साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी (विजय चौधरी) आगामी येऊ घातलेल्या पोळा आणि गणेशोत्सव दारूमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी सोयगाव पोलिसांचे अवैध दारू विक्रीवर लगाम घालण्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आले असून मंगळवारी या पथकाने नांदगाव तांडा ता सोयगाव येथे गावरान(हातभट्टीची) अवैध दारू दहा लिटर कब्जात बाळगून विक्रीच्या उद्देशाने रंगेहात पकडून त्याचे कडून अंदाचे दोन हजार रु चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. देवमन किसन सोनवणे वय 45 वर्ष रा.नांदगाव ता. सोयगाव असे गावरान अवैध दारूविक्री करतांना आढळून आलेल्या चे नाव असून मंगळवारी त्यास पोलिसांच्या विशेष पथकाने रंगेहात पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मौजे नांदगाव येथे घराचे बाजूला सदर इसम अवैध…
Author: Saimat
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी येथील सेंट लॉरेन्स स्कूल मध्ये आपला पर्व दिन मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सेंट लॉरेन्स शाळेने जळगावातील अनेक घरांमध्ये शिक्षणाची मशाल पेटवण्याची 30 वर्षे साजरी केली.यावेळी त्यांनी त्यांच्या संरक्षक संतांचे तेथे उपस्थित राहून त्यांच्यासाठी सतत मध्यस्थी केल्याबद्दल आभार मानले. या मैलाच्या दगडी वर्षात जाताना ते म्हणाले की, आम्हाला आमच्या संरक्षक संताचे सर्वात कमी लोकांच्या सेवेचे आणि त्याहूनही अधिक प्रेमाचे गुण आत्मसात करायचे आहेत. यावेळी मुख्याध्यापिका नेहा जस्मिन रॉड्रिग्स आणि पर्यवेक्षिका दिपाली पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून समारंभाची सुरुवात झाली. प्रार्थना सेवेचे नेतृत्व कॅबिनेट सदस्यांनी केली.
साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी- निसर्डी गावासाठी 42.66 लक्ष निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना गावासाठी वरदान ठरणारी असून यामुळे पाणी संकटावर निश्चितपणे मात होणार आहे असा विश्वास आ.अनिल भाईदास पाटील यांनी निसर्डी येथे विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केला. निसर्डी ता.अमळनेर येथे विविध विकासकामांचे भुमीपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते,गावात आगमन होताच आमदारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.याप्रसंगी जलजीवन मिशन अंतर्गत 42.66 लक्ष निधीतून पाणीपुरवठा योजना,क्रीडा विभाग अंतर्गत 7 लक्ष निधीतून व्यायामशाळा बांधकाम आणि 2515 अंतर्गत 15 लक्ष निधीतून गाव दरवाजा बांधणे आदी कामांचे भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला.यावेळी आयोजित सत्कार सोहळ्यानंतर पुढे बोलताना…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहरातील निवृत्ती नगर परिसरात मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास एका तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यात चार दिवसातील हा तिसरा खून आहे. हा खून इतका भयंकर होता की तरुणाला तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने तो जागीच गतप्राण झाला होता. दरम्यान, खुनाला पूर्व वैमनस्याची किनार असल्याचे निष्पन्न होत असून याबाबत दोघांन विरूध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश उर्फ गोलू उत्तम पाटील (वय २८, रा. आव्हाने) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर हा प्रकार अवैध वाळू व्यवसायातून घडल्याची चर्चा देखील सुरू आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan ) यांच्या हस्ते राज्यातील 3 हजार 943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली आदेश विधान भवनातील दालनात जारी करण्यात आले. यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, जिल्हा परिषद, पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद वर्धा मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, ग्रामविकास विभागाचे उपसचिव का. गो. वळवी यांची उपस्थिती होती. मंत्री महाजन म्हणाले, राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या करण्यात आल्या आहेत. अभ्यास गटाचे संशोधन आणि विश्लेषण तसेच शासन निर्णयाची अचूकता, पारदर्शकता आणि सर्व संवर्गासाठी लावलेल्या योग्य निकषानुसार या…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहरातील निवृत्ती नगर परिसरात मध्यरात्री एक वाजेनंतर एका तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. भावेश उत्तम पाटील (वय २८, रा. आव्हानी) असे मयताचे नाव आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात चार दिवसातील हा तिसरा खून आहे. रात्री १ वाजेच्या सुमारास एसएमआयटी महाविद्यालयासमोरील १०० फुटी रस्त्यावर हा खून करण्यात आला. भावेश उत्तम पाटील (वय-२८, रा.आव्हाणे, हल्ली मुक्काम निवृत्तीनगर) असे मयताचे नाव आहे. चाकूने सपासप वार केल्याने तरुण रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. खून करणारे संशयीत वाळूमाफिया असून वाळू व्यवसायाच्या वादातून खून झाल्याची कळते. मात्र, अद्याप खू कोणी केला व त्यामागील नेमकं कारण…
साईमत लाईव्ह प्रतिनिधी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग |: राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आली.मात्र अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना भात खरेदीच्या वरती देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम मिळालेली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो शेतकरी आज बोनसच्या रक्कमे पासून वंचित आहेत .लवकरात लवकर शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळावी या , मागणीसाठी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्यासह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी मुंबईत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. कोकणातल्या शेतकऱ्यांना भात खरेदीचा बोनस द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी आमदार वैभव नाईक यांच्यासह विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली. यावेळी जोरदार घोषणा देत विधान भवन परिसर या आमदारांनी दणाणून सोडले. राज्य सरकारच्या…
साईमत लाईव्ह प्रतिनिधी सांवतवाडी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी योगा शिबिर घेण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे साधुन आयोजित केलेल्या या शिबिराला कारागृह अधिकाऱ्यांसह कर्मचारी व बंदीवानांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी कारागृह अधिक्षक ब्रह्मदेव लटपटे, कारागृह सुभेदार विनोद शिरगावकर, विनोद खोडके, हणमंत माने, मोईस जुन्नेदी, गणेश धावडे उपस्थित होते. सिंधुमित्र प्रतिष्ठानचे डॉ मिहीर प्रभुदेसाई, अँड्र्यू फर्नांडिस, दुर्गेश ठाकूर, सिद्देश मणेरीकर, दुर्गेश कुमार लालन यांनी योगाबाबत कारागृह अधिकाऱ्यांसह कर्मचारी व बंदीवानांचा प्रात्याक्षिकासाहीत मार्गदर्शन केले. यावेळी कारागृह अधीक्षक ब्रह्मदेव लटपटे यांनी कारागृहात बंदीवानांसाठी योगा शिबिर घेतल्याबद्दल सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे आभार…
साईमत लाईव्ह प्रतिनिधी वैभववाडी वैभववाडी I प्रतिनिधी: वैभववाडी रेल्वे स्टेशन मास्तर आणि नापणे गावातील प्रतिष्ठित नागरिक कै.संजय बालाजी शिंगाडे वय ४७ वर्ष यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. संजय शिंगाडे मनमिळाऊ होते. त्याच्या या स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वैभववाडी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. गेली बावीस वर्षे संजय शिंगाडे हे कोकण रेल्वेत स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत आहेत. पाच वर्षापासून ते वैभववाडी येथील स्टेशनवर स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते. प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. रेल्वे प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी ते घेत…