साईमत / जळगाव / प्रतिनिधी मानराज पार्क हुंडाई शोरुम शेजारील रस्ता पिंप्राळा परिसरात जाण्यासाठी सोयीचा आहे. म्हणून हा रस्ता सुरु करण्यासाठी कायदेशीर लढ्यातून या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याच्या उद्देशाने हा सिमेंट कॉक्रीटचा बनविण्यास सुरवात करण्यात आली होती. मग मध्येच कुठ माशी शिंकली कि हा रस्ता अर्धवट सोडून काम बंद करण्यात आले आहे. या रस्त्याच्या काम बंद करण्यामागे कोण झारीतील शुक्राचार्य आहे असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला असून प्रशासनाने या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनमधून होत आहे. मानराज पार्क हुंडाई शोरुम ची बाजूचा रस्ता पिंप्राळा पर्साराला जोडतो या गल्लीमध्ये हुंडाई…
Author: Saimat
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : स्थानिक पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे दि. 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत ‘इनोव्हेशन स्ट्रॅटेजी इन इंग्लिश लँग्वेज’ या विषयावर महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी इंग्लिश कम्युनिकेशन कोच आणि मोटिवेशन ट्रेनर भरत आर. साळवे सर यांचे मार्गदर्शन महाविद्यालयातील प्राध्यापकांना या पाच दिवसीय कार्यक्रमांमध्ये लाभणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे आणि प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी कार्यक्रमासाठी लाभलेले मुख्य वक्ते भरत आर. साळवे सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल तांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रमाकांत चौधरी यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक संदीप खाचणे, नितीन खर्चे, योगेश सुशीर,…
साईमत/न्यूज नेटवर्क/जळगाव भारतीय डाक विभाग व नवी दिल्ली येथे जळगाव येथील आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू व प्रशिक्षक श्री. सुमेध प्रदीप तळवेलकर यांची थेट नियुक्ती दिल्ली येथे डाक विभागात करण्यात आली आहे. सुमेधने तीन वेळा भारतीय सॉफ्टबॉल संघाचे प्रतिनिधित्व केलेले असून नॅशनल गेम्स मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले आहे तसेच सीनियर राष्ट्रीय स्पर्धेत चार वेळा अजिंक्य प्राप्त केलेले आहे. सुमेध बरोबर आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी प्रियंका नहाळे, प्रवीण दवे,किशन कुमार,प्रकाश कुमार या आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडूंनाही डाक विभागात संधी मिळाली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल मा.ना गिरीश महाजन, मा. आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे ,पी.ही पाटोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवी नाईक प्रशिक्षक किशोर चौधरी, राज्य सॉफ्टबॉल…
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव जळगाव शहरातील विविध भागात रस्त्यांची, गटारींची झालेली दुरावस्थे संदर्भात आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याशी सविस्तर चर्चा करून समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करावे अशा आशयाचे निवेदन जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्याम तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले दरम्यान, सदर समस्यांचे आकलन केल्यानंतर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून यावर तात्काळ उपाययोजना कराव्या अश्या सूचना करण्यात आल्या. तसेच समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करू असे आश्वस्त केले. यावेळी निवेदन देताना शहर जिल्हाध्यक्ष शाम तायडे, वार्डातील महिला नागरिक काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी गणेश राठोड, सरचिटणीस दीपक सोनवणे, सरचिटणीस राहुल भालेरा,व मालोजीराव पाटील, सुमन मराठे, सौ बागुल आदी…
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव रोटरीच्या ग्रीन सिटी प्रोजेक्ट अंतर्गत एमआयडीसीतील दिनेश कक्कड यांच्या कंपनीत व परिसरात रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाउन,प्रेसिडेंट एन्क्लेव्ह व इनरव्हील क्लब यांच्यातर्फे ७० रोपांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपणाचे प्रायोजकत्व व त्या रोपांची निगा, देखभाल आणि संगोपनाची जबाबदारी कक्कड यांनी स्वीकारली. यावेळी रोटरी मिडटाउनच्या अध्यक्ष छाया पाटील, मानद सचिव किरण सिंग, एन्क्लेव्ह चेअरमन किशोर सूर्यवंशी, इनरव्हील क्लबच्या नूतन कक्कड यांच्यासह डॉ. सुमन लोढा, दिलीप गांधी, अनिल एम.अग्रवाल, सुरेंद्र छाबडा, श्रीरंग पाटील, सुनंदा देशमुख, विनोद मल्हारा, डॉ. विवेक वडजीकर, संजय सिंग, आर.एन.कुलकर्णी, हेमंत पाटील, डी.ओ.चौधरी, हेमा गांधी, अनिता सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव येथील रोटरी जळगाव परिवाराची अर्थात प्रेसिडेंट एन्क्लेव्हची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात माजी प्रांतपाल व डिस्ट्रिक्ट एन्क्लेव्हचे सल्लागार शब्बीर शाकीर यांनी मार्गदर्शन केले. प्रेसिडेंट एन्क्लेव्ह चेअरमन किशोर सूर्यवंशी व माजी चेअरमन सतीश मंडोरा यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक एन्क्लेव्ह सेक्रेटरी डॉ.पंकज शाह यांनी तर आभार रोटरी एलिटचे अध्यक्ष ओमप्रकाश सिंग यांनी आभार मानले. बैठकीसह रोटरीचे डीजीएन डॉ.राजेश पाटील, सहप्रांतपाल जितेंद्र ढाके यांच्यासह विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष व एन्क्लेव्हचे सदस्य उपस्थित होते.
