क्रांती दिनानिमित्त फिनिक्स ग्रुप तर्फे शहीद स्मारकांना अभिवादन

0
12

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी 

येथील फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप व जिजाऊ बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट ‘क्रांती दिन’ व स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील सर्व हुतात्मा स्मारकांना पुष्पचक्र व माल्याअर्पण करून श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
शहरातील तहसील कार्यालय आवार हुतात्मा स्मारक, साने गुरुजी पुतळा, समशेर पारधी स्मारक नगरपालिका जवळ , सुभाष चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा, राणी लक्ष्मी चौकातील लाल बावटा हुतात्मा स्मारक , तसेच भारत्रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पैलाड नाका जवळील हुतात्मा स्मारक, अहिल्यादेवी होळकर स्मारक एसटी स्टँड जवळ , महाराणा प्रताप स्मारक , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, राष्ट्रसंत गाडगेबाबा स्मारक , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नाट्यगृहा जवळ व क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, सावता वाडी माळीवाडा या सर्व स्मारकांना पुष्पचक्र व माल्यर्पण करण्यात आले. तसेच वसुंधरा लांडगे यांच्या सुरेल आवाजात प्रत्येक स्मारकांजवळ देशभक्ती पर गीत, क्रांती गीत, समर गीत गाऊन एक वैशिष्ट्यपूर्ण श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी ग्रुप अध्यक्ष अ‍ॅड. ललिता पाटील, वसुंधरा लांडगे, प्रतिभा मराठे , प्रा विश्वनाथ ठाकरे , प्रा प्रकाश महाजन, प्रा आशिष शर्मा , केदार देशमुख सर, वसीम शाह सर ,निलेश वानखेडे सर , महेश पाटील, कमलेश भट आदी मान्यवर उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here