिकेला विशेष महत्त्व आले आहे. या याचिकेवर २९ जून रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे. सभागृहाचा सदस्य दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र ठरविण्यात आला असेल तर त्याला पुढील पाच वर्षासाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच मुद्द्यावर जानेवारी २०२१ मध्ये रिट याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांच्या रिट याचिकेवर…

Read More