Author: Saimat

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी  काल मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्याने यावल येथील जनसेवक डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे मोफत राष्ट्रीय ध्यज तिरंगा वाटप करण्यात शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमास सर्व स्तरातून उस्फूर्तपणे उत्तम प्रतिसाद मिळाला या वेळी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा भाजपाचे पदाधिकारी हिरालाल भाऊ चौधरी यांच्या हस्ते ध्यज वितरण करून हर घर तिरंगा अभियानास भारतीय जनता पार्टी कार्यालया पासून संपूर्ण यावल शहरात शुभारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाला उदंड प्रतिसाद मिळतोय या अभियानात यावल तालुका तीळभर सुद्धा मागे राहणार नाही.यासाठी…

Read More

मेष: आजचा दिवस चांगला असेल. मोठ्यांचा सन्मान करा. त्यांचा सल्ला घ्या. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरीसाठी दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. दिवस व्यस्त असला तरी आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: नात्यात कटूपणा येऊ देवू नका. स्वतःच्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवा. वडिलांचं मत समजून घ्या. या राशीच्या व्यक्ती आपलं कौशल्य आणि समजूदारपणाने चांगल्या प्रकारे काम मार्गी लावतील. मिथुन: या राशीच्या लोकांसाठी शुक्रवार अत्यंत खास असणार आहे. व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. आपलं म्हणणं योग्य पद्धतीनं मांडण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून योग्य सल्ला मिळेल. कर्क: आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी  येथुन जवळच असलेल्या लोण पिराचे येथे दोन वर्षांच्या ब्रेक नंतर मोहरम च्या दिवशी दि.९ रोजी ताजिया मिरवणुक मोठया उस्तवात संपन्न करण्यात आली ताजिया मिरवणुक व विसर्जन मध्ये लोणसह परीसरातील नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते हिंदु मुस्लीम बांधवांनी दर्शना साठी गर्दी केल्याने सर्वधर्म समभाग चा प्रत्यय येथे येत होता. हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणुन लोण पिराचे येथील दर्गा प्रसिध्द आहे हिंदु मुस्लीम एकत्र येत येथे वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न करतात मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना मुळे सारे धार्मिक कार्यक्रम बंद होती दोन वर्षांच्या ब्रेक नंतर मोहरम च्या दिवशी दि.९ रोजी ताजिया मिरवणुक काढण्यात आली यात…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव चे नेते व जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांनी भाजपा शिवसेना युतीच्या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निकटवर्तीय व उत्तर महाराष्ट्रातील वजनदार नेते असलेले गिरीषभाऊ महाजन यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने जळगाव जिल्ह्यात जल्लोष साजरा केला जात असून चाळीसगाव येथे देखील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी गिरीषभाऊ तुम आगे बढोच्या घोषणांनी परीसर दणाणून काढला. आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयाबाहेर एकत्र येत फटाके फोडण्यात आले व एकमेकांना पेढे भरवून हा आंनद साजरा केला गेला. सदर प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश…

Read More

साईमत लाईव्ह भुसावळ  प्रतिनिधी  हा समारंभ 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ब्राह्मण संघाच्या स्वातंत्रवीर सावरकर सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षपद रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी यांनी भूषविले .कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय जोशी अध्यक्ष ब्राह्मण संघ यांनी केले सतीश कुलकर्णी प्राचार्य रेल्वे स्कूल यांच्याहस्ते बोर्ड आणि विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कोणाकडून प्रेरणा घेण्या पेक्षा आपल्यापासून कोणी प्रेरणा घेतली पाहिजे, असे यश, चारित्र्य संपादन केले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमासाठी आमंत्रित म्हणून ब्राह्मण संघाचे माजी अध्यक्ष संजय जोशी,कार्यकारिणी सदस्य गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी  9 ऑगस्ट क्रांती दिन अमृतमहोत्सव पाचोरा नगरपालिका प्रशासनातर्फे साजरा करण्यात आला. 9ऑगस्ट म्हणजे भारत स्वतंत्र अमृतमहोत्सव आहे.या निमित्ताने पाचोरा नगरपालिका प्रशासनानेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा स्मारक मध्ये तिरंगी रांगोळी व फुलांची सुंदर सजावट करण्यात आली.क्रांती दिन म्हणजे दिनांक 8 ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील शेवटचा दिवस म्हणून स्मरण केला जातो. महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलनाला या दिवशी सुरुवात झाली होती. त्यानंतर, 9 ऑगस्ट रोजी गांधींसह ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण भारत इंग्रजांविरुद्ध एकवटला होता. देशावासियांच्या या एकजुटीने इंग्रज सरकारला गुडघे टेकायला भाग पाडले. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतर 9 ऑगस्ट हा दिन…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी  पा.ता.सह.शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से.हायस्कूल पाचोरा येथे जागर अमृत महोत्सवाचा या कार्यक्रमांतर्गत कारगिल युद्धात विशिष्ट सेना मेडल प्राप्त व सेवा निवृत्त निरीक्षक सुरेश भिला पाटील हे प्रमुखअतिथी म्हणून उपस्थित होते. देश सेवेचा सार्थअभिमान,जवानांविषयी आत्मीयता तसेच कारगिल युद्धातील विजयी प्रसंग विद्यार्थ्यांसमोर सादर करतांना त्यांनी देशप्रेम, त्याग, बलिदान व योगदान यांचे महत्व प्रतिपादन केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पी. एम. वाघ अध्यक्षस्थानी होत्या. तसेच कार्यक्रमास पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. उज्वल पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन आर. बी. कोळी यांनी केले.

Read More

साईमत लाईव्ह जळगाव  प्रतिनिधी  कोरोना काळात कोविड-१९ विषाणू बाधित रुग्णांची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा सुश्रृषा करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील विविध संवर्गातील कंत्राटी कर्मचारी असलेल्या कोरोना योध्दयांना शासकीय सेवेत कायम करा अशी मागणी येथील विविध सामाजीक संस्थांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. सदरचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या कडे देण्यात आले आहे. निवेदन म्हटले आहे की, मागील दोन वर्षापासून संपूर्ण जगात कोविड-१९ विषाणूचा जीवघेणा फैलाव झालेला आहे.भारतात प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्री राज्यात कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर विळखा बसला आहे. कोरोना संसर्गाची बाधा झालेल्या रुग्णांकडे जवळचे नातेवाईक सुद्धा वाळीत टाकल्यासारखे वागणूक देत असल्याचे आपण सर्वांनी अनुभवले आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची सेवा सुश्रृषा करण्यासाठी…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव  प्रतिनिधी भारत सरकार संचालित नेहरू युवा केंद्र, जळगाव संलग्न संस्था मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय व पोलिस मुख्यालय परिसरात अशोक, पिंपळ, जांभूळ, गुलमोहर, शिसम, वड, चिंच यासह जास्त प्रमाणात ऑक्सिजन देणारे 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाप्रसंगी वृक्ष लागवड व जतन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक (गृह) संदिप गावित यांनी केले. आगामी काळासाठी पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे असे मनोगत मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला भगीरथ इंग्लिश स्कूलचे उपक्रमशील शिक्षक नागेश सोनार यांनी मुलगी कु.कनिष्का व वडील प्रल्हाद सोनार यांचा वाढदिवसानिमित्त अनमोल सहकार्य केले.…

Read More