साईमत / न्यूज नेटवर्क / रावेर केळीचे भाव निश्चित करतांना जळगाव व बऱ्हाणपूर जिल्ह्यातील बाजार समित्यांनी समन्वय साधावा,व्यापाऱ्यांकडून बँक हमी घेऊन परवना द्यावा व केळी उत्पादकांना ठगवणाऱ्या बोगस व्यापाऱ्यांवर समित्यांनी कठोर कारवाई करावी अशाउपाययोजना अंमलात येतील यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अभ्यासूरित्या अँक्शन मोडवर असल्याचे दिसून आले. रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने आयोजित आजचे चर्चासत्र केळी उत्पादकांना काही अंशी दिलासा देणारे ठरले. रावेर येथे माजी सैनिक हॉल मध्ये केळीला स्थिरभाव मिळण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्या विशेष उपस्थितीत झालेल्या या चर्चासत्राला फैजपूर विभागाच्या सहायक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णासिंह, जिल्हा कृषी अधिक्षक कुर्बान तडवी, बऱ्हाणपूर बाजार समितीचे सचिव…
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव येथील प्रभाकर कला संगीत अकॅडमीतर्फे दर वर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त यंदा आद्यंत या अनादि से आधुनिक तक या संकल्पनेवर आधारित शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमातून परंपरा आणि नाविन्याचा मिलाफ सादर करण्यात आला. ला. ना. सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात रविवारी सायंकाळी झालेल्या आणि व. वा. जिल्हा वाचनालय सहप्रायोजक असलेल्या या कार्यक्रमात डॉ. प्रदीप जोशी, ॲड. सुशील अत्रे, सी.ए.अनिलकुमार शाह व संस्थापिका डॉ.अपर्णा भट यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी डॉ.प्रदीप जोशी यांनी मनोगत व्यक्त केले प्रारंभी श्रीकृष्ण पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कृष्ण भजन, सरस्वती वंदनाने झाली. यानंतर अर्धांग, थुंका थुंका व शक्ती स्तुतीचे सादरीकरण करण्यात आले.…
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाच्या बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जळगाव येथील खान्देश सेंट्रल येथे एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या प्रायोजकत्वातून केले होते. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनतर्फे ही स्पर्धा झाली. स्विस लिग पध्दतीने एकुण आठ डावात खेळवली गेलेल्या या स्पर्धेत पुण्याचा श्लोक शरणार्थी अव्वल ठरला त्याला प्रथम क्रमांकाचे १५००० हजाराचे रोख पारितोषिक व चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले गेले. खान्देश सेंट्रल येथे झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राहुल महाजन, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, सहसचिव अंकूश रक्ताडे, जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे कोषाध्यक्ष…
साईमत / न्यूज नेटवर्क / जळगाव दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने निसर्गाचा समतोल ढासळत जात आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन व्हावे, या हेतुने सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिराच्या परिसरात रोटरी क्लब ऑफ वेस्ट जळगावतर्फे 30 वृक्षासह ट्री गार्डचे वाटप रविवारी, 28 जुलै रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले. यावेळी माजी महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते वृक्ष लावून उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला जागृत स्वयंभू महादेवाची आरती मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. वृक्षारोपणप्रसंगी रोटरी क्लब वेस्टचे ट्री गार्ड प्रोजेक्ट चेअरमन अंकित जैन यांनी मनोगत व्यक्त केले. वृक्षारोपणासाठी खड्डे करणारी मशिन संजय शाह यांच्याकडून मोफत उपलब्ध करून दिली होती. वृक्षारोपणासाठी परिसरातील…