साईमत लाईव्ह पुणे प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्याचपाठोपाठ शिवसेनेतील ४० आमदार शिंदे गटात सामील झाले. आमदारांनंतर खासदार आणि पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांची हकालपट्टी केली. बंडखोरी आता युवासेनेतही पोहोचली आहे. अनेक तरुण कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना संघटनेतून काढून टाकले आहे. युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक आणि सहसचिव किरण साळी यांना आदित्य ठाकरे यांनी काढून टाकले आहे. पक्षाविरोधी कारवाई केल्याचा दावा करून या दोघांची युवासेनेतून हकालपट्टी केली आहे. युवासेनेचे पुण्यातील मोठे नेते म्हणून किरण साळी यांची…
Author: Saimat
साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथे दिनांक २१ पासून ते २८ रोजी पर्यंत अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहला सुरुवात होत आहे जीन परीसरातील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे सात दिवस चालणाऱ्या अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह चे आयोजन संत सावता महाराज माळी समाज मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे सकाळी ५ ते ६ काकडा आरती सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ व रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक २१ रोजी हरी भक्त पारायण कोमलसिंग महाराज सुरानेकर २२ रोजी हभप प्रमेश्वर महाराज गोडखेडेकर २३ रोजी हभप रवींद्र महाराज वरसाडेकर २४ रोजी हभप…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर काही आमदार शिंदे गटात सामील झाले आणि शिवसेनेत फूट पडली. आमदार फोडल्यानंतर शिंदेंनी खासदारांचाही गट फोडला. आमदारांपाठोपाठ १२ खासदारसुद्धा शिंदे गटात सामील झाले. एवढेच नाही तर या बंडखोर खासदारांचा वेगळा गटसुद्धा स्थापन झाला. या गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली. पण, आता शिवसेनेने या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) जाणार आहे. त्यामुळे कोर्टामध्ये शिवसेनेची आणखी एक याचिका दाखल होणार आहे. शिंदे गटाने शिवसेनेचे खासदार फोडल्यामुळे शिवसेनेमध्ये संताप निर्माण झाला आहे. शिंदे गट आणि भाजपच्या या खेळीवर शिवसेनेने आता न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. १३ जून रोजी शिवसेनेने…
साईमत लाईव्ह धानोरा ता. चोपडा प्रतिनिधी यावल तालुक्यातील चिंचोली गावापासून उत्तरेला सातपुड्याच्या पर्वतात असलेला मनुदेवी चा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतोय. सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सातपुड्याच्या परिसरात असलेले मनुदेवी मंदिरा जवळील पांढराशुभ्र धबधबा निखळपणे ओंसडून वाहत आहे तर हिरवळीने हा परिसर नटला असुन जनु निसर्गाने हिरवा शालु परिधान केलेला दिसुन येत आहे. दरम्यान, पर्यटकांची व भाविकांची मदीयाळी पाहता या परिसरात वावरतांना पर्यटकांनी हलगर्जीपणा करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. हा धबधबा सुरू झाला की जिल्ह्यासह महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून भाविक व पर्यटक मनुदेवी चा धबधबा पाहण्यासाठी येत असतात. शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणावर…
जळगाव : प्रतिनिधी दि जळगाव पीपल्स को-ऑप बँक उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य मल्टिस्टेट शेडयुल्ड बँक आहे. सदर सामाजिक उत्तरदायित्वाच्या हेतूने 30 वर्षांपासून अविरतपणे जळगाव परिसरातील निवडक शाळांमधील गरीब, हुशार व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संचाचे विनामुल्य वाटप करीत असते. यावर्षी सुद्धा जळगाव पब्लिक स्कुल, श्रीमती कुसुमताई मधुकरराव चौधरी विद्यालय फैजपुर, श्रवण विकास मंदीर सावखेडा, हरीजन कन्या छात्रालय जळगाव, काशिबाई ऊखाजी कोल्हे विद्यालय जळगाव, आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा, अभिमन महादु वारके महाविद्यालय विदगाव, दादासो दामु पांडु पाटील माध्यमिक विद्यालय सुनसगाव, न्यु इंग्लिश स्कुल नशिराबाद, जयहिंद विद्यालय कडगाव, सार्वजनिक विद्यालय असोदा, महात्मा गांधी विद्यालय भादली, जळगाव शहर महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र.48…
साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे १९ रोजी मंगळग्रह पिक विमा जनजागृती रथ तालुक्यातील ग्रामीण भागात पिक विमा बाबत जनजागृती करण्यासाठी मंदिरातून रवाना झाला आहे. १० दिवसांत तालुक्यातील १५४ गावांमध्ये हा रथ पीक विमा बाबत जनजागृती करणार आहे. संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले व तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी अजयसिंग पाटील यांनी रथाचे विधिवत पूजन केले. संस्थेचे खजिनदार गिरीश कुलकर्णी व कृषी विभागाचे दीपक चौधरी यांनी श्री मंगळदेव ग्रह मंदिराचा भगवा ध्वज दाखवून रथाला चालना दिली . रथाची काही अंतरापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संस्थेतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ तथा मार्गदर्शनार्थ अनेकविध कार्यक्रम राबविले जातात. हा उपक्रम त्याचाच एक…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल नगरपरिषद हद्दीत 90 टक्के भागात प्रमुख रस्त्यांवर आणि प्रभागातील ठिक ठिकाणच्या रस्त्यांवर नगरपरिषदेच्या चुकीच्या नियोजनामुळे ठिकठिकाणी अनधिकृत गतिरोधक तसेच खड्डे निर्माण झाले आहेत,यासह इतर अनेक मूलभूत नागरी समस्यांकडे जिल्हाधिकारी जळगाव नगरपरिषद विभाग,तसेच यावल नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावल शहरातून होत आहे,काही संघटनांचे सुद्धा लोकप्रतिनिधींशी असलेले हितसंबंध लक्षात घेता विरोधक आणि सत्ताधारी गटातील काही लोकप्रतिनिधी मूलभूत सुविधांसाठी आवाज उठवायला तयार नाही हे यावलकरांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. यावल शहरात विकसित भागात कोट्यावधी रुपये खर्चून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले त्यानंतर पाणीपुरवठा होण्यासाठी नवीन पाईपलाईन सुद्धा टाकण्यात आली परंतु ही पाईपलाईन टाकताना संबंधित ठेकेदाराने संबंधित यंत्रणेला…
यावल : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रत एसटी मंडळाने संप पुकारण्यात आले होते. तरी या संपकालीन काळात जे कत्राटी चालक यांची संपा मध्ये नियुक्ती करण्यात आली होती तरी या कत्राटी चालक यांच्चा ठेकेदारातर्फे व काही महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी कत्राटी चालकांचे पगार एस टी महामंडळाने २३९०० पगार इतका ठेकेदाराला दिले आहे , तरी तरी कत्राटी चालक हे आप आपल्या दिलेल्या जागेवर नियुक्ती करून कर्तव्यास करत आहे. तरी त्यांना वेळेवर पगार नाही ,व त्यांना रात्री मुक्काम याचे भत्ता नाही जे रापमचे कर्मचारी जे काम करत आहे तेच काम कत्राटी चालक करत आहे तरी या चालकांचे शोषण का करत आहे ,महामंडळाने नियुक्ती केलेली आहे. संस्था…
यावल : प्रतिनिधी बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर यावल बस स्टॅन्ड समोर गुरढोरा रांच्या कळपांमुळे खुद्द आरटीओच्या वाहनाला सुद्धा अडथळा निर्माण झाल्याने शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या निष्क्रिय कामकाजामुळे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाच म्हणजे आरटीओला सुद्धा महामार्गावर अडथळ्यांना सामोरे जावे लागते याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की काल दि.20जुलै2022 रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास आरटीओ अधिकाऱ्याचे वाहन फैजपूरकडून यावल बस स्टॅन्ड कडे येत असताना यावल एसटी स्टँड समोरच गुरढोरांचा मोठा कळप भर रस्त्यावर म्हणजे बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर यावल नगरपालिका हद्दीत उभा असल्याने आरटीओ वाहनालाच मोठा अडथळा निर्माण झाला हे प्रत्यक्ष दर्शनी बघितल्याने आरटीओच्या आणि यावल नगरपालिकेच्या कारभाराबाबत अनेक…