Author: Saimat

मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने (SC) ११ जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहे. यावेळी त्यांच्यासोबत सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी सोबत आहे. फडणवीस दिल्लीतील वरीष्ठ नेते अमित शहांसह इतर नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेही दिल्लीच्या जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे हे आठवड्याभरापासून गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहे. मात्र कालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आजपासून भाजपमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. दिल्लीत भाजप वरिष्ठ नेत्यांसोबत तातडीची बैठक बोलावली…

Read More

   साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी शहरातील सारस्वत समाज बांधवांनी सामाजीक व शैक्षणीक उपक्रमांसाठी खुल्या भुखंडाची मागणी नगरपालीकेकडे केली असुन मुख्याधीकारी चंद्रकांत भोसले यांना सोमवारी निवेदन दिले. समाजाच्या शिष्टमंडळाने या बाबत आमदार गिरीश महाजन, नगराध्यक्ष साधना महाजन व उपनगराध्यक्ष प्रा शरद पाटील यांची भेट घेऊन मागणी केली असता त्यांनी अनुकुलता दर्शवीली आहे.  मुख्याधीकारी भोसले यांना निवेदन देतांना जगदीश शर्मा, राजु शर्मा, मोहन सारस्वत, कैलास शर्मा, महेंद्र शर्मा, निलेश शर्मा, जीतू शर्मा, एड.अनिल सारस्वत, मनोज शर्मा, अनिल शर्मा, रमेश शर्मा आदी उपस्थीत होते.

Read More

जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेतून खाली पडून ३६ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, “अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील दिनेश डोंगरे हा तरुण रेल्वेने प्रवास करीत होता. आज सोमवार, २७ जून रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास भादली ते भुसावळ स्टेशन दरम्यान, अपलाईनवरील खांबा क्रमांक ४३२/२८ दरम्यान, रेल्वेतून पडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्टेशनमास्टर यांनी नशिराबाद पोलिसांना देताच पोलीस कर्मचारी सुधीर विसपुते यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी जिल्हास्तरावरील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल येथे आहे आदिवासी विभागात कोट्यावधी रुपयांचा निधी येत असतो जिल्ह्यात 34 अनुदानित आश्रम शाळा आहेत.गेल्या दिवाळीत आदिवासी विभागातून शासकीय स्तरातून जवळच्या तालुक्यातील प्रतिनिधींना देण्यासाठी 2 लाख 40 हजार रुपये गोळा करण्यात आले होते. ही जमा झालेली रक्कम जिल्ह्यातील एका ठिकाणचे सर्व प्रतिनिधी माझ्या खिशात आहे असे सांगून एका प्रतिनिधीने कोणत्याही प्रतिनिधीला न सांगता आपल्या सहकारी प्रतिनिधीच्या नावावर 1 लाख 40 हजार रुपये घेतले आणि ते कोणालाही वाटप केले नाही ती संपूर्ण रक्कम त्या प्रतिनिधीने एकट्याने पचविली.ही सर्व वस्तुस्थिती इतर कोणत्याही प्रतिनिधींना माहिती नाही (आणि इतर प्रतिनिधींना दोन वर्षापूर्वी मिळालेल्या गिफ्ट…

Read More

धुळे : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे  यांनी अनेक आमदारांसोबत बंडखोरी करत शिवसेनेला मोठा धक्का दिला. त्यांच्या बंडखोरीत आमदार, मंत्र्यांसह धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार  जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, महानगरप्रमुख सतीश महाले हे देखील सामील झाले. यामुळे येथील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत `दे दणका` मोर्चा काढून त्यांचा निषेध केला. तसेच या बंडखोरीमागे भाजपचा  हात असल्याचा आरोप संतप्त शिवसैनिकांनी केला. या मोर्चादरम्यान ‘आले शंभर, गेले शंभर, उद्धव ठाकरे एक नंबर, अशा घोषणाही शिवसैनिकांनी केल्या आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ती मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चातून व्यक्त झाली. यात महिला शिवसैनिकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.…

Read More

मुंबई : गुवाहाटीतील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या बंडखोर गटातील १५ – १६ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा पर्यावरण मंत्री व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. पण ठाकरे गट हा दावा करत असला तरी प्रत्यक्षात हॉटेलमध्ये सर्व आमदार एकत्रितपणे मजेत राहत असल्याचे अनेक व्हिडीओ व छायाचित्र आले आहेत. https://twitter.com/ANI/status/1541474148412600320?s=20&t=3Iu-Ny5aZCigd2RA3LLlHg सोमवारी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, आमच्या संपर्कात नसलेल्या दुसऱ्या गटातील आमदार पळून गेलेले आहे. त्यांच्यामध्ये परत येण्याचे धाडस आणि नैतिकता नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रकृतीमुळे चोवीस तास काम करणे शक्य नव्हते, तरीही ते काम करत होते. त्या काळात हे षडयंत्र रचलं गेले. ज्यांना पुन्हा…

Read More

सोयगाव तालुका प्रतिनिधी जलसंधारण विभागाच्या पाझर तलावाच्या सांडव्यावरून शेतकऱ्यांचा शेतीसाठी रस्ता संबंधित ठेकेदाराने बंद करून पर्यायी धरणाच्या खालून करून दिलेला रस्ता हा चुकीच्या पद्धतीचा असल्याने चुकीच्या रस्त्यावरून शेतीची पेरणी केलेली आहे त्यामुळे संबंधित ठेकेदाराने जुना वापरता रस्ता बंद करून चुकीचा रस्ता दिल्याने शेतकऱ्यांची शेतीकडे जाण्यासाठी वापर बंद झालेला आहे त्यामुळे सोमवारी बहुलखेड्यातील संतप्त दोनशे शेतकऱ्यांनी पाझर तलावात जलसमाधीचा निर्णय घेतला होता.शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची कुणकुण लागताच महसूल विभागाने दखल घेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये मध्यस्थी करून आंदोलन एक दिवसासाठी स्थगित करण्याबाबत विनवणी केल्यावरून शेतकऱ्यांचा आंदोलनाचा झेंडा खाली उतरविला होता परंतु अद्यापही पाझर तलावाच्या घटनास्थळी संबंधित ठेकेदाराने भेट दिलेली नव्हती.त्यामुळे बहुलखेड्यात खळबळ उडाली होती.…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त येत आहे. करोनाची लागण झालेली असली तरी प्रकृती अतिशय ठणठणीत आहे. अजित पवार डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. तशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1541367049477410824?s=20&t=EwsLRrSMjrbrnB8k4_lppA “कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन” काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.

Read More

नवी दिल्ली : विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी सुरू केलेली अपात्रतेची कारवाई रोखण्यासाठी एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिवसेना आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद केला. उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल असताना त्यांना अपात्रतेची नोटीस देण्याचा अधिकार आहे काय?, असा सवाल उपस्थित करत उपाध्यक्षांनी पहिल्यांदा बहुमत सिद्ध करावं, नंतर त्यांना नोटीस देण्याचा अधिकार आहे, असं नीरज कौल म्हणाले. तर विधानसभा उपाध्यक्षांनी नोटीसीनंतर सदस्यांना उत्तर द्यायला १४ दिवसांचा वेळ द्यायला हवा होता, पण केवळ ४८ तास दिले गेले. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेली नोटीस रद्द करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ठाकरे सरकारमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. यासंदर्भात आज न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यात आता आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदे गट मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहे. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) फोन करुन सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. मनसेकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. परंतु आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अन्य काही नेत्यांची…

Read More