Author: Saimat

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  आम्ही एक पक्षकार आहोत. जे सरकार स्थापन झालेलं आहे ते बेकायदेशीर आहे. आम्ही आमची बाजू मांडली आहे. वकिलानं आमची बाजू चांगली मांडली आहे. न्यायालय बारकाईनं हे प्रकरण ऐकत आहे. या सुनावणीचा देशावर परिणाम होईल. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील शिंदे सरकार बेकायदेशीर आहे. राज्यात अधिवेशन बोलावणं, नव्या विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती करणं या सर्व गोष्टी बेकायदेशीर आहेत. त्यालाच आम्ही कोर्टात आव्हान दिलं असून कोर्ट आम्हाला न्याय देईल, असा आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. तसेच एकनाथ शिंदे हे भाजपच्या (bjp) पटलावरील छोटसं प्यादं आहे.…

Read More

साईमत लाईव्ह दिल्ली प्रतिनिधी  आता लवकरच सॅटलाईटद्वारे  टोलवसूल  केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली. वाहनाच्या नंबर प्लेटच्या  मदतीने सॅटलाईच्या माध्यमातून टोलवसुली करण्याच्या यंत्रणेवर सध्या काम सुरू असल्याचे रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ही यंत्रणा लागू झाल्यानंतर फास्टॅगची आवश्यकता भासणार नसल्याचे देखील गडकरी म्हणाले आहेत.ते बुधवारी राज्यसभेत बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, अनेकदा टोल चुकवला जातो, त्यामुळे मोठे नुकसान होते, मात्र या अत्याधुनिक सॅटलाईट यंत्रनेच्या माध्यमातून टोल वसुलीमुळे टोल चुकवेगिरीला चाप बसेल. जर तुम्ही टोल चुकवला तर त्यासाठी कायद्यात कोणत्याही शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे सरकारचा टोलवसुली धोरणामध्ये अत्याधुनिकता…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  यापूर्वी ईडीने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी छगन भुजबळांना 2 वर्ष एक महिना आणि 21 दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. आज राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत  यांची ईडी कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे त्यांना आज जामीन मिळणार की तुरुंगातच राहावे लागणार हे पाहावे लागणार आहे. राऊत यांना गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी राऊत यांची तब्बल 16 तास…

Read More

मेष- दुपारनंतर वेळ चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमचा मुद्दा कोणावरही जबरदस्ती लादू नका. वृषभ-  तुम्हाला विनाकारण राग येऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा.  भाग्य तुम्हाला साथ देईल. रखडलेली कामं पूर्ण होण्याचा योग आहे. मिथुन-  खोट्या गोष्टींचा आज अवलंब करू नका. बाहेर जाताना गाडी अतिशय काळजीपूर्वक चालवा. कर्क-  तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.  तुमच्या आहाराची काळजी घ्या. करिअर बदलाचा योग आहे. सिंह-  आजचा दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घालवाल. संध्याकाळपर्यंत वेळ अनुकूल राहील. तसंच घरातील उत्तर दिशा स्वच्छ ठेवा. कन्या-  नोकरीसाठी अर्ज करणं लाभदायक ठरेल. महत्त्वाचं काम संध्याकाळपर्यंत पूर्ण करा. गरजू लोकांना औषध दान करा. तूळ-  तुमच्या नातेसंबंधात अडचणी येऊ शकतात.…

Read More

सर्वोच्च न्यायालायात आज शिवसेना, शिंदे गटाच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी न्यायालायाने शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी आजच याचिका दुरुस्ती करून द्याल का? तुमचे नेमके म्हणणे काय ते मी लिहून घेऊ का? अशी टिप्पणीही केली, राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता यांचा युक्तिवाद झाल्यानंतर ही सुनावणी पुन्हा उद्यावर ढकलण्यात आली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी उद्या सकाळी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. उद्या सुनावणीसाठीचे हे पहिलेच प्रकरण असेल. आज झालेल्या सुनावणीत ठाकरे गटातर्फे कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी हे शिवसेनेची बाजू मांडत आहेत. तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज कौल आणि महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला तर राज्याचे महाधिवक्ता तुषार…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी   उदय सामंत यांच्या गाडीवर काल कात्रजमध्ये संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला. यामध्ये सामंतांच्या गाडीची काच फुटली आहे. पण अशा गोष्टींकडे लक्ष न देता उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामांवर लक्ष केंद्रीत करावे असे मत कदम यांनी व्यक्त केले आहे. सामंत यांनी आपल्या मतदारसंघात तर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाकडे लक्ष दिल्यास असल्या छोट्या-मोठ्या गोष्टींना अधिकचे महत्वही मिळणार नसल्याचे कदम म्हणाले आहेत. मुंबई : बंडखोर आमदारांबाबत (Shiv sena) शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे याबाबत कोणी प्रतिक्रिया देत नसले तरी (Ramdas Kadam) रामदास कदम यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यावर मात्र खोचक टिका केली आहे.…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी   आतापर्यंत शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण आता शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हे मी आधीच बोलो होतो. हे परवा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलून दाखवलं की शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. त्यांना माहिती नाही अशी आव्हानं पायदळी तुडवत त्याच्यावर झेंडा रोवला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावरील हल्लाबोल अजूनही सुरूच आहे. मुंबईतील शाखांच्या उद्घाटनाचा प्रसंग असो, वाढदिवसाचा प्रसंग असो की शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक असो, संधी मिळताच उद्धव ठाकरे हे बंडखोर आमदारांवर कठोर शब्दात टीका करत आहेत. आजही त्यांनी एका कार्यक्रमातून त्यांनी बंडखोरांची पिसे काढली. भाजपचा वंश नेमका कोणता? सगळे रेडिमेड आहेत. हायब्रीड…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालायात आज शिवसेना, शिंदे गटाच्या भवितव्यावर सर्वोच्च सुनावणी सुरु असून सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी चालू आहे. सुनावणीदरम्यान पक्ष फुटीरतेचा बचाव पुरेसा होऊ शकत नाही असा सवाल कोर्टाने शिंदे गटाला विचारला आहे. आज दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद केला जात आहे. कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे शिवसेनेची बाजू मांडत आहेत तर शिंदे गटाकडून हरिश साळवे हे युक्तिवाद करीत आहेत.आमदार अपाज्ञ प्रकरणाच्या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. दोन्ही बाजूकडील वकीलांचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीशांनी त्यांना काही प्रश्‍नही विचारले. दुपारी दिड वाजता आजचा युक्तीवाद संपल्यानंतर या प्रकरणी आता उद्या सुनावणी होईल, असे कोर्टाने घोषित केले. त्यामुळे…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी तालुक्यातील वरखेडी येथील एका अविवाहित अल्पभूधारक २८ वर्षीय युवकाचा त्यांचेच शेतात पिकाला फवारणी करत असतांना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, वरखेडी ता. पाचोरा येथील अविनाश अशोक भोई (वय – २८) यांची वरखेडी शिवारात एक एकर शेत जमिन आहे. अविनाश भोई हे दि. ३० जुलै रोजी आपल्या शेतात लावलेल्या पिकावर फवारणी करत असतांना विषारी औषधाने त्यांना भुरळ येवुन ते बेशुद्ध झाले होते. ग्रामस्थांच्या मदतीने अविनाश भोई यांना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान मृत्यूशी झुंज देत असतांनाच दि. १…

Read More