Author: Saimat
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी औरंगाबाद खंडपीठाने यावल तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखान्याची 29 कोटी रुपये रक्कम जप्त केली होती त्यापैकी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 16 कोटी रुपयांची रक्कम तात्काळ मिळायला पाहिजे तसेच मधुकर सहकारी साखर कारखाना विक्री करणे म्हणजे सर्व राजकीय पक्षासह मधुकर कारखाना सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दुर्भाग्य असल्याबाबत आता संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह सर्व राज्यात मधुकर या प्रसिद्ध कारखान्या बाबत जोरदार चर्चा सुरू झाली असून ऊस उत्पादक शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. यावल तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखान्याची सभासद संख्या अंदाजे 27हजार आहे त्यापैकी अडीच ते तीन हजार ऊस उत्पादक शेतकरी सभासद आहेत या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एकूण 16 कोटी…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आता जरंडीकरांना घरातील साचलेला केर कचरा गुरुवारी (दि.११)पासून संगीतमय घंटा गाडीने संकलित येणार आहे.जरंडी ग्रामपंचायतीला आता नवीन घंटा गाडी मिळाली असून सोयगाव तालुक्यात संगीतमय घंटागाडी असलेली जरंडी ग्रामपंचायत ठरली आहे. या घंटागाडीचे गुरुवारी लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी सांगितले. सोयगाव तालुक्यात हिवरेबाजार आणि पाटोदा या ग्राम पंचायतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत जरंडी ग्रामपंचायत ने महिनाभरापासून आगेकूच केली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष चा मुहूर्त साधत जरंडी ग्रामपंचायतने आता ग्रामीण भागही हायटेक करण्याच्या प्रयत्नात गावातील केर कचरा संकलित करण्यासाठी संगीतमय घंटा गाडीचा अनोखा प्रयोग हाती घेत गुरुवारी या…
मुक्ताईनगर : भारतीयांकडून “हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत आप आपल्या घरांवर राष्ट्रीय ध्वज फडकाविण्यासाठी आवाहन केले आहे. अभियानाला मुक्ताईनगर येथे प्रोत्साहन मिळावे यासाठी नगरपंचायत मुक्ताईनगर प्रशासनाने कंबर कसली असून नागरिकांना यांनी राष्ट्रीय ध्वज केवळ 21 रुपयामध्ये उपलब्ध केला आहे. या ध्वजाची साईज 20 x 30 इंच आहे. यासाठी पालिकेत एक अर्ज भरून घेतला जाणार असून घरावर तिरंगा ध्वज लावणाऱ्या नागरिकांची नोंद घेतली जाणार आहे. तिरंगा केवळ 21 रुपयामध्ये पालिकेत उपलब्ध झाल्याचे व तो आधार कार्ड झेरॉक्स व एक अर्ज भरून घेवून जाण्याचे आवाहन मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी केले आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण…
साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्यला 75 वर्षे पूर्ण झाल्याने आणि त्याच वेळी रक्षाबंधना चा सण सोबत येणे हा दुग्ध-शर्करा योग या वर्षी आल्याने या संधीचे सोने करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्यध्यक्षा- शुभांगी पाटील यांनी एक लाख शिक्षक पदविधारांना राख्या पाठवून अनोख्या रीतीने साजरा केला आहे. राज्यातील हजारो शिक्षक, पदवीधर व विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुभांगी पाटील यांनी टीचर्स असोसिएशन,स्टुडंट्स असोसिएशन या संघटनांच्या माध्यमातून अनेक आंदोलने करून त्या माध्यमातून असंख्य प्रश्न सोडवली आहेत व सोडवत आहेत. ज्या मध्ये प्रामुख्याने सुमारे पंचावन्न हजार विना अनुदानित शिक्षकांचा पोटाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला त्या साठी आझाद मैदानावर सात दिवस अन्न जल त्याग केला…
साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या लोण-पिराचे,बोदर्डे,कोठली व निंभोरा ह्या चारही गावातु न एकाच रात्री तब्बल बारा गुरे चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण परीसरात एकच खळबळ उडाली आहे. लोण येथील गावाला लागूनच असलेल्या शेड मधून व मोकळ्या जागी बांधलेली गुरे अज्ञात वाहनात टाकून भामटे पसार झाल्याचा अंदाज लोण ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. रामकृष्ण मांगो पाटील यांची ऐंशी हजार रुपये किमतीची बैलजोडी व तीस हजार रुपये किमतीची गाय चोरून नेली आहे. तर रघुनाथ शायसिंग पाटील यांची एक गाय व दोन वासरे असे तीन गुरे अंदाजे एकलाख रुपये किमतीचे पशुधन तेथून चोरी झाले आहेत. तर बोदर्डे येथील सुनील…
साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ ह्या या अभियानात सहभागी होत जळगांव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आज खेळाडूंना विनामूल्य राष्ट्रीय तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांच्या हस्ते खेळाडूंना ध्वज देण्यात आले. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरावर ध्वज लावावा तसेच ध्वज संहितेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी जळगाव शहर व तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजु खेडकर, उपाध्यक्ष शरीफ पिंजारी,कोषाध्यक्ष बाबा शिर्के, टेनिस प्रशिक्षक कृपालसिंग ठाकूर, जेष्ठ खेळाडू युवराज वाघ, नाना राजपूत,नितीन पाटील,ज्ञानेश्वर कोळी,किरण चौधरी,दादा जोशी,विजय सोनवणे, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकासआघाडीत नाराजीनाट्य सुरू आहे. शिवसेनेने वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांची नियुक्ती केल्यानंतर काँग्रेसने आपल्याशी कोणतीही चर्चा न केल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली. आता याबाबत विचारलं असता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच शिवसेनेने निर्णय घेताना कोणतीही चर्चा केली नसल्याचं सांगितलं. जयंत पाटील म्हणाले, “शिवसेनेने इतर दोन पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर ते अधिक चांगलं दिसलं असतं. मात्र, त्यांनी अशी चर्चा केली नाही. राष्ट्रवादीने पत्र देण्याआधी बाळासाहेब थोरातांशी थोडी चर्चा केली होती. ज्यांच्याकडे जास्त संख्याबळ आहे त्यांचा विरोधी पक्षनेता होतो अशी पूर्वीपासूनची परंपरा आहे.…
साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी येथील फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप व जिजाऊ बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट ‘क्रांती दिन’ व स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील सर्व हुतात्मा स्मारकांना पुष्पचक्र व माल्याअर्पण करून श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले. शहरातील तहसील कार्यालय आवार हुतात्मा स्मारक, साने गुरुजी पुतळा, समशेर पारधी स्मारक नगरपालिका जवळ , सुभाष चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा, राणी लक्ष्मी चौकातील लाल बावटा हुतात्मा स्मारक , तसेच भारत्रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पैलाड नाका जवळील हुतात्मा स्मारक, अहिल्यादेवी होळकर स्मारक एसटी स्टँड जवळ , महाराणा प्रताप स्मारक , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मारक , छत्रपती शिवाजी…